Advertisement
उद्योगोपयोगी

यशस्वी होण्यासाठी गरजेची आहेत ‘आऊट ऑफ द बॉक्स’ विचार

स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मिळवा फक्त ₹५०० मध्ये. आजच वर्गणीदार व्हा! https://bit.ly/2YzFRct


मित्रांनो, ठरवून दिलेल्या कक्षेत, सांगितलेल्या प्रमाणांना ग्राह्य धरूनच काम करणं म्हणजे केवळ व्यवस्थापकीय काम करणं होय. यालाच दुसर्‍या शब्दात मेंटेनन्स मॅनेजर (Maintenance Manager) असंही म्हणतात. सांगितलेल्या कामाच्या पलीकडे जाऊन काम करणं, बर्‍याचदा नियमांच्या पलीकडे जाऊन काम करण्याची मानसिक व शारीरिक तयारी ठेवणं आजच्या घडीला आवश्यक आहे.

काही तरी असं करणं, की जे सामान्य बुद्धीला अगम्य, अकल्पित आहे, काही तरी ‘आऊट ऑफ बॉक्स’ जाऊन करणं, इथे अपेक्षित आहे आणि अशातूनच पुढे एखादं ‘गुगल’सारखं महाकाय सर्च इंजिन बनतं. त्यातूनच एखादी मोबाइल टेक्नॉलॉजीला रोज नवे पायंडे घालून देणारी ‘अ‍ॅपल’सारखी कंपनी उद्यास येते. मोबाइलद्वारे पैसे ट्रान्स्फर होतात.

फक्त ₹२२२ मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिकाच्या डिजिटल आवृत्तीचे आजीवन वर्गणीदार व्हा.

या वर्गणीसोबत काय काय लाभ मिळतील हे पाहण्यासाठी येथे क्लिक करा : https://rzp.io/l/37lxSO3N9p

जास्त यश प्राप्त करणारी माणसं ही इतरांना काही तरी जास्त (Extra Mile चालणारी) देणारी नक्कीच असतात, शिवाय ती काही तरी वेगळं आऊट ऑफ द बॉक्स देणारीसुद्धा असतात. जर तुम्ही तुमच्या आयुष्यात असंच यश प्राप्त करायची जबरदस्त इच्छा बाळगत असाल, तर नक्कीच नियमांच्या पलीकडे जाऊन काम करायला शिका. यशाला तुमची मैत्री करायला नक्‍कीच आवडेल. ‘आऊट ऑफ द बॉक्स’ या पद्धतीने काम करायची सवय लावा, लवकर यशस्वी व्हाल.

हे होऊ शकतं :

 • तुमच्या कामात नावीन्यता येते.
 • जगाला तुमचा हेवा वाटू लागतो.
 • जग अशा गोष्टींच्या प्रतीक्षेत असतंच.
 • अशा लोकांची आणि व्यवसायाची मोठ्या प्रमाणात मागणी आज सगळीकडेच आहे.
 • लोक अशा नवीन गोष्टींसाठी तुम्हाला जास्त पैसे, जास्त प्रतिष्ठा द्यायला तयार आहेत.
 • तुम्ही लगेच हिरो होता.
 • अशा गोष्टी यश घेऊनच जन्माला येतात.
 • कधी-कधी अपयशाने खचून जाऊ शकता, मात्र उमेद हारू नका.

हे करून तर बघा :

 • स्वत:ला एकाच प्रकारच्या कामात गुंतवून ठेवू नका.
 • अशाने तुमचा ‘कम्फर्ट झोन’ तुटेल व तुमची मानसिकता नावीन्याच्या शोधात असेल. त्यामुळे अशा गोष्टींचा प्रामुख्याने स्वीकार करा.
 • काही तरी जास्त, काही तरी ‘आऊट ऑफ द बॉक्स’ या पद्धतीने काम करा.
 • अशी माणसं सगळ्यांनाच आवडतात.
 • अशा पद्धतीतूनच नावीन्याचा जन्म होत असतो आणि म्हणूनच आज अगदी सामान्य माणूसही अशा गोष्टींचा उपभोग घेताना दिसतो.
 • अशातूनच आधुनिक फोन, इंटरनेट, विमान, सोशल मीडियाचा जन्म झाला आहे आणि पुढेही नवनवीन गोष्टी येत राहतील.
 • तुम्ही जे करत आहात ते अधिक चांगलं कसं करता येईल? याबद्दल स्वत:ला प्रश्‍न विचारत राहा. त्यातूनच नवीन काही जन्माला येईल.
– विश्वास वाडे

स्मार्ट उद्योजक® मासिकात तुमची कथा किंवा तुमची मुलाखत प्रसिद्ध करू इच्छित असाल, तर येथे क्लिक करा. : https://bit.ly/3bPrfMd


Free Newsletter on WhatsApp & Telegram

'स्मार्ट उद्योजक'चे उद्योजकता आणि व्यवसायविषयक लेख वाचण्यासाठी जोडले जा : WhatsApp ग्रुपवर आणि टेलिग्राम चॅनेलवर.

error: Content is protected !!