Advertisement

तुमच्याकडे थोडा फावला वेळ आहे आणि तुम्ही त्या वेळेचा सदुपयोग पैसे कमावण्यासाठी करू इच्छित असाल, तर ‘स्मार्ट उद्योजक’ तुमच्यासाठी व्यवसायाची संधी घेऊन आले आहे.

 • आमचे ‘व्यवसाय प्रतिनिधी’ होऊन तुमच्या शहरात, गावात, तालुक्यात ‘स्मार्ट उद्योजक’चा प्रसार करू शकता आणि चांगले पैसेही कमवू शकता.
 • ‘स्मार्ट उद्योजक’ हे व्यवसायविषयक प्रसारमाध्यम आहे. लोकांना व्यवसाय करायला उद्युक्त करणं आणि व्यवसायवाढीसाठी मार्गदर्शन करणं हे ‘स्मार्ट उद्योजक’चं काम आहे. तुम्ही लोकांपर्यंत ‘स्मार्ट उद्योजक’ पोहोचवून चांगले पैसे शकता.
 • प्रिंट तसेच डिजिटल मासिक रूपात ‘स्मार्ट उद्योजक’ दर महिन्याला प्रकाशित होते. तुम्ही लोकांना याची ओळख, माहिती करून द्या आणि याचे वर्गणीदार होण्यास उद्युक्त करा. प्रत्येक वर्गणीमागे तुम्हाला आकर्षक कमीशन मिळेल.
 • ‘स्मार्ट उद्योजक प्रकाशन’ची मुद्रित पुस्तके किंवा डिजिटल पुस्तके विकू शकता.
 • ‘स्मार्ट उद्योजक’चे व्यवसाय प्रतिनिधी म्हणून तुम्ही तुमच्या पातळीवर उद्योजक, व्यावसायिक, व्यापारी यांना भेटा. त्यांनाही ‘स्मार्ट उद्योजक’ मासिकाची ओळख करून द्या; शिवाय त्यांना त्यांच्या व्यवसायवाढीसाठी उपयुक्त होईल अशा ‘स्मार्ट उद्योजक सूची’ आणि जाहिरातींचे विविध पर्याय सांगा.
 • हे काम तुम्ही प्रत्यक्ष आणि ऑनलाइन अशा दोन्ही पद्धतीने करू शकता.
 • कामाचे १-२-१ प्रत्यक्ष ट्रेनिंग दिले जाईल व आवश्यकता लागेल तेव्हा सहकार्यही केले जाईल.
 • तुम्हाला ‘व्यवसाय प्रतिनिधी’ म्हणून ओळखपत्र आणि पावती पुस्तक मिळेल.
 • तुम्ही उद्योग-व्यवसाय विषयक बातम्या तसेच स्थानिक उद्योजकांच्या मुलाखतीही घेऊ शकता. या संदर्भात संपादकांशी आधी बोलून घेतलेलं असणं गरजेचं राहील.

‘व्यवसाय प्रतिनिधी’ म्हणून जोडले जाण्याची प्रक्रिया

 • ‘व्यवसाय प्रतिनिधी’ म्हणून जोडले जाण्यास इच्छूक असल्यास ९८३३३१२७६९ या नंबरवर WhatsApp करा.
 • त्यानंतर तुम्हाला ऑनलाइन फॉर्म पाठवला जाईल. त्यात तुमची माहिती भरून सोबत attachment मध्ये आधार कार्ड, पॅन कार्ड व फोटो भरून पाठवावा लागेल.
 • ‘व्यवसाय प्रतिनिधी’ म्हणून जोडले जाण्यासाठी ₹५०० अनामत (deposit) ठेवावे लागेल. सहा महिन्यांनी हे परत केले जाईल.
 • तुमची ‘व्यवसाय प्रतिनिधी’ म्हणून केलेली निवड ही सहा महिन्यांसाठी असेल. तुमचा परफॉर्मन्स पाहून पुढे वाढ केली जाईल.
error: Content is protected !!