कृषीक्षेत्राला बळकटी आणण्यासाठी सरकार आणि खाजगी क्षेत्र एकत्र

केंद्रीय कृषी मंत्रालय आणि ‘फिक्की’ यांच्या संयुक्त उपक्रमाचा प्रारंभ

केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्रसिंग तोमर यांनी आज नवी दिल्ली येथे कृषी क्षेत्रात खाजगी – सार्वजनिक भागीदारी तत्त्वावर आधारित प्रकल्प व्यवस्थापन एककाचा आरंभ केला. यावेळी बोलताना तोमर यांनी कृषीक्षेत्राला बळकटी आणण्याची गरज असल्याचं प्रतिपादन केले, त्यामुळे इतर क्षेत्रेही मजबूत होतील असे ते म्हणाले.

खाजगी – सार्वजनिक भागीदारी हे शेतीच्या विकासासाठी आदर्श मॉडेल आहे आणि खाजगी सार्वजनिक भागीदारी तत्त्वांवरील प्रकल्पांनी शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करण्याच्या माध्यमातून त्यांना लाभ पोहोचवण्यावर लक्ष केंद्रीत करायला हवे, असेही ते म्हणाले. देशासाठी तसेच समाजासाठी कृषी क्षेत्राचे सक्षमीकरण आवश्यक आहे, असे तोमर यांनी सांगितले.

व्यापार आणि उद्योग क्षेत्र मजबूत आणि संघटित आहे. त्यांना सर्व साधने उपलब्ध आहेत ती कृषीक्षेत्राच्या विकासाला प्रोत्साहन देऊ शकतील. कृषीसंबधित पायाभूत सुविधांसाठी एक लाख कोटींचा निधी १० हजार शेतकरी उत्पादक संघटनांची (FPO) स्थापना आणि प्रधानमंत्री पीक विमा योजना यासारख्या योजनांच्या माध्यमातून सरकार कृषी क्षेत्राच्या विकासासाठी सातत्याने पावले उचलत आहे.

शेतकरी संघटनांच्या स्थापनेसाठी त्यांना मजबूती देण्यासाठी तसेच शेतकऱ्याना नवनवीन तंत्रज्ञानाशी परिचय करून घेता यावा, शेतीतून लाभदायक उत्पन्न आणि जागतिक दर्जाचे उत्पादन घेता यावे, यासाठी सरकारचे प्रयत्न जारी आहेत. सरकारच्या पुढाकाराने शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यात येत असून त्याचे सुपरिणाम आपल्याला दिसत आहेत, असे तोमर यांनी सांगितले.

Author

तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमचीही 'उद्योजक प्रोफाइल' तयार करायची असेल तर 9833312769 वर "उद्योजक प्रोफाइल" असा मेसेज whatsapp करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद व्हा आणि अनेक लाभ मिळवा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?