स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मिळवा फक्त ₹४०० मध्ये. आजच वर्गणीदार व्हा! https://bit.ly/2YzFRct
मित्रांनो, उद्योग करायचा विचार करताय? विचार पक्का झाला का? कोणाला सांगायचे की, मी उद्योग करणार आहे? मित्रांना सांगितले तर आपली टर उडवतील, घरच्यांना सांगितले तर टेन्शन घेतील, नातेवाईकांना सांगितले तर दूर जातील.
म्हणतील, नको, हा पैसे मागेल अन् उद्योग बुडाला तर? विचार तर पक्का आहे उद्योग करायचा म्हणजे करायचा. मग काय करायचे? कसे करायचे? पैसे नाही, कुणाकडे मदत मागितली तर त्यातील काही प्रथम घाबरवतात. मग करायचे कसे?
फक्त ₹२२२ मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिकाच्या डिजिटल आवृत्तीचे आजीवन वर्गणीदार व्हा आणि अगणित फायदे मिळवा!
अधिक माहितीसाठी : https://rzp.io/l/smartudyojak
सर्वप्रथम घाबरू नका. थोडे थांबा, विचार करा, आपल्याला काय करायचे आहे, आपल्याला कोणता व्यवसाय करायचा आहे? त्याकरता कोण मदत करू शकतो, आपण कोणाकडे गेल्यास या उद्योगाबद्दल पूर्ण माहिती देऊ शकतो. नातेवाईकांपैकी कोणी हा उद्योग करत असल्यास आपणाला पूर्ण माहिती मिळू शकते. यामध्ये लाजू नये. उद्योगात जो लाजला किंवा कमीपणा दाखवला तर तो संपला.
आता आपल्याला समजले की, आपल्याला किती पैसे लागतात आणि आता त्यावर काम करा, जेणेकरून बँक, गव्हर्मेंट ऑफिसेस व इतर ठिकाणांवरून जमा होऊ शकतील, काही स्वतःचे. या प्रयत्नांतूनही जमले नाही तर, कागद व पेन घ्या, पेजला चार-पाच वेळा घडी पाडा आणि प्रत्येक भागावर अडचण येणारे मुद्दे लिहा किंवा छोटी डायरी घ्या.
आता एक-एक मुद्दा घ्या. त्यावर विचार करून कोणता उपाय सुचतो का ते बघा. जसे जागा. आता जागा किती लागते, बांधकाम पक्के की शेडसुद्धा चालणार. दुकान असेल तर मोक्याच्या ठिकाणी चालणार की थोडे बाजूला असले तरी चालेल. आता यासाठी पैसे लागणार. स्वत:चे असल्यास चांगले! नाही तर भाड्याने घ्यावे लागणार.
अंदाज बांधून डायरीत लिहा आणि हिशोब लिहिणे चालू करा. म्हणजे सर्वात शेवटी आपल्याजवळ एक पूर्ण हिशोब जमा होईल आणि मुद्देसुद्धा जमा होतील. कोणत्या अडचणी आहेत याची यादी तयार होईल, त्यावर आपण लक्ष देऊ शकतो. डायरी सतत जवळ बाळगा म्हणजे मुद्दा सुचला की लगेच लिहिता येईल.
आता यानंतर विषय सरकारी परवान्यांचा. आतापर्यंत आपल्याला माहीत झाले असेलच, याकरता कोणत्या परवानग्या लागतात, त्याकरता ऑफिसचे पत्ते सर्व जमा करून त्या त्या विभागात अर्ज करून लवकरात लवकर मिळवण्याचा प्रयत्न करावा. यानंतर आपल्याला लागतील मशीनरी, शिक्षित कामगार. यामध्ये आपण स्वतः शिक्षित झालो तर बरे, कामगार नसल्यास आपण दुसर्या माणसाकडून कामे करून घेऊ शकतो.
अशाप्रकारे विचार करून आपण जर औद्योगिक किंवा दुकानाचे नियोजन केल्यास आपण मागे न जाता पुढेच जात राहू. आपल्या ग्राहकाचे जो हित जोपासतो त्यांच्याशी नम्रपणे वागतो, कामगारांचे ऐकतो आणि असलेले पैसे वाचवून वापरतो त्याला फायदाच होतो.
कोणत्याही प्रसंगात घाबरून न जाता जो आलेल्या प्रसंगाला विचारपूर्वक थोडा वेळ देऊन, मोठ्यांचे विचार घेऊन सल्ला घेतो, तो कधीही मागे येत नाही. या प्रकारे मेहनत घेऊन जर पुढे गेलो तर विचारांती परमेश्वर प्राप्त होतो.
– संजय भारंबे
Free Newsletter on WhatsApp & Telegram
'स्मार्ट उद्योजक'चे उद्योजकता आणि व्यवसायविषयक लेख वाचण्यासाठी जोडले जा : WhatsApp ग्रुपवर आणि टेलिग्राम चॅनेलवर.