व्यसनांतून स्वत:ला सोडवून चार व्यवसायांचे मालक झाले प्रवीण गोन्नाडे

pravin gonnade udyojak

प्रवीण शिवशंकर गोन्नाडे हे मूळचे नागपूरचे. शून्यातून आपले विश्व उभे करणारे प्रवीण आज करोडोंची उलाढाल करत आहेत. भविष्यातील आपले ध्येय साध्य करण्यासाठी आज ते जोमाने प्रयत्न करत आहेत, कारण कष्टाला पर्याय नाही असे त्यांचे स्पष्ट मत आहे. आयुर्वेद हे प्राचीन भारतीय शास्त्र आहे हे आपण जाणतोच. २०१० पासून प्रवीण आयुर्वेदिक फार्मा प्रॉडक्ट्सच्या क्षेत्रात काम करतायत.

मावेन एजन्सी (आयुर्वेदिक औषधांचे वितरक), मावेन आयुर्वेदिक औषधालय (आयुर्वेदिक औषधांचे दुकान), मावेन हर्बल्स (आयुर्वेदिक औषधांचे उत्पादक) आणि मावेन डायग्नोस्टिक सेंटर (पॅथोलॉजी) या आतापर्यंत त्यांच्या चार फर्म आहेत.

आयुर्वेदाचा प्रचार, प्रसार आणि सर्व सेवा एकाच छताखाली उपलब्ध करून देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. ‘मावेन हर्बल्स’चे आयुर्वेदिक औषधांचे उत्पादक म्हणून म्हणून तीन ब्रँड आहेत. ‘अश्वजीत एम टॅबलेट’ हे सामान्य आणि सेक्शुअल अशक्तपणावर,‘ऑर्थोवेन एम’ हे वातव्याधीसाठी, डायबेटिक पेशन्टसाठी ‘काऊली डीएम् टॅबलेट’ आणि पुढे तीन प्रॉडक्ट्स पाइपलाइनमध्ये आहेत.


'स्मार्ट उद्योजक' (डिजिटल आवृत्ती) वार्षिक वर्गणी : ₹१४३ ➡️ SUBSCRIBE
(वर्षभर महिन्यातून एकदा डिजिटल मासिक तुमच्या व्हॉट्सअपवर येईल.)
'स्मार्ट उद्योजक' (डिजिटल आवृत्ती) आजीवन वर्गणी : फक्त ₹२२२ ➡️ SUBSCRIBE
(यापूर्वी प्रसिद्ध झालेले १००+ अंक ई-मेलवर येतील व दर महिन्यातून एकदा ताजा अंक तुमच्या व्हॉट्सअपवर येईल.)

हा एवढा व्याप उभा करताना त्यांनी अपार मेहनत केलीय. प्रवीण यांच्या मनात बालपणीच उद्योगाची बीज रोवली गेली. त्यांच्या घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत हालाखीची होती. आईवडील आणि तीन भावंडे असे त्यांचे कुटुंब होते. मोठी बहीण तृषाली पखाले, जी भारतीय रेल्वेमध्ये वेलफेअर इन्स्पेटक्टर आहे, मोठे बंधू अनिल गोन्नाडे, ज्यांची जीआयएस सर्व्हे करणारी स्वत:ची कंपनी आहे. एकूण दीडशे लोक कामाला आहेत त्यांचाकडे असे तीन भावंड.

प्रवीण सांगतात, वडिलांच्या सुतगिरणीतील नोकरीवर घर चालत होते. पुढे काही कारणांनी ही सुतगिरणी बंद झाली आणि वडिलांची नोकरी गेली. खाणारी तोंडे पाच, हाताला काम नाही. आम्ही मुले फारच लहान होतो, पण घर तर चालवायचे आहे त्यामुळे मग आमच्या वडिलांनी हातगाडीवरून बांगड्या विकायचा व्यवसाय सुरू केला.

बांगड्यांचा व्यवसायात तसे काही फारसे उत्पन्न नव्हते त्यामुळे वडिलांच्या एकट्याच्या कमाईवर घर चालणे कठीण होते मग आईनेही डोक्यावर तीस किलोपर्यंत वजनाची टोपली घेवून दारोदार फिरून बांगड्या विकायला सुरुवात केली. तरीही हातातोंडाशी गाठ होती. आमचे दोन वेळचे जेवण मिळेल एवढीच काय ती कमाई.

