निर्यात व्यवसायामधील कागदपत्रांची पूर्तता


₹७५० मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मागवा आणि त्यावर ₹२०० किंमतीचे 'एकविसाव्या शतकातील उद्योगसंधी' हे पुस्तक मोफत मिळवा. आजच ऑर्डर करा https://bit.ly/2YzFRct


निर्यात व्यवसाय आणि व्यवस्थापन या एकाच नाण्याच्या दोन भिन्न बाजू आहेत असेच म्हणावे लागेल. दुसर्‍या भाषेत सांगायचे झाल्यास, प्रत्येक यशस्वी निर्यातदाराने उत्तम व्यवस्थापन तंत्र आत्मसात केलेले असते; त्यामुळेच तो यशस्वितेच्या शिखरावर असतो. निर्यात व्यवसायात कागदपत्रांच्या पूर्ततेला (एक्स्पोर्ट डॉक्युमेंटेशन) अनन्यसाधारण महत्त्व आहे. निर्यातदाराने आंतरराष्ट्रीय पातळीवर व्यवसाय करताना कशाप्रकारे कागदपत्रांची पूर्तता करावी हे आता आपण बघू.

देशांतर्गत व्यापाराच्या विपरीत, आंतरराष्ट्रीय व्यापार हे एक अत्यंत शिस्तबद्ध तसेच संघटित क्षेत्र आहे. येथे प्रत्येक गोष्ट ही औपचारिकरित्या परिभाषित (डिफाइंड) आहे. आयात अथवा निर्यात करणार्‍या प्रत्येक उद्योजकानेही आवश्यक तसेच औपचारिक प्रशिक्षण घेऊन मगच व्यवसाय करणे इष्ट ठरते. आंतरराष्ट्रीय व्यवसायावर जागतिक व्यापार संघटना (डब्लूटीओ) ही हरप्रकारे नियंत्रण ठेऊन असते.

कागदपत्रांच्या पूर्ततेबाबतच्याही सर्व नियमावली या डब्लूटीओने परिभाषित व अधोरेखित करून ठेवल्या आहेत. जगातील प्रत्येक आंतरराष्ट्रीय व्यावसायिकाला त्या सर्व नियमांच्या चाकोरीमध्ये राहूनच जगात कुठेही व्यापार करणे बंधनकारक असते.

जगातील बहुतांश म्हणजे ९५ टक्के देशांमध्ये आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या बाबतीतील कागदपत्रे समानच असतात मग तो देश आफ्रिकेतील एखादा जंगली प्रदेश असो वा युरोप-अमेरिकेतील एखादा अतिप्रगत देश.

फक्त उरलेल्या पाच टक्के देशांमध्ये त्या त्या देशाच्या आंतरराष्ट्रीय व्यापारविषयक धोरणांमुळे काही अधिक कागदपत्रे जोडावी लागतात. त्यांचे संदर्भ आपल्याला त्या संबंधित देशाच्या वकिलातीकडून मिळतात.

निर्यातदाराने आंतरराष्ट्रीय व्यापार प्रारंभ करण्यापूर्वीच व्यवस्थित प्रॉडक्ट रिसर्च तसेच मार्केट रिसर्च करणे अपेक्षित आहे; जेणेकरून आपली निर्यातक्षम उत्पादनसापेक्ष संभाव्य बाजारपेठ (देश) निश्चित झाली, की त्या देशात व्यापार करण्यास आवश्यक त्या सर्व औपचारिक गोष्टींबद्दल अभ्यास करणे अगत्याचे ठरते. आता आपणास कदाचित हा प्रश्न पडला असेल हे कसे करावे? त्याचे उत्तर आपण पाहू.

प्रथम म्हणजे… यासंदर्भात आपण इंटरनेटवरील उपलब्ध माहितीचा आधार घेऊ शकता.

दुसरे म्हणजे… आपण ज्या देशात निर्यात करू इच्छित असाल, त्या देशामध्ये असलेल्या भारतीय वकिलातीकडून सर्व माहिती मिळवू शकता.

तिसरे म्हणजे… त्या आयातदार देशाच्या भारतातील वकीलातीमार्फतही माहिती मिळवू शकता व आपल्या व्यवसायाची दिशा ठरवू शकता.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे… जर आपला ग्राहक निश्चित असेल तर आपण थेट आपल्या संभाव्य ग्राहकाशी बोलून ही सर्व माहिती त्याच्याचकडून मिळवू शकता; असे करणे केव्हाही हितकारकच ठरते.

आपल्या भारताच्या एकूण निर्यातीची टक्केवारी कमी असण्याचे हेही एक महत्त्वाचे कारण आहे की, उद्योजकांमध्ये कागदपत्रांच्या पूर्ततेबद्दल असलेली अनाठायी भीती व दडपण. वास्तविक पाहता, आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये प्रत्येकच टप्प्यावर निर्धारीत केलेली काही विवक्षित कागदपत्रे आहेत आणि त्यांची पूर्तता करणे अनिवार्य आहे.

ती सर्व कागदपत्रे जागतिक पातळीवर समान असून एखाद्या अर्जसदृश कागदाच्या स्वरूपात आहेत. उद्योजकाने फक्त आपल्या व्यवसायसापेक्ष रिक्त असलेल्या जागा भरणे अपेक्षित असून त्यात क्लिष्ट वा जटिल असे काहीच नाही; हे येथे नमूद करणे आवश्यक वाटते.

देशांतर्गत व्यापारापेक्षा आंतरराष्ट्रीय व्यापार हा सर्वच बाजूंनी सुलभ तसेच सुटसटीत असून कोणीही अनावश्यक धास्ती न बाळगता सुरुवातीस एखाद्या जाणकार व मान्यताप्राप्त तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली व नंतर स्वत: अभ्यासपूर्ण दृष्टीने आत्मविश्वासाने सर्व बाबींची पूर्तता करावी.

– सौरभ दर्शने
(लेखक निर्यातदार व विदेश व्यापार सल्लागार आहेत.)
संपर्क : ८१०४० ५५४८९

Author

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ मध्ये 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?