उद्योगोपयोगी

स्वसंवादातून होते सकारात्मक विचारांची सुरुवात

स्पेशल ऑफर : ₹५०० प्रिंट मासिकाची वार्षिक वर्गणी भरा आणि डिजिटल अंकात अर्ध पान रंगीत जाहिरात मोफत मिळवा!
Book Now: https://imjo.in/Xx7Uq6

जाणून घ्या सकारात्मक विचारांचे आरोग्यासाठीचे फायदे

‘Negative विचार करू नकोस’, हे वाक्य आपण बरेचदा ऐकतो. तेव्हा मनात प्रश्न येतो तो असा की, सकारात्मक विचार करणं म्हणजे नेमकं काय?

आज आपण हेच जाणून घेणार आहोत. इथे एक गोष्ट लक्षात ठेवणे आवश्यक आहे ती म्हणजे सकारात्मक विचार करण्याची सुरुवात जरी नकारात्मक विचार थांबवण्यापासून होत असली, तर सकारात्मक विचार म्हणजे नकारात्मक गोष्टींकडे आणि जीवनातले छोटे आनंद यांच्याकडे दुर्लक्ष करणे असं नक्कीच नाही.


'स्मार्ट उद्योजक' डिजिटल मासिकाची आजीवन वर्गणी मिळवा फक्त ₹ १२३ मध्ये! सोबत आतापर्यंतचे सर्व अंकही मोफत मिळवा!

BOOK NOW: https://imojo.in/3x3a5zn


या उलट सकारात्मक विचार हे अप्रिय गोष्टींकडे जास्त सकारात्मकपणे आणि जास्त कार्यशीलतेने पाहण्यास प्रवृत्त करतात. त्यामुळे व्यक्ती सर्वात वाईट गोष्टींचा विचार न करता सर्वोत्कृष्ट/सर्वोत्तम गोष्टींचा ध्यास घेऊ लागते.

कित्येकदा सकारात्मक विचारांची सुरुवात ही स्वसंवादातून होते. स्वसंवाद म्हणजे सोप्या भाषेत सांगायचे तर स्वतःशी संभाषण करणे. स्वसंवादामध्ये आपल्या मनात आपल्याच अव्यक्त, स्वयंचलित विचारांचा न संपणारा प्रवाह सतत वाहत असतो.

हे स्वयंचलित विचार सकारात्मक किंवा नकारात्मक यापैकी एक असू शकतात. स्वसंवादात काही विचार हे तर्कशास्त्रातून निर्माण होतात. उर्वरीत इतर विचार हे माहितीच्या अभावी आपल्या मनात तयार झालेल्या गैरसमजुतींमधून तयार होतात.

आपल्या डोक्यात चालत असलेले विचार मुख्यत्वे: नकारात्मक असल्यास व्यक्ती आयुष्याकडे नैराश्यपूर्ण दृष्टीने बघते. या उलट हे विचार जितके जास्त सकारात्मक असतील, तितकी व्यक्ती आयुष्याबद्दल जास्त आशावादी दृष्टिकोन ठेवते.

सकारात्मक विचारांचे आरोग्याला होणारे फायदे :

सकारात्मक विचार आणि आशावादी दृष्टिकोन यांचा आरोग्यावर होणाऱ्या परिणामांचे संशोधन सतत चालूच आहे. यांमध्ये खालीलपैकी काहींचा समावेश आहे :

हे ई-बुक खरेदी करण्यासाठी जाहिरातीवर क्लिक करा.

1. वाढलेलं आयुष्यमान
2. उदासीनतेमध्ये घट
3. चिडचिडेपणा कमी होणं
4. प्रतिकारशक्तीमध्ये वाढ
5. मानसिक आणि शारीरिक आरोग्याचा विकास
6. हृदय आणि रक्तवाहिन्यांच्या रोगांविरुद्ध प्रतिकार क्षमता विकसित होणे
7. तणाव आणि अडचणींच्या सामना करण्याची क्षमता

असंही म्हटलं जात की, सकारात्मक आणि आशावादी विचारांची व्यक्ती निरोगी जीवनशैली अंगिकारण्यावर भर देते, जसं जास्तीस्त शारीरिक व्यायाम करणे, निरोगी आहार जोपासणे, आणि प्रमाणाबाहेर धूम्रपान किंवा मद्यपान न करणे.

सकारात्मक विचारसरणीमुळे लोकांना आरोग्यामध्ये वरील लाभ कसे होतात, हे अजूनही स्पष्ट झालेले नाही. याबद्दल एक मत असं मांडलं जातं की, तणावपूर्ण परिस्थितीत सकारात्मक विचार लढण्याची क्षमता विकसित करतो, ज्यामुळे शरीरावर ताणतणावाचे परिणाम कमी होण्यास मदत होते.

– टीम स्मार्ट उद्योजक

Free Newsletter on WhatsApp & Telegram

'स्मार्ट उद्योजक'चे उद्योजकता आणि व्यवसायविषयक लेख तसेच बातम्या मोफत मिळावा WhatsApp आणि टेलिग्रामवर. WhatsApp : https://bit.ly/2kAPLGD । टेलिग्राम : https://t.me/smartudyojakmedia

WhatsApp chat
error: Content is protected !!