प्रसाद शिराळे

उद्योजकाचे नाव : प्रसाद शिराळे
जन्म दिनांक : १२ फेब्रुवारी, १९९२
जन्म ठिकाण : माजलगाव
विद्यमान जिल्हा : परभणी
शिक्षण : M. Com.

ई-मेल : prasadshirale10@gmail.com
भ्रमणध्वनी : ८३२३७७८०४२ / ८६००८५११३३
फेसबुक अकाऊंटची लिंक : fb.com/carecomputers.p/

कंपनीचे नाव : केअर कॉम्प्युटर्स
उत्पादने / सेवा: कॉम्प्युटर्स, लॅपटॉप्स, प्रिंटर्स, CCTV विक्री व दुरुस्ती

माझं नाव प्रसाद शिराळे. माझं ‘केअर कॉम्प्युटर्स’ नावाने दुकान आहे. २०१७ साली गुडीपाडव्याच्या दिवशी एका छोट्याशा दुकानात किराणा मालाच्या दुकानात मी माझ्या व्यवसायाची सुरुवात केली.

व्यवसाय सुरू करायचा म्हटलं की धोका पत्करण्याची तयारी तर घ्यावीच लागते, पण मी एवढं सांगू शकतो की स्वत: जर विश्वास असेल तर आपण काहीही करू शकतो. हा विश्वास आणि लहानपणापासूनच व्यवसाय करायची आवड असल्यामुळे आर्थिक जुळवाजुळव करून मी व्यवसात उतरलो.

सुरुवातीला आर्थिक गणित जुळवणं खूप कठीण गेल. कधी कधी महिण्याचा किराया पण निघणं कठीण होतं, पण येईल ते काम करत गेलो. भांडवल तशे जेमतेमच होते, पण हळूहळू सर्व वाढवत गेलो. आता मी माझं दुकान बाजूलाच नवीन मोठया जागेत स्थलांतरित केले.

आता माझा व्यवसाय सुरळीत चालू असून तो मी अधिक अधिक वाढविण्याचा प्रयत्न करत आहे. माझ्या दुकानात कॉम्प्युटर्सशी निगडीत सर्व कामे केली जातात.

Author

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ मध्ये 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?