Advertisement
उद्योगोपयोगी

नवीन कामाची सुरुवात करतानाच ठरवा, पुढे किती चालायचयं

'स्मार्ट उद्योजक' मासिकाच्या २० प्रिंट अंकाचा सेट (३ दिवाळी अंक समाविष्ट) फक्त ₹४०० मध्ये उपलब्ध. स्टॉक मर्यादित. बुक करण्यासाठी - https://rzp.io/l/2BfpgK4v

कोणत्याही कामाची सुरुवात कधी करायची हे आपल्याला माहीत असतं, परंतु त्यात आपण पुढे किती चालायचं, कुठे थांबायचं, हे आपण सहसा नाही ठरवत. थांबणं म्हणजे ते प्रॉडक्ट, ती सेवा किंवा ती कंपनी बंद करणं नव्हे, तर त्यातून तुमचा प्रत्यक्ष सहभाग कमी करणं होय आणि ती नवीन सुरू झालेली कंपनी, सेवा किंवा प्रॉडक्ट्स स्वयंचलित प्रणालीवर चालवणं, त्यासाठी योग्य त्या सिस्टम्स आणि प्रोसेसेस राबवणं.

अझीम प्रेमजी

आपल्या बाबतीत बर्‍याचदा नेमकं उलट असतं. आपण सर्व काही स्वतःच करत असतो आणि तेही अनेक दिवस, अनेक वर्षे. पुढे आपण त्यात अडकतो. मजेची गोष्ट म्हणजे बर्‍याचदा ती नवीन सुरू केलेली कंपनी, सेवा, किंवा प्रॉडक्टस् हे आहे तिथेच, त्याच स्थितीत असतात किंवा लयाला गेलेले असतात. याला एकमेव जबाबदार व्यक्ती म्हणजे तुम्ही स्वतः. होय, तुम्ही स्वतः. कारण तुम्हीही तिथेच असता जिथून तुमची सुरुवात झालेली असते. अशा वेळी तुम्ही प्रथम स्वतःवर काम करा म्हणजे एखाद्या कामात पुढे किती चालायचं, कुठे थांबायचं, हे तुम्हाला कळेल.


फक्त ₹१२३ मध्ये 'स्मार्ट उद्योजक' मासिकाचे आजीवन वर्गणीदार व्हा!

या वर्गणीत या आधीची ६५+ मासिके आणि पुढे दर महिन्याला व्हाट्सएप वर ताजे मासिक मिळवा. आजच नोंदणी करा : https://rzp.io/l/smartudyojak

इथे आपल्याला विप्रोचे संस्थापक अझीम प्रेमजी याचं उदा. घेता येईल. एके काळी चांगला चाललेला त्यांचा वनस्पती तेलाचा व्यवसाय काळाची पावलं ओळखून विकला व ‘आय.टी.-सॉफ्टवेअर’च्या व्यवसायात उडी घेतली. आज विप्रो त्या क्षेत्रातील एक अग्रगण्य कंपनी झाली आहे. त्याचबरोबर एफ.एम.सी.जी. अ‍ॅण्ड इलेक्ट्रिकल्स यासारख्या क्षेत्रातही विप्रोचा चांगला दबदबा आहे.

हे होऊ शकतं!

हे ई-बुक खरेदी करण्यासाठी जाहिरातीवर क्लिक करा.

१. सुरू करतानाच, आपण त्या गोष्टीला पुढे कुठपर्यंत पोहोचवायचं हे ठरवलं तर तुमची गती व वेळ निश्‍चित करायला तुम्हाला मदत होईल.

२. थांबायचं कुठे माहीत असल्यामुळे तुम्हाला, एकाच गोष्टीत अडकून न पडता, पुढे काय? हे माहीत असतं.

३. थांबायचं कुठे माहीत नसल्यास गतीचा, वेळेचा व पैशाचा अपव्यय होतो.

४. अशानं तुमचं पुढचं ध्येय साध्य करणं सहज शक्य होऊ शकतं.

५. अशाने तुम्ही एकाच वेळी अनेक गोष्टींवर काम करू शकता.

६. अशानं तुमच्या वाटेतील काट्यांना फारसं महत्त्व राहत नाही.

७. अशानं तुमचे निकटवर्ती, तुमचे सहकारी, तुमचे गुंतवणूकदार व भागधारक तुमच्यावर प्रचंड विश्वास टाकायला तयार होतात.

८. तसेच तुमच्या पुढच्या नवीन प्रयत्नांना त्यांचा सतत पाठिंबा मिळतो.

९. अशाने वाटेतील अडथळ्यांना सामर्थ्य राहत नाही.

हे करून तर बघा!

१. तुम्ही नवीन सुरू केलेल्या कंपनी, सेवा किंवा प्रॉडक्ट्समध्ये डोक्याने गुंतून जा, मनाने नाही.

२. कोणत्याही नवीन कामात भावनांपेक्षा डोकंच जास्त वापरा.

३. अशाने जर का ते नुकसान करणारं शाबीत झालं तर, त्यात तुम्ही लगेच आवश्यक ते फेरबदल करू शकता किंवा ते बंद करू शकता.

४. पुढचं क्षितिज नेहमी तुमची वाट बघत असतं. त्याला साद घालायला तयार राहा.

५. कोणत्याही गोष्टीची सुरुवात करताना त्याचा पूर्ण आराखडा तयार करा व तो तज्ज्ञाकडून तपासून घ्या आणि नंतर तो अमलात आणा.

६. एकाच कामासाठी प्लॅन-ए व प्लॅन-बी तयार असू द्या.

७. तुमच्या कृतीवर तुमचा संपूर्ण विश्वास असू द्या.

८. मी यात यशस्वी होईनच, असं स्वतःला बजावूनच कामाची सुरुवात करा.

९. कामासाठी तुमच्यातलं १०० टक्के द्या.

– विश्वास वाडे
९८९२६१७०००


Free Newsletter on WhatsApp & Telegram

'स्मार्ट उद्योजक'चे उद्योजकता आणि व्यवसायविषयक लेख तसेच बातम्या मोफत मिळावा WhatsApp आणि टेलिग्रामवर. WhatsApp : https://bit.ly/2kAPLGD । टेलिग्राम : https://t.me/smartudyojakmedia

error: Content is protected !!