चष्म्यासारखी गोष्ट ऑनलाइन खरेदी करता येऊ शकते; ही किमया करून दाखवणारा जादूगर


₹७५० मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मागवा आणि त्यावर ₹२०० किंमतीचे 'एकविसाव्या शतकातील उद्योगसंधी' हे पुस्तक मोफत मिळवा. आजच ऑर्डर करा https://bit.ly/2YzFRct


आयआयएम-बंगळुरूमध्ये व्यवस्थापन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेत असताना २००७ मध्ये त्यांनी व्हॅल्यो टेक्नॉलॉजीज अंतर्गत सर्च माय कॅंपस हे पहिले व्यावसायिक पोर्टल लाँच केले. या साइटचा उद्देश विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या निवास, पुस्तके, इंटर्नशिप, कार-पूल सुविधा, अर्ध वेळ नोकरी अशा विविध प्रकारच्या समस्यांचे निराकरण करण्याचा होता.

त्याच्या लक्षात आलं की चष्मा उद्योग हा दुर्लक्षित उद्योगांपैकी एक आहे, ज्याचा तोपर्यंत ॲमेझाॅन आणि ई-बेसारख्या ई-कॉमर्स दिग्गजांनीदेखील फारसा विचार केलेला नव्हता. हे लक्षात घेऊन त्यांनी अमेरिकेत फ्लायर.काॅम लाँच केले आणि तेथे सकारात्मक प्रतिसाद मिळाल्यानंतर त्यांनी तो प्लॅटफॉर्म भारतात सुरू करण्याचा निर्णय घेतला. अशाप्रकारे पियुष बन्सल यांनी २०१० मध्ये भारतात ‘लेन्सकार्ट’ लाँच केले.

२०१० मध्ये पियुष बन्सल, अमित चौधरी आणि सुमीत कपाही यांनी ‘लेन्सकार्ट’ची स्थापना केली. ‘लेन्सकार्ट’ ही एक भारतीय ऑप्टिकल प्रिस्क्रिप्शन आयवेअर रिटेल चेन आहे, जिची स्थापना नवी दिल्लीमध्ये झाली. सप्टेंबर २०२० पर्यंत ‘लेन्सकार्ट’ची भारतातील ४० हून अधिक शहरांमध्ये ५००+ दुकाने होती.

त्याची नवी दिल्लीतील उत्पादन सुविधा महिन्याला ३ लाख चष्मे तयार करते. पियुष बन्सल मायक्रोसॉफ्टमध्ये काम करत होते. त्यांनी व्हॅल्यू टेक्नॉलॉजीज ही कंपनीदेखील स्थापन केली, जी ‘लेन्सकार्ट’ची मूळ कंपनी आहे.

भारतीयांमध्येच नव्हे, तर एकूणच खरेदीदारांमध्ये ‘और दिखाओ’, म्हणजेच आणखी व्हरायटी दाखवा ही भावना प्रबळ असते. हे लक्षात घेऊन लेन्सकार्ट इंडिया आपल्या ग्राहकांना ५००० हून अधिक शैलींच्या फ्रेम्स आणि ४५ विविध प्रकारच्या आणि उत्कृष्ट दर्जाच्या लेन्स ऑफर करते. हे शक्य होतं डिझाइन आयवेअरमधील ट्रेंडसवर लक्ष ठेवणारे स्टायलिस्ट आणि डिझाइनर्सच्या इन-हाउस टीममुळे.

आपली उत्पादनं विकसित करताना उत्पादनाची उत्कृष्ट गुणवत्ता, ग्राहकांसाठी विविधता, उत्पादनातील नाविन्यपूर्णता, उत्कृष्ट मार्केटिंग स्ट्रॅटेजी आणि ३-डी चाचणी सुविधा यासारख्या सेवा, या सगळ्याचा विचार केला जातो. ‘लेन्सकार्ट’चे लक्ष केवळ उत्पादनाच्या ट्रेंडिनेसवर नाही तर त्याच्या टिकाऊपणावर आणि गुणवत्तेवरदेखील असते.

