सौर ऊर्जेशी संबंधित व्यवसायांत मुबलक संधी


₹७५० मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मागवा आणि त्यावर ₹२०० किंमतीचे 'एकविसाव्या शतकातील उद्योगसंधी' हे पुस्तक मोफत मिळवा. आजच ऑर्डर करा https://bit.ly/2YzFRct


सूर्यापासून मिळणारी उष्णतेपासून तयार केल्या जाणार्‍या ऊर्जेला सौर ऊर्जा म्हणतात. भारतात सौर ऊर्जा खूप मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. त्यामुळे सौर ऊर्जा आणि त्याच्यासंबंधित अनेक व्यावसायिक संधी उपलब्ध आहेत. सौर ऊर्जेवर चालणार्‍या उत्पादनांना आज बाजारात मोठ्या प्रमाणात मागणी वाढते आहे.

अमेरिका, जपान, चीन, भारत, जर्मनी, इटली, इंग्लंड आदी देशांत या वाढीची टक्केवारी वाढत चाललीय. सौर ऊर्जेवर चालणारी अनेक उत्पादने आज बाजारात उपलब्ध आहेत. उदा. सौर चूल, सौर कंदील, सौर बंब, सौर पथदिवे, शेतीसाठी लागणारी साधने इत्यादी. यातूनच व्यवसायाच्या अनेक संधी उपलब्ध आहेत.

१) स्वत:चं एखादं उत्पादन तयार करा आणि ते विका. त्यासोबत इतरही उत्पादनं तुम्ही विक्रीसाठी ठेवू शकता. ते म्हणजे, सौर ऊर्जेवर चालणारे दिवे, विविध उपकरणे, सोलार मोबाईल व लॅपटॉप चार्जर अशी अनेक उपकरणे विकू शकता.

२) या क्षेत्रात ही उत्पादनं तयार करणार्‍या अनेक कंपन्या उदयाला येऊ लागल्या आहेत. आपण त्या वितरणाची (Distributorship) एजन्सी घेऊ शकतो. त्याची एजन्सी (Distributorship) घेऊन माल विकायचा.

३) स्वत:चा सौर ऊर्जेचा प्लांटसुद्धा तुम्ही चालवू शकता. यात गुंतवणूक जास्त असते, परंतु हाही एक चांगला पर्याय आहे.

४) सौर उत्पादनं विकणे याशिवाय ही उत्पादन विकल्यानंतर लागणारी सेवासुद्धा देण्याचा व्यवसाय तुम्ही करू शकता. विजेवर चालणारी ही उत्पादने असतात. त्यांना साफ करणं, त्यांना विमा मिळवून देणं. याव्यतिरिक्त भारत सरकार आता सौर उत्पादनांच्या खरेदीवर सबसिडी देते ती ग्राहकांना मिळवून देणं, काही मोठ्या उत्पादनांसाठी वा सौर प्लांटसाठी मोठ्या गुंतवणुकीची गरज असते ती मिळवून देणं. अशा सेवा पुरवण्याचाही व्यवसाय तुम्ही करू शकता.

सौर ऊर्जेवर चालणार्‍या उत्पादनांना कसे वापरावे? गरज काय? फायदा काय?

अशा प्रकारच्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे आवश्यक असतात. ग्राहकाला याबाबत मार्गदर्शन देणारी सेवा ही स्वतंत्र व्यवसाय म्हणून तुम्ही सुरू करू शकता. या क्षेत्रात ही उपकरणे हाताळण्यासाठी प्रशिक्षित कामगारांची गरज असते, त्यांना प्रशिक्षण देण्याची सेवाही तुम्ही सुरू करू शकता.

– टीम स्मार्ट उद्योजक

Author

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ मध्ये 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?