उद्योजक म्हटलं की आपल्यासमोर नकळतपणे चित्र उभं राहू लागतं. प्रत्येकजण ज्याच्या त्याच्यापरिने ते चित्र रंगवत असतात. खरंतर आपल्या लहानपणापासून आपल्या मनावर असं सतत बिंबवलं जातं की, ‘लोकांना काय वाटेल’, ‘लोक काय विचार करतील?’
हा विचार करू नका. पण जेव्हा आपण एखाद्या उद्योजकाचा विचार करतो तेव्हा मात्र त्याला पाहून आपण लगेच त्याची पारख करतो आणि आपलं मत तयार करतो. त्यामुळेच त्याच्यादृष्टीने लोक काय म्हणतील, काय विचार करतील याचा त्याने विचार करावा लागतो.
‘First Impression is the Last Impression’ , त्यामुळेच उद्योजकाचं व्यक्तिमत्व कसं असावं? याचा अभ्यास करायला हवा. विशेषत: नव्याने व्यवसायात उतरू इच्छिणाऱ्यांना किंवा नव्यानेच व्यवसायात उतरलेल्या प्रत्येकाला आपलं व्यक्तिमत्व कशाप्रकारे घडवायला हवे याचा अभ्यास नक्कीच करायला हवा.
उद्योजकाचं प्रसन्न, शांत, त्याच्या व्यवसायाला शोभेसं, करारी आणि आत्मविश्वासपूर्ण व्यक्तिमत्त्व समोरच्यावर योग्य ती छाप पाडणारं ठरतं. म्हणूनच प्रत्येक उद्योजकाला त्याचं व्यक्तिमत्व हे नेहमी Presentable ठेवायला हवं. म्हणून याचा अर्थ असा नव्हे की तुम्ही स्वत:ला पूर्णपणे बदला.
उलट तुमच्या गुणांच्या रंगाने तुमचं व्यक्तिमत्व अधिक आकर्षक होतं. त्यामुळे योग्य तो ताळमेळं साधणारं तुमचं व्यक्तिमत्त्व असायला हवं.
अनेक वेळा Diplomatic वागणं ही उद्योगाची गरज असते त्यामुळे उद्योजकाला चतूरपणे ते जमलं पाहिजे. उद्योजकाचे चालणं, बोलणं, सार्वजनिक जीवनात वावरताना जपावं लागतं. या सगळ्याच्या ताळमेळेतूनच लोकांवर छाप पाडायला मदत होते.
उद्योजकाच्या उद्योग विश्वात सर्वात महत्त्वाचं असते ते त्याचं संवाद कौशल्य. जेव्हा आपण लोकांशी संपर्क करतो तेव्हा आपलं बोलणं हे मधूर, आश्वासक, आणि आपलेपणाचं असावं. यातूनच लोकांच्या मनाचा ताबा मिळवता येतो. कठीण प्रसंगातही उद्योजकाला आपलं डोकं शांत ठेवता आलं पाहिजे.
उद्योजकाने वादविवाद टाळावेत. कठीण प्रसंगीही प्रसन्न आणि चेहरा हसरा ठेवणं ज्याला जमतं तोच खरा उद्योजक असतो. उद्योजक हा मोकळ्या विचारांचा असावा. उद्योजकाला आपल्यासोबत काम करणाऱ्याला सोबत घेऊन पुढे जाता आलं पाहिजे. त्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे टीमवर्कची.
आपल्या टीमचं ऐकूण घेणं हे प्रत्येक उद्योजकाला जमायला हवं. इतरांची मतं समजून घेणं, त्यांना प्रोत्साहन देणं, त्यांच्या कामाचं क्रेडिट त्यांना देणं हे सगळं जमायला हवं. इतरांच्या कल्पनाशक्तीला प्रोत्साहन देऊन त्यांना मदत करायला हवी.
चांगला उद्योजक होण्यासाठी कुशल नेतृत्व गुणाची आवश्यकता प्रत्येक उद्योजकात हवी. यातूनच त्याची निर्णयक्षमता प्रबळ होते. आपलं मत, आपला निर्णय ठामपणे मांडणं आणि तो आचरणात आणणं हे उद्योजगाच्या व्यक्तीमत्त्वाला जास्तीत जास्त खुलवते.
उद्योजक हा शिस्तबद्ध असला तरच त्याचा व्यवसाय हा उत्तमरित्या चालतो. त्याचमुळे प्रत्येक उद्योजकाने शिस्तबद्ध असायलाच हवं. त्यामुळे कोणत्याही गोष्टीला यशस्वी करण्यासाठी सर्वात महत्त्वाचा ठरतो तो आपल्याकडे असणारा शिस्तीचा संस्कार. आत्मविश्वास आणि चौफेर, अभ्यासू वृत्ती या गुणांची कास धरली तर तुमचा हात प्रगतीच्या मार्गावर कोणीच धरू शकत नाही.
या सर्वा गुणांसह जेव्हा उद्योजक उद्योगविश्वात वावरतो त्यावेळी त्याच्यासमोर त्याचं ध्येय आणि उद्दिष्ट्य ठरलेलं असेल तर तो योग्य दिशेने वाटचाल करू शकतो. प्रत्येक उद्योजकाच्या आयुष्यात त्याचे ध्येय आणि उद्दिष्ट्य ठरलेलं असणं गरजेचं आहे.
आपल्या मतांशी एकनिष्ठ राहून दूरदृष्टीने, काळाची गरज लक्षात ठेवून जेव्हा एखादा उद्योजक वाटचाल करतो त्यावेळी उज्ज्वल भविष्याची ती नांदी असते.म्हणूनच उद्योजकाचे व्यक्तिमत्त्व हे सर्वसमावेशक असेल तर आदर्श व्यक्तिमत्त्व म्हणून लोकांसमोर एक नवा धडा तो तयार करून देतो आणि खऱ्या अर्थाने यशस्वी उद्योजक म्हणून उदयालाही येतो.
तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमचीही 'उद्योजक प्रोफाइल' तयार करायची असेल तर 9833312769 वर "उद्योजक प्रोफाइल" असा मेसेज whatsapp करा.