कुक्कुटपालन व्यवसाय
उद्योगसंधी

कुक्कुटपालन व्यवसाय

स्मार्ट उद्योजक मासिक प्रिंट आवृत्ती वर्षभर घरपोच मिळवा फक्त रु. ५०० मध्ये! नोंदणीसाठी : https://imjo.in/Xx7Uq6

कुक्कुटपालन हा भारतातील फार प्राचीन व्यवसाय आहे. शेतीस पूरक म्हणून ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात तो केला जातो. शेतीसोबत हे एक चांगले उपजीविकेचे साधनही आहे. व्यवसाय म्हणून करताना दोन फायदे होतात ते म्हणजे मांस व अंडी उत्पादन.

भारतात कुक्कुट संशोधनात विविध प्रकारच्या कोंबड्यांच्या जाती विकसित केल्या आहेत. पारंपरिक पद्धतीने कोंबडीपालन केले तर त्यात विकासाच्या संधी फार कमी आहेत, त्यामुळे कुक्कुटपालन करू इच्छिणार्‍यांनी या संदर्भातील मूलभूत माहिती व प्रशिक्षण घेणे गरजेचे आहे. शास्त्रीय पद्धतीने व्यवस्थापनातील बारकावे व व्यावसायिक बाबींवर अभ्यास करून हा व्यवसाय केला तरच तो चांगल्या प्रकारे यशस्वी करता येईल. कुक्कुटपालन हे अंडी उत्पादनासाठी करायचे की मांसासाठी याचा अगोदरच अभ्यास करायला हवा. शहरी व ग्रामीण भागांत ब्रॉयलर कोंबड्यांना जास्त मागणी आहे. कोंबड्यांच्या विविध जाती आणि त्यांची उपलब्धताही जाणून घ्यावी. कोंबड्यांचे खाद्य, वयोमानानुसार त्यांचे व्यवस्थापन, त्यांचे लसीकरण आदी गोष्टींची काळजी घ्यावयास हवी.

कुक्कुटपालन हा व्यवसाय म्हणून करताना आवश्यक जागा, आजूबाजूच्या इतर कोंबड्यांच्या फार्म्स, त्यांचे प्रकार, उपलब्ध बाजारपेठ, आपण निवडलेल्या जागेपासून बाजारपेठेचे अंतर, खाद्य, लसीकरण आदी उपलब्धतेचा आढावा घ्यावा.

Advertisement

– टीम स्मार्ट उद्योजक

‘स्मार्ट उद्योजक’ मासिकाचे वर्गणीदार व्हा!


Free Newsletter on WhatsApp

उद्योजकता आणि व्यवसायविषयक माहिती WhatsApp वर मिळवण्यासाठी ९८३३३१२७६९ हा क्रमांक आपल्या मोबाईलमध्ये save करा आणि त्यावर आपले नाव, जिल्हा व तालुका पाठवा.