ही कथा आहे एका प्रेरक आईची, एका प्रेरणादायी उद्योजिकेची

आजकालच्या स्पर्धेच्या युगात जेव्हा दोन्ही पालक नोकरी करत असतात, तेव्हा मुलांचं संगोपन हा एक मोठा प्रश्न सर्वच पालकांसमोर असतो. असाच प्रश्न ठाण्यातल्या एका आईला होता. स्वत:च्या मुलासाठी पाळणाघराचा शोध घेत असताना तिला ज्या अडचणी आल्या, तिने जे पाळणाघरांच्य नावे चालणार्‍या व्यवसायांचं विदारक दृष्य पाहिलं.

त्यातून जन्म झाला ‘आप्रा’चा. ठाण्यात सुरू झालेलं ‘आप्रा’ हे असं पाळणाघर ज्यात घरात आई आपल्या मुलांचा सांभाळ करेल असाच प्रत्येक मुलाला सांभाळलं जातं.

प्राजक्ता रामाडे ही ठाण्यात राहणारी एक सामान्य स्त्री. लग्नानंतर नवर्‍यासोबत त्याच्या नोकरीनिमित्त ती विदेशात राहिली. तिथे तिने वेळ घालवावा म्हणून शाळेत मुलांना शिकवणंही केलं होतं. ते अमेरिका आणि जर्मनी या देशांमध्ये राहिले. या दोन्ही देशांत तिने पूर्व प्राथमिक विभागात शिक्षक म्हणून काम केलं होतं. तिथेच त्यांना तिला दोन मुलं झाली.

जर्मनीमध्ये असताना प्राजक्ताला दुसरा मुलगा झाला. जन्माच्याच दिवशी बाळाच्या हृदयात छिद्र असल्याच कळल्यामुळे त्याला त्याच रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागाच्या दुसऱ्या इमारतीमध्ये हलवण्यात आलं. दुसऱ्याच दिवशी अजून एक छिद्र असल्याचं कळलं.

यामुळे एकूणच प्राजक्ताला त्या इमारतीकडे जायचीच भीती वाटू लागली. पण सुदैवाने डॉक्टरांनी दिलासा दिला की लगेचच उपचार करणे आवश्यक नाहीत. ४ महिन्यांनी बाळाची open heart surgery झाली आणि कालांतराने बाळ अगदी सर्वांप्रमाणे सामान्य झालं.

काही वर्षांनी प्राजक्ता भारतात परतली. इथे आल्यावर तिला समजलं की ती ज्या शाळेत शिकली त्याच शाळेची CBSE बोर्डाची इंग्रजी शाळा सुरू होत आहे. मुलांना शिकवण्याची आवड असल्यामुळे तिने शाळेत संपर्क साधला आणि आपल्याला स्वेच्छेने शाळेला या नवीन उपक्रमात सहकार्य करण्याची ईच्छा असल्याबद्दल सांगितलं. तिचं शिक्षण आणि परदेशातील अनुभव हे दोन्ही पाहता संस्थाचालकांनी तिची नवीन शाळेच्या पूर्व प्राथमिक विभागाची मुख्याध्यापक म्हणूनच नियुक्ती केली.

प्राजक्ताच्या कार्यकाळात तिने शाळा उभी करणं, अगदी वर्गांची रंगसंगती, वस्तूंची मांडणी ते अभ्यासक्रम इत्यादी सर्व गोष्टींचा अनुभव घ्यायला मिळाला. या काळात प्राजक्ताने मुलांसाठी वेगवेगळे उपक्रम जसं की लहान मुलांच्या खेळण्यांचे प्रदर्शन इत्यादी राबवले. तिच्या या मेहनतीमुळेच पहिल्याच वर्षी शाळेचे प्रवेश १०० टक्के झाले. पुढे एक वर्षाने या कामातून प्राजक्ताने रजा घेतली.

भारतात परत आल्यापासून प्राजक्ता आपल्या मुलांसाठी पाळणाघर शोधत होती. तेव्हा तिने पाळणाघरांच्या निरनिराळ्या तर्‍हा पाहिल्या. एका ठिकाणी तर १०x१० च्या जागेत २१ मुलं बसली आहेत, कुठे पाळणाघरात होणाऱ्या मारहाणीमुळे मुलांना तिथे जायला वाटणारी भीती, कुठे मुलांच्या आरोग्याबद्दलची अनास्था, मुलांबद्दल असंवेदनशीलता असं चित्र पाहायला मिळालं.

