स्वतःच्या व्यवसायाची Franchise देण्याची योजना कशी कराल?


₹७५० मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मागवा आणि त्यावर ₹२०० किंमतीचे 'एकविसाव्या शतकातील उद्योगसंधी' हे पुस्तक मोफत मिळवा. आजच ऑर्डर करा https://bit.ly/2YzFRct


उद्योगात महत्त्वाचा टप्पा असतो तो म्हणजे उद्योग सुरू होणे, कारण जोपर्यंत तुमचा उद्योग सुरू होत नाही, तोपर्यंत तुम्ही उद्योगाच्या विकासाबद्दल विचार नाही करू शकत.

जर उद्योगात पहिले १,००० दिवस तुम्ही टिकू शकलात, तर नक्कीच तुम्ही, तुमचा उद्योग पुढे घेऊन जाऊ शकता. म्हणून उंच भरारीसाठी आपली प्राथमिक गरज आहे, आपल्या औद्योगिक पंखांची मजबूती… कारण जर उद्योगात तुमचे मार्केटिंग, सेल्स आणि उद्योग विकासाचे पंख भक्कम असतील, तर तुम्ही नक्कीच उद्योगात गगनभरारी घेऊ शकता.

१. उद्योग वृद्धी कशी करणार?

उद्योगात वृद्धी करायची असेल किंवा उद्योगात विकास हवा, तर खालील गोष्टी करणे आवश्यक आहे:

आधी स्वत:च्या उद्योगाचे मूल्यमापन करा : यामध्ये मासिक खर्च, पैशांची आवक, महिन्याचा सेल्स, होणारा नफा, होणारा मासिक बिझनेस, मासिक ग्राहक ह्यांचा विचार करावा. ह्यावरील बाबींवरून तुम्ही तुमच्या उद्योगाचे मूल्यमापन करू शकतात.

उद्योगाचे संघटन : उद्योगात एकत्रीकरण आणि एकत्रीकरणात संघटन (association) हा महत्वाचा टप्पा आहे. कारण ह्या उद्योगांच्या संघटनने (association) तुम्ही एकमेकांच्या मदतीने पुढे जाऊ शकता आणि तुमचे ब्रॅंडिंगसुद्धा व्यवस्थित होऊ शकते.

सर्व लायसेंसेस तयार करणे : उद्योगाच्यावृद्धीमध्ये महत्त्वाचा भाग येतो लायसेंस. जर तुमच्या उद्योगात तुमची महत्त्वाची कागदपत्रे आणि लायसेंस योग्य असतील, तर तुम्ही तुमच्या ध्येयाकडे बिनविरोध धावू शकता.

डिस्ट्रिब्यूटर, डिलर, एजेंट आणि फ्रांचाईझी : तुम्ही जेव्हा एखादा उद्योग सुरू करता, त्यावेळी तुम्हांला तुमच्या हाताखाली काम करणारी टीम असणे आवश्यक असते. त्यासाठी तुमचे डिलर, एजेंट आणि फ्रांचाईझी तुम्हांला मदत करू शकतात.

२. उद्योगाची सुवर्ण किल्ली –

फ्रांचायझी : उद्योगात जर फास्ट आणि वेगाने प्रगती करायची असेल आणि स्वत:चे उद्योग साम्राज्य स्थापन करायचे असेल, तर सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणजे franchising. कारण फ्रांचायझी केवळ उद्योगात विकास करत नाही तर आपल्या ब्रँडला जीवंत ठेवते.

फ्रांचाईझी उद्योगात फ्रांचायजर कंपनी (उद्योगाचा मालक) स्वत:चे लोगो, ब्रँड, पेटेंट, आपल्या फ्रांचायझीला औद्योगिक तत्त्वावर वापरायला देतो आणि त्यात जो नफा निर्माण होतो, त्याची रॉयल्टी फ्रांचाईझर कंपनीला (उद्योगाचा मालकाला) मिळू लागते आणि ब्रँड वाढू लागतो.

