‘प्रविण ऍग्रो इंडस्ट्रीज’ या आमच्या कंपनीचा पाया माझ्या वडिलांनी १९८० च्या दशकात घातला. त्या वेळेस सुरुवात केलेल्या उद्योगात खरं तर मी लहानपणापासूनच उभा आहे. उभा यासाठी म्हणतोय, कारण आपल्याकडे पहिल्यापासून असे बोलले जाते की “त्याने नोकरी धरली” आणि “तो धंद्यात पडला”, पण मी आमच्या उद्योगाची नाळ व्यवस्थित पकडली आणि आजसुद्धा त्याला व्यवस्थित धरून उभा आहे.
वडिलांनी उद्योगात येण्यापूर्वी आम्हाला सांगितले होते मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही, त्याचप्रमाणे स्वतः काम केल्याशिवाय उद्योगात कोणीही यशस्वी होत नाही. मग काय कच्च्या मालासाठी गावोगावी फिरणे असो, गाडी भरून माल पोच करणे असो किंवा लेबर कमी असल्यावर कारखान्यात स्वतः काम करणे असो, मी हजर.
सर्वात प्रथम हा उद्योग कर्नाटकमधील गुलबर्गा येथे होता, पण कालांतराने जेव्हा सोलापुरात उद्योग आणला तेव्हा अनेक अडचणींना तोंड देत १९९४ साली पुन्हा येथे व्यवस्थित चालू केला. तेव्हापासून आजपर्यंत पुन्हा कधी मागे वळून पाहिले नाही. उत्तम क्वालिटीचे सेंद्रिय खत अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे हेच आमचे प्रमुख उद्दिष्ट आहे.
रासायनिक खतांचा वापर करून अधिकाधिक उत्पन्न मिळते हे खरे आहे, पण त्यामुळे पुढे जमीन नापीक होत जाते, अधिक रासायनिक खतांचा वापर केल्यामुळे अनेक शारीरिक आजार उद्भवतात याचे ज्ञान आधी कुठल्या शेतकऱ्यांना नव्हते, पण आजकाल शेतकरी फार जागरूक झाला आहे व सेंद्रिय पद्धतीने आपले शेत पिकवण्यासाठी आग्रही झाला आहे.
'स्मार्ट उद्योजक' (डिजिटल आवृत्ती) वार्षिक वर्गणी : ₹१४३ ➡️ SUBSCRIBE
'स्मार्ट उद्योजक' (डिजिटल आवृत्ती) आजीवन वर्गणी : ₹१,०२५ ➡️ SUBSCRIBE
आपली माती ही आपली जननी असते. तिला चांगली सुपीक ठेवणे त्याचबरोबर प्रत्यक्ष शेतकऱ्याचे उत्पन्न वाढवणे हीच दूरदृष्टी ठेवून आम्ही या उद्योगात उतरलेलो. आज जवळपास आठ हजार ते साडेआठ हजार शेतकरी, अनेक शेतकरी संघ, आमच्याशी जोडलेले आहेत. तसेच महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातील खताचे डीलर्स हेसुद्धा आमच्याशी जोडले गेलेले आहेत. त्यांच्यामार्फत अनेक शेतकरी आमचे सेंद्रिय खत आपल्या शेतात वापरतात आणि त्याचा खूप चांगला फायदा त्यांना मिळतो.
“शेतकऱ्यांचा विकास हाच आमचा ध्यास”, या बोधवाक्याला धरून यापुढेही आम्ही आमची वाटचाल अशीच चालू ठेवणार आहोत. वार्षिक सरासरी १००० टनांपर्यंत अमाची उत्पादकता असून येणाऱ्या काळात ते अजून वाढवण्याची ध्येय आमच्या डोळ्यांसमोर आहे.
उद्योजकाचे नाव : प्रविण दत्तात्रय हुच्चे
शिक्षण : B.E. (Computer Science)
व्यवसायाचे नाव : प्रविण ऍग्रो इंडस्ट्रीज
हुद्दा : प्रोप्रायटर
जिल्हा : सोलापूर
जन्मदिनांक : २२ जून १९८५
व्यवसाय स्थापना वर्ष : १९९४ (सोलापूरमध्ये)
जीएसटी क्रमांक : 27AETPH2659M1ZR
व्यवसायाचा पत्ता : प्लॉट न. ११८, इंडस्ट्रियल इस्टेट, होटगी रोड सोलापूर -४१३००३
संपर्क क्रमांक : ९८९०४७८७८४
ई-मेल : pravin.agro.industries@gmail.com
तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमचीही 'उद्योजक प्रोफाइल' तयार करायची असेल तर 9833312769 वर "उद्योजक प्रोफाइल" असा मेसेज whatsapp करा.