यापैकी जी काही चांगली, प्रतिथयश पाळणाघरं होती, त्यात तिने आपल्या मुलांना ठेवण्याचा निर्णय घेतला. मात्र धाकट्या मुलावर झालेल्या शस्त्रक्रियेची माहिती कळताच सर्व प्रतिथयश पाळणाघरांनी त्याच्या प्रवेशाला नकार दिला.

पाळणाघराचा शोध घेताना आणखी एक बाब प्राजक्ताच्या लक्षात आली ती म्हणजे कोणतेच पाळणाघर आणि पूर्व प्राथमिक शाळा यांची सांगड घातली गेली नव्हती. म्हणजे शाळा एकीकडे तर पाळणाघर दुसरीकडे. मुख्य म्हणजे शाळा आणि पाळणाघर एकाच संकुलात असेल, तर मुलं आणि पालक दोघांची रोजची त्रेधातिरपिट कमी होईल आणि मुलांच्या विकासावर भर देता येईल.

एकूणच बालसंगोपनातील ही दुरावस्था पाहून प्राजक्ताने स्वत: यात बदल घडवण्यासाठी पुढाकार घेण्याचा निर्णय घेतला. प्राजक्ता आणि तिच्या नवर्‍याने विचार करून स्वतःची आवड आणि काळाची गरज यांचा मेळ घालून स्वतःचं पाळणाघर सुरू करण्याचा निर्णय घेतला. यातून त्यांना स्वत:च्या ज्ञानाचा आणि अनुभवाचा लाभ लोकांना करून द्यायचाच होता; पण एक आदर्शसुद्धा घालून द्यायचा होता.

पाळणाघराचं नाव ज्याच्यासाठी पाळणाघराचा शोध घेत असताना हा प्रवास इथवर आला त्या आपल्या दोन्ही मुलांच्या नावांच्या आद्यक्षरांवरून ठेवलं. आद्य आणि प्रथांश यांच्या संयोगातून ‘आप्रा’ हे नाव ठरलं. आपण जिथे जन्माला आलो आणि वाढलो, त्याच ठिकाणाच्या कृतज्ञतेपायी ठाण्यातच हे सेंटर सुरू करायचं प्राजक्ताने ठरवलं. अशाप्रकारे “Every child deserves best” या philosphy वर आप्रा सुरू करण्यत आलं.

‘आप्रा’मध्ये मुलांच्या नैसर्गिक वाढीवर भर दिला जातो. त्यामुळेच ‘आप्रा’मध्ये CCTV ही एक आवश्यकता सोडून इतर कोणतेही electronic gadget वापरलं जात नाही. त्यामुळे मुलांमध्ये वाढत असलेली चिडचिड, आक्रस्ताळेपणा, राग या आणि अशा नकरात्मक भावनांना पूर्णविराम मिळतो. तसेच घर सोडून इतर घटकांशी जोडून घेण्याच्या प्रक्रियेत येणारा तंत्रज्ञानाचा अडसर ‘आप्रा’मध्ये आपोआपच दूर होतो.

इथे आभासी गोष्टींपासून दूर राहून प्रत्येक गोष्ट स्वतःच अनुभवायला दिल्या जातात. म्हणजे फोन किंवा टीव्हीच्या स्क्रीनवर आंबा दाखवण्यापेक्षा तो हातात घेऊन प्रत्यक्ष अनुभवण्यावर भर दिला जातो. यातूनच मुलांमध्ये नैसर्गिकरीत्या जाणीव-जागृती निर्माण होते.

‘आप्रा’मध्ये मुलांना शिकवताना “hands on learning” पद्धतीने शिकवले जाते. त्यामुळे स्वत: सगळे अनुभवातून शिकल्यामुळे मुलांच्या ज्ञानेंद्रियांमध्ये समन्वय प्रस्थापित आणि विकसित होतो. तसेच स्वतः प्रयोग करत असल्यामुळे मुलांचे fine motor skills, cognitive skills वाढू लागतात.

अशाप्रकारे नकळतपणे सर्व बाजूने मुलांची वाढ साधली जाते. तसेच मुलांची एखाद्या गोष्टीतील रुची कुठल्याच कारणाने कमी होणार नाही, त्यांना हवे ते करण्याचं स्वातंत्र्य मिळेल, एखादी गोष्ट करताना त्याचा आनंद ते मूल घेईल, या गोष्टींची काळजी आप्रामध्ये घेतली जाते.