या सर्व गोष्टींमुळे फ्रांचायझीला उद्योगाची सुवर्ण किल्ली म्हणतात. कारण उद्योगाच्या ब्रँडला वाढवण्याचे आणि मार्केट्मध्ये टिकवण्याचे काम फ्रांचायझी करते. फ्रांचायझीच्या माध्यमातून तुम्ही सहज उद्योग आणि ब्रँड वाढवू शकता.

३. उद्योग फ्रांचायझी करताना महत्त्वाचे मुद्दे :

तुमच्या उद्योगाला जाणा : उद्योगात फ्रांचायझी मॉडेल निर्माण करायचे असेल तर उद्योगातील बारकावे समजा आणि उद्योगाच्या शक्ती / साधनसंपत्तीचा खोलवर विचार करा. यामुळे उद्योगातील सकारात्मक आणि नकारात्मक बाजू तुम्ही समजू शकतात, ह्याचा फायदा उद्योजकाला फ्रांचायझी निर्मितीसाठी होतो.

कायदेशीर तरतूद : फ्रांचाईझी मॉडेल निर्माण करताना महत्त्वाचा भाग असतो, कायद्याची तरतूद चोख असणे आवश्यक आहे. कारण तुमच्या बिझिनेस मॉडेलसाठी कायद्याची जोडणी व मांडणी आवश्यक आहे. जेणे करून कायदेशीररित्या आपल्या पुढील स्टेप्स बदलल्या जातात.

ग्रोथ प्लानिंग : फ्रांचायझीसाठी महत्त्वाचा भाग येतो ग्रोथ प्लानिंग. आपल्याला ह्या उद्योग विश्वात किती उंच उडायचे आणि किती औद्योगिक विकास करायचा हे आधीच ग्रोथ प्लानिंगमध्ये समजणे / जाणणे आवश्यक आहे. यशाच्या दिशेने पावले खूप योग्य उचलली जातात.

फ्रांचायझीच्या हक्कांवर निर्बंधन : जेव्हा एखादी कंपनी / उद्योग स्वत:ची फ्रांचाईझी बिझिनेस मार्केटमध्ये सुरू करतो तेव्हा महत्त्वाचा भाग म्हणजे फ्रांचाईझीच्या हक्कांवर निर्बंधन आणि हक्कांवर हवा असलेला उद्योग अंकुश. ह्यामुळे भविष्यकालीन नुकसान टळू शकते.

मार्केटिंग आणि सेल्स फ्रांचाईझी : ह्यात महत्त्वाचा मुद्दा असतो, कंपनीने बनवून घेतलेल्या फ्रांचाईझी मॉडेलला मार्केट करणे आणि विकणे. त्यासाठी आपल्या कंपनी, प्रोडक्ट्स किंवा सर्व्हिसेसचे ब्रांडिग, प्रमोशन, जाहिरात करणे आवश्यक आहे, त्यामुळे सेल्स निर्माण होतो.

फ्रांचाइझी सपोर्ट : फ्रांचाईझीला सर्वात महत्वाचा सपोर्ट असतो, तो म्हणजे योग्य वेळी योग्य सपोर्ट देणे. त्यामुळे फ्रांचाइझी टीम अतिशय कार्यशील आणि व्यवस्थित राहते आणि आपण मोठे नुकसान टाळू शकतो.

४. फ्रांचाइझीला लागणार्‍या प्राथमिक गरजा :

गुंतवणूक : गुंतवणूक हा फ्रांचाईझी मॉडेलमध्ये असलेला महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण नसताना आर्थिक गुंतवणूक चुकीची आहे. म्हणून गुंतवणूक ही योग्य असावी.

पायाभूत सुविधा/गरजा : फ्रांचाईझी उद्योगात पायाभूत सुविधा काय मिळतात हे आवश्यक आहे. कारण जर पाया भक्कम असेल तर नक्कीच तुमच्या पायाभूत गरजा पूर्ण होतात.