परिस्थितीमुळे आपण आपल्या मुलांना शिक्षण देऊ शकणार नाही हे वडिलांच्या लक्षात आले आणि त्यांनी मोकळेपणाने आपल्या मुलांना हे बोलून दाखवले, पण आम्हा तीनही भावंडाना शिक्षणात रस होता त्यामुळे परिस्थितीचे अवडंबर न करता आम्ही स्वत: कामं करून आमचे शिक्षण घेतले. हाच तो प्रवास जो आम्हाला शिकवत गेला.

बारावीनंतर काही वाईट मित्रांचा संगतीला लागून वाईट व्यसनं लागली होती. दारू आणि सिगारेटचं व्यसन तर इतकं जडलं होतं की इंग्लिश दारूपासून सुरू होऊन देशी दारूपर्यंत गेलं होतं. अशा वेळी माझी बहिण माझ्यासाठी देवदूत बनली आणि मला लवकरच व्यसनमुक्त केलं. खरं तर या व्यसनांतून सुटका झाली म्हणून मी इथपर्यंत पोहोचू शकलो. मला घडवणारी व्यक्ती म्हणजे माझी ताई.

मला मोठं काम करण्याची खरी प्रेरणा ही माझ्या मोठ्या भावाकडून मिळते. ते मला नेहमी सांगतात, की कामात नेहमी मोठा विचार करून काम करावं. प्लॅनिंग नेहमी पुढच्या पाच वर्षांसाठी करावं आणि कामात नेहमी सातत्य ठेवावं.

आमच्या बाबांना नोकरीचा अनुभव होता त्यामुळे ते आम्हाला नेहमी सांगत मुलांनो छोटा मोठा काही उद्योगधंदा करा. सुरुवातीला कदाचित तो छोटा असेल, पण भविष्यात तुम्ही तो नक्की वाढवू शकाल. त्यातच परिस्थितीमुळे लहानपणापासूनच छोटी मोठी काम करत होतो त्यातून आमचे व्यवसायाचे विचार तयार झाले.

मी बी.कॉम. कॉम्प्युटर अ‍ॅप्लिकेशनमध्ये ग्रॅज्युएशन झालो आहे. याचसोबत माझा नॅचरोपॅथीमध्ये डिप्लोमा झाला आहे. शिक्षण घेत असताना मी ट्युशन क्लासेस घेत होतो, पण मला म्हणावं तसं ते जमले नाही. मग मी नाशिकच्या ‘चैतन्य फार्मा’ या कंपनीमध्ये मेडिकल रिप्रेझेन्टेटिव्ह म्हणून २०१० साली कामाला लागलो आणि माझा फार्मा क्षेत्रात प्रवेश झाला आणी खर्‍या अर्थाने आयुष्याला कलाटणी मिळाली.

इथे कामाला असताना कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर पुष्कर पाठक यांच्या मार्गदर्शनाने मी घडलो, तसेच कंपनीतले माझे नागपूरचे वरिष्ठ योगेश राऊत यांनी मला लहान भाऊ समजून सगळ्या गोष्टी शिकवल्या. त्यावेळी आमच्या कंपनीची पॉलिसी होती की जे एमआर आहेत त्यांना एजन्सी द्यायची म्हणजे ते बिझनेस चांगला करतील. मी इथे दहा वर्ष नोकरी केली. पुढे नोकरी सोडून पूर्ण वेळ व्यवसायाला दिला.

‘मावेन एजन्सी’ची सुरुवात २०१० सालची. पुढे आम्ही २०१६ मध्ये आयुर्वेदिक औषधालय सुरू केलं. आमच्या औषधालयामध्ये रोज सकाळ-संध्याकाळ नागपूरचे सुप्रसिद्ध आयुर्वेदाचार्य वैद्य रचनील कमावीसदार (एमडी) यांची ओपीडीपण असते.