यापुढे जाऊन मुलांमध्ये दैनंदिन आयुष्यातील आवश्यक सवयी विकसित करण्यासाठी Living Skills Development Program राबवला जातो. खाल्यानंतर ताट उचलून ठेवणं, पाणी सांडल्यावर ते पुसणं अशा गोष्टी यामध्ये शिकवल्या जातात.

याचा प्रत्यय पालकांना घरी येतो. तसेच आप्रामध्ये मुलांकडून रोज संध्याकाळी शुभमकरोती, स्तोत्रं म्हणणं, योगा करणं, ध्यानधारणा अशा activities करून घेतल्या जातात. या सर्व गोष्टी त्यांना त्यांच्या भाषेत शिकवल्या जातात.

एकूणच आजी-आजोबांसोबत असताना जे संस्कार मुलांना मिळतात, तसे संस्कार येथे होतील असा प्रयत्न आप्रामध्ये होतो. मुलांना माणूस म्हणून समजून घेऊन त्यांच्या भावनांचा आदर आप्रामध्ये केलं जातो, त्यामुळेच त्यांच्यावर अगदी दुपारी झोपण्यासाठीसुद्धा कोणतीच जबरदस्ती केली जात नाही.

मुलांची उत्सुकता कुठल्याही प्रकारे दाबली जाणार नाही आणि त्यांचा आनंद टिकून राहील याच्याकडे कटाक्षाने लक्ष दिले जातं. अशाप्रकारे मुलांच्या केलेल्या संगोपनामुळेच सुरुवातीला जिथे ५ मुलांनी केंद्र सुरू झालं, तिथे वर्षभरानंतर मुलांची संख्या ३० वर गेली आहे, तेही कोणत्याही मार्केटिंगशिवाय.

प्राजक्ताचं असं स्पष्ट मत आहे की, चार वर्षापर्यंत मुलांना लिखाण शिकवूच नये, कारण ते शारीरिकदृष्टया त्यासाठी तयारच नसतात. त्यामुळे या काळात शाळेकरता त्यांना तयार करणं हे आवश्यक असतं. यामध्ये त्यांच्या मेंदूचा विकास, त्यांच्यामधील इतर कौशल्यांचा विकास या गोष्टी येतात.

म्हणूनच आप्रामध्ये Homework करून घेतला जात नाही. त्याउलट आप्रामध्ये मुलांमधील क्षमता, आवड ओळखून त्यानुसार वागवले जाते, त्यानुसार मुलांना योग्य माहिती आणि त्याला साजेसं वातावरण मिळतं. त्यामुळे मुलं आवडीच्या विषयातून असल्यामुळे योग्य दिशेने मुलांचा विकास व्हायला सुरुवात होते आणि मुलांचे नैसर्गिक कलागुणही विकसित होत जातात.

हे सर्व घडवून आणण्यासाठी एकावेळी मुलांच्या एका मर्यादित संख्येवर काम करणं आवश्यक असतं. त्यामुळेच आप्रामध्ये एका वर्गातील मुलांची संख्या कमाल १० असते, जेणेकरून प्रत्येक मुलाला योग्य आणि आवश्यक तितका वेळ दिला जातो. याचा परिणाम असा झाला की, Annual Day च्या event मध्ये प्रत्येक मुलाने प्रत्येक गोष्टीत आपला सहभाग तर नोंदवलाच, पण त्यांची झालेली प्रगती पाहून पालकसुद्धा अवाक झाले. त्यामुळे मुलांच्या प्रगतीला आणि वाढीला पोषक असे उपक्रम घेण्यावरच प्राजक्ताचा भर असतो.

या सर्व गोष्टींचा लाभ मुलांना आप्रामध्ये सकाळी ८ ते संध्याकाळी ८ पर्यंत घेता येतो. तसेच दिवसभरात सेंटरमध्येच आरोग्याच्या दृष्टीनेच ताजे जेवण आणि नाश्ता पुरवला जातो. या आहाराचाही मुलांच्या आरोग्याच्या दृष्टीने योग्य काळजी घेतली जाते.

येत्या काळात आताच्या केंद्रामध्ये जास्तीत जास्त परिपूर्णत्व असल्याची खात्री झाल्यावरच इतरत्र म्हणजे फक्त भारतातच नाही तर विदेशातही ‘आप्रा’च्या शाखा सुरू करण्याची महत्त्वाकांक्षा प्राजक्ता बाळगते.

संपर्क : प्राजक्ता रामाडे
८२९१११५१७५
Email: aapra.earlylearning@gmail.com

Author

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ मध्ये 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?