मनुष्यबळ : मनुष्यबळ ही सर्वात महत्वाची साधन संपत्ती आहे. त्याचा वापर योग्य केला तर मनुष्यबळ एकत्र केले जाते.

५. फ्रांचाईझीसाठी कायदेशीर तरतूद :

फ्रांचाईझी आराखडा आपण खालील कलमांअंतर्गत कायदेशीर सल्लागाराच्या मार्गदर्शनाने बनवू शकतो.

 •  Indian Contract act,1872
 • Intellectual Property Law
 • Competition act 2000
 • Consumer Protection act, 1986
 • Taxation Laws
 • Labors Law
 • Transfer of Property act, 1882
 • Foreign Exchange Management act,, 1999

६. फ्रांचाईझी उद्योगाचे स्वरुप :

 • प्रोडक्ट / ट्रेडमार्क
 • फ्रांचाईझी उद्योगाच्या स्वरुपाची (बिझिनेस फोरम्याट) फ्रांचाईझी
 • रुपांतरण (कंन्व्हर्जन) फ्रांचाईझी
 • जॉइन्ट वेन्चर
 • रिजनल फ्रांचाईझी
 • मास्टर फ्रांचाईझी

७. फ्रांचाईझी मॉडेल प्लानिंग खालील गोष्टींवर बनते :

 • ऑपरेशन प्लानिंग आणि ट्रेनिंग
 • मार्केटिंग प्लानिंग आणि मार्केटिंग मटेरिअल
 • कायदेशीर(लिगल) तरतूद आणि ट्रेडमार्क प्रोटेक्शन
 • फ्रांचाईझी सपोर्ट सिस्टम आणि त्यांचे सेल्स टार्गेट

८. फ्रांचाईझी टिप्स:

 • तुमच्या उद्योगाचा गाभा (Core Value) / मूलभूत भाग तुम्हांला तोंडपाठ असणे आवश्यक आहे.
 • फ्रांचाईझी देताना किंवा निवडताना चोखंदळपणे काम करावे आणि निवड करावी.
 • ट्रेनिंग / प्रशिक्षणात काळजीपूर्वक गुंतवणूक करावी.
 •  फ्रांचाईझर म्हणून आपल्या फ्रांचाईझीची उत्तम काळजी घ्यावी आणि हवा तिथे सपोर्ट पण करावा परंतु, जिथे गरज असेल तिथे आपली पकड उद्योगावर आणि फ्रांचाईझीवर बनवून ठेवावी.
 • प्रतिकृतीनिर्मिती करण्यासाठी सर्वत्र एकच अशी सिस्टम बनवावी.
 • आपल्या उद्योगाचे पुढारीतत्व स्वीकारून फ्रांचाईझीला वृद्धीसाठी मदत करावी.
 • आपल्या उद्योगाचे प्रमाणीकरण करून घ्यावे.

अशा पद्धतीने आपण आपल्या उद्योगाचे फ्रांचाईझी मोडेल FICO, FOCO, COCO, FOFO निवडू शकतो आणि मार्केटमध्ये आणू शकतो. त्यामूळे तुम्ही तुमचा उद्योग सर्व दिशांनी वाढवू शकता आणि फ्रांचाईझी निर्माण करू शकतात. उद्योगात फ्रांचाईझी हा सर्वात महत्त्वाचा कणा आहे.

त्यामुळे जर कोणालाही फ्रांचाईझी द्यायची किंवा घ्यायची असेल तर कंन्स्लटंट करून योग्य मार्गदर्शन नक्की घ्या, ज्याने फ्रांचाईझी आणि फ्रांचाईझर दोघेही खुश राहतील आणि उद्योग विश्व नक्कीच वाढेल.

– डॉ. शिवांगी झरकर
८८५०५६००५६
shivangizarkar@gmail.com

Author

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ मध्ये 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?