जर्मनीमधून आयात केलेल्या रोबोटिक तंत्रज्ञानाचा वापर केल्यामुळे ‘लेन्सकार्ट’ हा भारतातील एकमेव ब्रँड आहे जो ३ दशांश अचूकतेसह चष्मा बनवू शकतो. ‘लेन्सकार्ट’ने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आयवेअर उद्योगात क्रांती केली आहे. प्रथम ग्राहकांना त्यांची पहिली फ्रेम ‘लेन्सकार्ट’ विनामूल्य देते.

गेल्या काही वर्षांत ‘लेन्सकार्ट’ने त्यांचे मार्केटिंग मॉडेल बदलले आहे आणि ते ओम्नी-चॅनल रिटेल मॉडेलचे अनुसरण करते. ओम्नी-चॅनल रिटेल मॉडेल ग्राहकांसाठी उपलब्ध खरेदीच्या विविध पद्धती एकत्रित करते. ओम्नी-चॅनल मॉडेलमध्ये व्यवसाय ऑनलाइन तसेच ऑफलाइन मोडमध्ये सेवा प्रदान करतो.

सुरुवातीला ‘लेन्सकार्ट’ची फक्त ऑनलाइन उपस्थिती होती, परंतु लवकरच त्यांनी ऑफलाइनमध्येदेखील आपला ठसा उमटवला. त्यांची आता भारतातील ३०+ शहरांमध्ये ५५० हून अधिक स्टोअर्स आहेत. भारतीय ग्राहक आयवेअरची ऑनलाइन खरेदी करण्यास थोडे घाबरत होते, म्हणून ‘लेन्सकार्ट’ने आपली स्वतःची स्टोअर्स उघडली.

ग्राहकांना उत्पादन प्रत्यक्ष वापरून पाहण्याची आणि त्याच्या गुणवत्तेबद्दल पूर्ण खात्री होण्यासाठी त्याला स्पर्श करून अनुभवण्याची इच्छा होती. तसेच प्रत्यक्ष स्टोअर उघडल्याने ब्रॅण्डचा व्यवसाय जलद वाढला आणि ‘लेन्सकार्ट’ने ग्राहकांचा विश्वास संपादन केला.

प्रेमजीइन्व्हेस्ट, केदारा कॅपिटल, चिराते व्हेंचर्स, टीपीजी ग्रोथ, राजीव चित्रभानू, अडवेक, इक्विप कॅपिटल, आयएफसी व्हेंचर कॅपिटल ग्रुप इत्यादी १२ गुंतवणूकदारांनी ‘लेन्सकार्ट’ला फंडिंग केले आहे. रतन टाटा आणि क्रिस गोपालकृष्णन यांनीही ‘लेन्सकार्ट’मध्ये गुंतवणूक केली आहे.

मार्च २०१८ मध्ये विप्रोचे अध्यक्ष अझीम प्रेमजी यांनी ₹४ कोटींची गुंतवणूक केली, ज्यामुळे कंपनीचे मूल्यांकन ₹३००० कोटी झाले. डिसेंबर २०१९ मध्ये ‘लेन्सकार्ट’ने सॉफ्टबँक व्हिजन फंडातून $२७५ दशलक्ष उभे केले ज्यानंतर कंपनीचे मूल्य $१.५ अब्ज झाले.

‘व्हिजन टू इंडिया’ या आपल्या व्हिजनसह लेन्सकार्ट इंडिया कमी किंमतीचे लेन्सकार्ट लाइट हे फ्रँचायझी मॉडेल घेऊन लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे. ‘लेन्सकार्ट’ने रोज वापरता येतील अशा काँटॅक्ट लेन्सेसदेखील लाँच केल्या.

त्यांच्या ॲक्वालेन्स या उत्पादनाच्या मदतीने लेन्सकार्ट फक्त रु.४० प्रतिदिन अशा परवडणाऱ्या दरात चष्मा उपलब्ध करत आहेत. प्रत्येक भारतीयाने चश्मा घालावा तर लेन्सकार्टचा असा विचार करत कंपनीचा पुढील प्रवास सुरू आहे.

– चंद्रशेखर मराठे

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ मध्ये 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?