स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मिळवा फक्त ₹४०० मध्ये. आजच वर्गणीदार व्हा! https://bit.ly/2YzFRct
देशाची आर्थिक स्थिती गेले काही काळ डबघाईला जात असल्याचे आपण पाहत आहोत. विकासदर गेले वर्षभर खाली येत आहे. यावर तोडगा काढण्यासाठी आता स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कंबर कसली आहे आणि येत्या बजेटमध्ये आपल्या समोर अनेक नवीन गोष्टी येऊ शकतात.
‘मनीकंट्रोल’ने सुत्रांच्या हवाले दिलेल्या बातमीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गेले काही दिवस विविध क्षेत्रातील तज्ज्ञ व उद्योग क्षेत्रातील बड्या मंडळींशी सतत बैठका करत आहेत. देशाच्या आर्थिक स्थितीबद्दल त्यांच्याशी चर्चा केली जात आहे. याचसोबत प्रत्येक मंत्री व सचिव यांच्यासोबतही सलग बैठका होत आहेत.
फक्त ₹२२२ मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिकाच्या डिजिटल आवृत्तीचे आजीवन वर्गणीदार व्हा आणि अगणित फायदे मिळवा!
अधिक माहितीसाठी : https://rzp.io/l/smartudyojak
सकाळी ९ वाजता या बैठकांचे सत्र सुरू होते, ते रात्री १० ते ११ वाजेपर्यंत सुरू असते. मोदी फक्त दुपारी जेवणासाठी सुट्टी घेत असून दिवसातले ११-१२ तास सलग बैठका घेत आहेत. सूत्रांनी म्हटल्याप्रमाणे मोदींनी आपल्या प्रत्येक मंत्र्याला पुढील पाच वर्षांचे vision व ते पूर्ण करण्यासाठीचा plan मांडण्यास सांगितले आहे.
तज्ज्ञ व उद्योगपती यांच्यासोबत दहा ते बारा लोकांच्या छोट्या छोट्या गटात या बैठका होत आहेत. या बैठकांमध्ये नरेंद्र मोदी हे फक्त ऐकायचे काम करत आहेत.
एकूणच पंतप्रधानांकडून सुरू असलेली तयारी पाहता येत्या १ फेब्रुवारीला मांडले जाणाऱ्या बजेटमध्ये आपल्याला अनेक नवीन गोष्टी, बदल समोर दिसण्याची शक्यता आहे.
– टीम स्मार्ट उद्योजक
स्मार्ट उद्योजक पोर्टलवर तुमची यशोगाथा मांडण्यासाठी येथे क्लिक करा
Free Newsletter on WhatsApp & Telegram
'स्मार्ट उद्योजक'चे उद्योजकता आणि व्यवसायविषयक लेख वाचण्यासाठी जोडले जा : WhatsApp ग्रुपवर आणि टेलिग्राम चॅनेलवर.