शेतीमालावरील प्रक्रिया उद्योगात संधी वाढत आहेत. भविष्यातील आव्हाने ओळखून शेतकर्यांनी वैयक्तिक किंवा गटपातळीवर या क्षेत्रात उतरले पाहिजे. यामुळे मूल्यवर्धन होऊन अपेक्षित दर मिळवणे तसेच शेतीमालाचे नुकसान टाळणे शक्य होईल. आज योग्य बाजारपेठेअभावी किंवा प्रक्रिया न केल्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतीमालाचे नुकसान होते.
प्रक्रियेअभावी काढणीनंतर भारतात ४० टक्के. इंडोनेशियात २० ते ५०, इराणमध्ये ३५, कोरियात २० ते ५०, फिलिपिन्समध्ये २७ ते ४२ श्रीलंकेमध्ये १६ ते ४१ टक्के, थायलंडमध्ये १७ ते ३५ टक्के आणि व्हिएतनाममध्ये २० ते ३५ टक्के शेतीमालाचे नुकसान होते., अशी माहिती ’कॅपिटल बजेटिंग’ – एग्रिकल्चर, २०१०-११ मधून समोर आली आहे.
या समस्येवरील प्रक्रिया हा उत्तम पर्याय आहे. इस्राएल व स्वित्झर्लंडामध्ये ५० टक्के शेतीमालावर प्रक्रिया केली जाते. भारतात शेतीमालाची मुबलक उपलब्धता आहे, मात्र व्यवस्थापन कौशल्याअभावी प्रक्रिया होत नाही. योग्य व्यवस्थापनाला ज्ञानाची जोड दिली तर भाजीपाला निर्जलीकरण, दुग्धप्रक्रिया आदी उद्योग शेतकरी उभारू शकतात. शेतीवरील उत्पादनाला योग्य किंमत हवी असेल तर शेतकर्यांनी शेतीमाल प्रक्रियेकडे वळावे.
– बिभीषण बागल
(लेखक कृषी तज्ज्ञ असून ‘इस्राएलमधील शेती’ हा त्यांचा विशेष अभ्यासाचा विषय आहे.)
तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमचीही 'उद्योजक प्रोफाइल' तयार करायची असेल तर 9833312769 वर "उद्योजक प्रोफाइल" असा मेसेज whatsapp करा.