प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियान


₹७५० मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मागवा आणि त्यावर ₹२०० किंमतीचे 'एकविसाव्या शतकातील उद्योगसंधी' हे पुस्तक मोफत मिळवा. आजच ऑर्डर करा https://bit.ly/2YzFRct


योजनेचे नाव : प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियान (PMKUVA)

योजनेचा प्रकार : राज्यातील युवक-युवतींना विविध क्षेत्रामधील कौशल्य प्रशिक्षण देणे

योजनेचा उद्देश : राज्यातील सर्व इच्छुक उमेदवारांना त्यांच्या रुचीच्या क्षेत्रांत कौशल्य प्रशिक्षण देऊन त्यांना अधिक मागणी असलेल्या उद्योग, सेवा व तत्सम क्षेत्रात रोजगार/स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे. राष्ट्रीय पातळीवर रोजगाराची अधिकतम संधी असलेली खालील ११ क्षेत्रे कौशल्य विकासासाठी प्राधान्य क्षेत्रे म्हणून निवडण्यात आली आहेत.

१. बांधकाम (Construction)
२. उत्पादन व निर्माण (Manufacturing Production)
३. वस्त्रोद्योग (Textile)
४. ऑटोमोटिव्ह (Automobile)

५. आतिथ्य (Hospitality)
६. आरोग्य देखभाल (Healthcare)
७. बँकिंग, वित्त व विमा (Banking, Finance Insurance)
८. संघटित किरकोळ विक्री (Organized retail)

९. औषधोत्पादन व रसायने (Pharmaceutical Chemicals)
१०. माहिती तंत्रज्ञान व संलग्न (IT and ITes)
११. कृषी प्रक्रिया (Agro Processing)

वरील ११ प्राधान्यांची क्षेत्रे, तसेच इतर अन्य महत्त्वाची क्षेत्रे, उदा. कृषी, जेम्स अ‍ॅण्ड ज्वेलरी अशा अन्य अनेक क्षेत्रांमध्ये राज्यातील उमेदवारांना प्रशिक्षित करून त्यांचे सक्षमीकरण करणे.

योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नाव : सदरील योजना सर्व प्रवर्गांसाठी लागू आहे.

योजनेच्या प्रमुख अटी : १५ ते ४५ या वयोगटातील कोणत्याही व्यक्तीस कोणत्याही क्षेत्राचे कौशल्य धारण करण्याकरीता महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी (MSSDS) कडे संबंधित प्रशिक्षण पुरविणार्‍या सूचिबद्ध असलेल्या संस्थांकडे अर्ज करून प्रशिक्षण मिळविता येते. सदर प्रशिक्षणाचा लाभ घेण्यासाठी MSSDS च्या संकेतस्थळावर सूचिबद्ध करण्यात आलेल्या प्रशिक्षण संस्थांची यादी उपलब्ध आहे. तसेच आवश्यक असलेल्या अन्य अटी, शर्ती आणि नियमांची माहिती उपलब्ध आहे.

आवश्यक कागदपत्रे : आधारकार्ड व ऐच्छिक प्रशिक्षणाकरिता लागणारी किमान शैक्षणिक अर्हता धारण केले असल्यासंबंधीचे सर्व प्रमाणपत्रे.

दिल्या जाणार्‍या लाभाचे स्वरूप : प्रत्येक लाभार्थ्याला देण्यात येणार्‍या प्रशिक्षणावर होणार्‍या खर्चाची पूर्तता राज्य शासनामार्फत केली जाते.

अर्ज करण्याची पद्धत : इच्छुक उमेदवाराने महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी (MSSDS) च्या संकेतस्थळावरून, पाहिजे त्या क्षेत्रातील प्रशिक्षण देणार्‍या संस्थांच्या यादीमधून संबंधित संस्थेकडे संपर्क करणे आवश्यक आहे.

अंदाजे प्रक्रियेला लागणारा वेळ : महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीकडे (MSSDS) सूचिबद्ध असलेल्या प्रशिक्षण संस्थांकडे अर्ज केल्यावर त्या संस्थेकडून सदर प्रशिक्षण सुरू करण्यात येणार्‍या पुढील तुकडीत समावेश करण्यात येईल

संपर्क कार्यालयाचे नाव व पत्ता : महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी, ४ मजला, एम.टी.एन.एल. बिल्डिंग, जी.डी. सोमानी मार्ग, कफ परेड, मुंबई ४००००५.

Author

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ मध्ये 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?