स्वीकारलेल्या भूमिकेसाठी स्वत:ला जबाबदार धरा

आज या स्पर्धात्मक जगात अपयशाची माळ इतरांच्या गळ्यात घालायची व यश आलंच तर ते आपण लाटायचं असं सर्रास घडताना दिसतं; परंतु जगातील यशस्वी व्यक्तींनी स्वीकारलेल्या कामासाठी नेहमी स्वतःला जबाबदार धरलं आहे. त्यात अपयश आल तर ते माझ्यामुळे आलं आणि जर यशस्वी झालो तर माझ्या सहकार्‍यांमुळे / टीममुळे हे तत्त्व या लोकांच्या आचरणातून सतत जाणवतं.

तुम्हीही तुमच्या आयुष्यात मोठ्या यशाचा कित्ता गिरवताना ही गोष्ट लक्षात ठेवावी. स्वीकारलेल्या कामासाठी स्वत:लाच जबाबदार धरा. अशाने तुमची कामाविषयीची भावना ही शुद्ध होते व लोक तुमच्यात एक सक्षम नेतृत्व पाहू लागतात. जबाबदारीने यशाची पायरी लवकर गाठता येते व ती टिकवता येते.

हे होऊ शकते :

  • जबाबदारीने समंजसपणा, प्रगल्भता (Maturity) येते.
  • जबाबदारीने यशाची पायरी लवकर गाठता येते.
  • लोकांना जबाबदार माणसे जास्त आवडतात.
  • लोक जबाबदार माणसांवर जास्त विश्वास ठेवतात.
  • जबाबदारी तुमच्यात चांगले नेतृत्वगुण विकसित करायला मदत करते.

घेतलेली जबाबदारी तुम्हाला तुमच्या पुढील आणखी मोठ्या यशासाठी तयार करत असते. तुमचे कुटुंब, तुमची टीम तुमच्याकडे एका आशेने बघत असते. तुमच्यावरचा विश्वास कित्येक पटीने वाढून त्याला नवीन आयाम प्राप्त होतात.

हे करून तर बघा :-

  • मी घेतलेल्या निर्णयासाठी मीच सर्वस्वी जबाबदार आहे, असे प्रथम स्वतःला ठासून सांगा, जबाबदारी घेण्यात पुढाकार घ्या.
  • तुम्ही घेतलेली जबाबदारी सगळ्यांसमोर मांडा, अशाने तुमच्या टीमला, तुमच्या कुटुंबाला तुमचा अभिमान वाटेल.
  • तुम्ही घेतलेल्या जबाबदारीने प्रेरीत होऊन तुमची टीम, कुटुंबीयही तुम्हाला मदत करतील, किंबहुना काही भाग तेही स्वीकारतील.
  • जबाबदारी घेताना त्याचा चांगला अभ्यास करा. काही वेळेस, अशा कामाबद्दल स्वतःलाही शाबासकी द्या.
  • जबाबदारी घेतल्याने तुमची सेल्फ इमेज बदलेल. तेव्हा तुम्ही स्वत:ला सांगा की, मीसुद्धा जबाबदारी घेतली आहे.

– विश्वास वाडे

Author

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ मध्ये 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?