माझ्या कुटुंबाची माझ्या या सर्व प्रवासात मोलाची साथ आहे. माझी पत्नी समीक्षा, जी माझी खूप चांगली मैत्रीणसुद्धा आहे ती ‘मावेन औषधालय’ खंबीरपणे सांभाळते. ती नसती तर कदाचित आयुर्वेदिक औषधालयाची सुरूवातच झाली नसती. ती नेहमी माझ्या खांद्याला खांदा लावून खंबीरपणे उभी असते. त्यानंतर ‘मावेन हर्बल्स’ व ‘मावेन डायग्नोस्टिक’ सुरू केले.

‘चैतन्य’मध्येच कामाला असताना २०१९ साली एका दिव्य पुरुष श्री हर्षल संचेती यांच्याशी भेट झाली आणि आयुष्याने पुन्हा एक जीवलग मित्र दिला, जे माझ्या सुखात कमी, पण दु:खात नेहमीच उभे असतात.

या संपूर्ण प्रवासात माझ्यासोबत माझा सहकारी व मित्र प्रतिक बोकडे हा अगदी सुरुवातीपासून आहे. कामात शंभर टक्के डेडिकेशन देणारा आणि कोणत्याही क्षणी प्रत्येक प्रकारच्या कामासाठी सदैव तत्पर असणारा सहकारी मला लाभला. मधल्या काळात पूनम सोलंकी खूप चांगली सहकारी, कार्यतत्परता आणि मन लावून काम करणारी आमच्याशी जोडली गेली.

या तिघांची खंबीर साथ या संपूर्ण प्रवासात मला आहे आणि म्हणूनच आम्ही दिवसेंदिवस पुढे जात आहोत. आमची एकूण दहा लोकांची टीम आहे. प्रवीण सांगतात, कोरोना काळात आम्ही खूप काम केले. लोकांना शक्य ती मदत केली. ग्रामीण पातळीवर लोकांना घरपोच सुविधा देण्यापासून, वाजवी दरात औषधे देण्यापर्यंत आम्ही प्रामाणिक काम केले.

प्रामाणिक काम करण्यावर माझा विश्वास आणि भर आहे. कमिटमेंट पाळणे हे आमचे वैशिष्ट्य आहे. आमच्याकडे शिस्तबद्ध पद्धतीने सेवा दिली जाते. आमच्या कामाच्या सिस्टीम खूप स्ट्राँग आहे.

करोडोंची उलाढाल असलेला व्यवसाय जास्तीतजास्त वाढवण्यासाठी सर्वतोपरी मेहनत आज घेतली जाते आहे. आजचा काळ हा डिजिटल काळ आहे त्यामुळे काळाची पावलं ओळखून वेबसाईट यावर काम चालू आहे. डिजिटल मार्केटिंगवरसुद्धा काम चालू आहे.

‘मावेन हर्बल्स’ची प्रॉडक्ट्स ही एक्सपोर्ट क्वालिटी प्रॉडक्ट आहेत. त्यामुळे भविष्यात जगभरात आम्हाला व्यवसाय विस्तारायचा आहे. आयुर्वेदाला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही एक खूप मोठा प्रोजेक्ट हाती घेतोय. यातलाच एक भाग म्हणजे शाळा, महाविद्यालयांमध्ये आम्ही आयुर्वेदासंदर्भात व्याख्याने आयोजित करणार आहोत.

आयुर्वेदिक औषधांचे असलेले अनेक गैरसमज आम्हाला दूर करायचे आहेत याची सुरुवात आम्ही नागपूरमधून करतोय. पुढे हे सोसायटी, बागा अशा सार्वजनिक ठिकाणी जावून लोकांपर्यंत पोहचवू. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पावर काम चालू आहे.

परिस्थिती कितीही प्रतिकूल असली तरी लढण्याची आणि मेहनत करण्याची जिद्द असेल तर प्रतिकूल परिस्थितीला अनुकूल करता येते हेच प्रवीण यांचा प्रवास आपल्याला शिकवतो.

संपर्क : प्रवीण गोन्नाडे – 99223 37137

Author

तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमचीही 'उद्योजक प्रोफाइल' तयार करायची असेल तर 9833312769 वर "उद्योजक प्रोफाइल" असा मेसेज whatsapp करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

'स्मार्ट उद्योजक' मासिकाच्या डिजिटल आवृत्तीचे वार्षिक वर्गणीदार होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
व्यवसाय वाढवण्यासाठी बिझनेस व्हिसिटिंग कार्डचं महत्त्व उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?