उद्योजकाचे नाव : पंकज प्रकाश घारे
व्यवसायाचे नाव : Landscape Wall System
जिल्हा : ठाणे
'स्मार्ट उद्योजक' (डिजिटल आवृत्ती) वार्षिक वर्गणी : ₹१४३ ➡️ SUBSCRIBE
(वर्षभर महिन्यातून एकदा डिजिटल मासिक तुमच्या व्हॉट्सअपवर येईल.)'स्मार्ट उद्योजक' (डिजिटल आवृत्ती) आजीवन वर्गणी : फक्त ₹२२२ ➡️ SUBSCRIBE
(यापूर्वी प्रसिद्ध झालेले १००+ अंक ई-मेलवर येतील व दर महिन्यातून एकदा ताजा अंक तुमच्या व्हॉट्सअपवर येईल.)जन्मदिनांक : २९ मे १९८६
व्यवसाय स्थापना वर्ष : २०१८
मुंबईत भांडुप येथे जन्मलेल्या पंकज घारे यांचे शिक्षण अमर कोर विद्यालय येथे झाले. व्ही.जे.टी.आय. येथे यंत्र अभियांत्रिकीमधून (मेकॅनिकल इंजिनिअरिंग) पदविका घेऊन लार्सन अँड टुब्रोमध्ये नोकरी करत असताना सरदार पटेल कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग येथे पदवी शिक्षण आणि व्यवसाय सुरू असतानाच लोकमान्य कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमधून त्यांनी Mechanical Engineering मधून Masters (M. E.) पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले.
२०१२ पासून लोढा डेव्हलपर्स, सॅमसंग आणि इतर कंपन्यांत नोकरी करून एकूण तेरा वर्षांचा अनुभव घेऊन २०१८ साली Landscape Wall Systems ची स्थापना पंकज घारे यांनी केली. Landscape Wall Systems फसाड क्षेत्रात कार्यरत आहे. इमारतींना बाहेरून काचा, ऍल्युमिनिअम, स्टील, सिलिकॉन वगैरे वापरून सुरक्षित केले जाते. याला फसाड (Facade) इंजिनिअरिंग किंवा Building Envelope असे म्हणतात.
२०१८ मध्ये कंपनीची सुरुवात बाजारात आधीच असलेल्या कंपन्यांना AutoCAD मधून Drawing देण्याची सुविधा देण्यापासून झाली. सोबतच एखाद्या इमारतीला पूर्ण Facade लावण्याची संधी मिळण्यासाठी त्याआधी आधीच Facade असलेल्या इमारतींच्या देखभाल आणि दुरुस्तीचे काम Landscape Wall Systems घेण्यास सुरुवात केली.
Larsen & Toubro, CBRE, Nirlon, TechnoIT Park यासाठी Facade Maintenance ची कामे यशस्वीरीत्या करताना; सोबतच MJ Shah ग्रुपसाठी Glass Partition की Raheja ग्रुपसाठी MS स्टीलचे Fabrication आणि Installation, Renewsys India साठी Double Glass Windows साठी Landscape Wall Systems नवीन कामेही पूर्ण केली गेली. Drawing साठी रुपये ५ हजारने झालेली सुरुवात करून कोरोना काळात ती मजल रुपये २६ लाखांचा प्रकल्प करण्यात झाली.
घरातील हवेतील गुणवता सुधारण्यासाठी नॅनो तंत्रज्ञानाने दक्षिण कोरियामध्ये बनवण्यात आलेली आणि भारतात २०२४ मध्ये आणलेली नॅनो फायबर जाळी मुंबईत डिस्ट्रिब्युट करण्याची जबाबदारी पंकज घारे यांच्याकडे आहे. या जाळीमुळे बाहेरून घरात किंवा ऑफिसमध्ये येणारी हवेतील नॅनो कण जाळीतच अडकून शुद्ध हवा घरात पाठवली जाते. जाळीमुळे सूक्ष्मजंतू, विषाणू, धूलिकण, परागकण घरात शिरत नाहीत. त्यासोबतच आत येणारी ५० टक्के उष्णता कमी होते.
पंकज घारे यांनी हिमालयातील गिर्यारोहण अनुभवावर आधारित ‘पहिले पाऊल’ या नावे संवेदना प्रकाशनद्वारे पुस्तक प्रकाशित केले. लॉकडाऊन काळात त्याचे इंग्रजी भाषांतर ‘THE SAR PASS TREK’ या नावे प्रकाशित केले. तसेच लडाख येथील सायकल प्रवासावर आधारित ‘ सफरछंद’ हे पुस्तक ग्रंथाली प्रकाशनद्वारे प्रकाशित केले.
गिर्यारोहणामुळे उंचीची आवड असलेल्या पंकज घारे आता उंच इमारतींसाठी Façade लावण्याच्या क्षेत्रात व्यवसाय करत आहेत. ‘मनात आल म्हणून’ हा अनेकविध विषयांवर आधारित तर Facade Maintenance विषयावरील त्यांचा ब्लॉग प्रसिद्ध आहे.
जीएसटी क्रमांक : 27AKUPG5858N1Z5
व्यवसायाचा पत्ता : C-311, वास्तू वृंदावन, प्लॉट ना. ३०, सेक्टर ८ए, ऐरोली, नवी मुंबई – ४००७०८
संपर्क क्रमांक : 9819663630
ई-मेल : Lwsfacade@gmail.com
संकेतस्थळ : www.Lwsfacade.com
Blog: https://facademaintenance.blogspot.com । https://pankajpghare.blogspot.com
तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमचीही 'उद्योजक प्रोफाइल' तयार करायची असेल तर 9833312769 वर "उद्योजक प्रोफाइल" असा मेसेज whatsapp करा.