अभिमन्युने गर्भात असतानाच कृष्णमामाकडून चक्रव्युहामध्ये शिरण्याचा मौलिक धडा घेतला हे सर्वज्ञात आहे आणि हेही तितकेच खरे आहे की आज आपण सर्वच क्षेत्रात आगेकूच करूनही अजूनसुद्धा अनेक समस्यांना तोंड देत आहोत.
साधं समीकरण : प्रत्येक छोट्या-मोठ्या समस्येमुळे कुणी चिंता, अधिरता, दु:ख, एकलकोंडीपणा, डिप्रेशन, डायबेटिस, रागीटपणा, ओशाळलेले आणि कधीतरी सर्वच संपवावे अशा विचारांना सामोरे जातात.
कधी मदतीचा हात हवा असतो तर कधी फक्त माझे बोलणे ऐकून घेणारा. सर्वच ठिकाणी औषध हा रामबाण उपाय ही नसतो.
मी, समुपदेशक पूनम खैरनार, बारा वर्षे Pharmacy क्षेत्रात काम करताना रोग्याची व त्याच्या सोबत परिवाराची मानसिकता जवळून अनुभवली व दोघांना समुपदेशनाच्या माध्यमातून सावरण्याचा प्रयत्न केला. तसेच डॉ. राजन भोंसले व डॉ. मिन्नु भोंसले ह्यांच्या मार्गदर्शनाखाली समुपदेशनाचे धडे गिरवले. आज गेल्या चार वर्षांपासून मी “Relationship & Well-Being Counselor” म्हणून पूर्णवेळ कर्यरित आहे.
Pre-Marriage Counseling द्वारे विवाह संस्थेला सामोरे जाण्यास अपेक्षित वधू-वरांचे मार्गदर्शन करते. Post-Marriage Counseling द्वारे लग्नात उद्भवलेले समस्यांचे निवारण करण्यास पती/पत्नी/दोघांना मार्गदर्शन करते. बोधी मिलन मेरेज ब्यूरो, पनवेल येथे मी Pre-Marriage Counselor म्हणून कार्यरीत आहे.
'स्मार्ट उद्योजक' (डिजिटल आवृत्ती) वार्षिक वर्गणी : ₹१४३ ➡️ SUBSCRIBE
(वर्षभर महिन्यातून एकदा डिजिटल मासिक तुमच्या व्हॉट्सअपवर येईल.)'स्मार्ट उद्योजक' (डिजिटल आवृत्ती) आजीवन वर्गणी : फक्त ₹२२२ ➡️ SUBSCRIBE
(यापूर्वी प्रसिद्ध झालेले १००+ अंक ई-मेलवर येतील व दर महिन्यातून एकदा ताजा अंक तुमच्या व्हॉट्सअपवर येईल.)पौंगडावस्थेतील मुले, त्यांच्या समस्या – शारीरिक व मानसिक/घरातच चोरी करणे/स्वभावातील विलक्षण तफावत अशा अनेक समस्या, Child Counseling द्वारे सोडवते.
लैंगिक शोषण, आज वाढत चाललेल्या राक्षसाची रोकथाम करण्यास – Sex Education Program च्या मार्गाने सर्व वयोगट, जोडपे, अपेक्षित वधु-वर, शाळा, शिक्षक, Expecting parents, ह्यास मार्गदर्शन करते.
सध्या मी Magician Rugby Foundation आणि Alpha Seniors Home, Vasai मध्ये समुपदेशक म्हणून काम करत आहे.
मुंबई, नवी मुंबई, पुणे व नाशिक ह्या शहरांमधून माझे काम सातत्याने सुरु आहे. साधना विद्यालय (सायन), स्वामी विवेकानंद शाळा (सानपाडा), बचत गट, कोपरी पुलिस स्टेशन, R J Hrishiraj, राज बिसनेस थॉट्स, मालाड तर्फे LIC चे कर्मचारी व अनेक परीवारांनीही समुपादेशातून लाभ घेतला आहे.
मदत मागितल्या शिवाय मिळत नाही व मदत हवी आहे हे आतून येत नाही तोपर्यंत संकट/समस्या/चिंता/आजार यांच्याशी चार हात करणे थांबणार नाही.
“Let’s Live… Laugh & Love!!”
पूनम आर. खैरनार
समुपदेशक
(B. Pharmacy, CBT, REBT, SEX EDUCATOR)
०९००४८७४०९३
poonam.counselor@rediffmail.com
तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमचीही 'उद्योजक प्रोफाइल' तयार करायची असेल तर 9833312769 वर "उद्योजक प्रोफाइल" असा मेसेज whatsapp करा.