Advertisement
उद्योगोपयोगी

उत्तम सेल्समॅन होण्याची तयारी

स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मिळवा फक्त ₹४०० मध्ये. आजच वर्गणीदार व्हा! https://bit.ly/2YzFRct


मागणी आणि पुरवठा याच्या परस्परातील प्रमाणावर प्रत्येक उद्योगधंदा उभा असतो. प्रत्येक उद्योजकाला आपला उद्योग टिकवण्यासाठी, त्यात वाढ करण्यासाठी आवश्यकता असते ती चांगल्या विक्रीची आणि या विक्रीमध्ये सतत वाढ करू शकणारा चांगला विक्रेता अथवा विक्री प्रतिनिधी म्हणजेच सेल्समॅनची. चांगला सेल्समॅन होण्यासाठी विविध गुणांचे मिश्रण तुमच्या व्यक्तिमत्त्वामध्ये असायला हवं, तरच तुम्ही चांगले सेल्समॅन म्हणून सिद्ध होऊ शकता.

व्यक्तिमत्त्व : व्यक्तिमत्त्व ही एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे. सेल्समॅन म्हणून आपण लोकांसमोर जातो त्यावेळी तुमचं व्यक्तिमत्त्व हे आकर्षक आणि समोरच्याला आपलंस करणारं असावं. सेल्समॅनची ठेवण ही इतरांमध्ये उठून दिसेल अशी असावी.

फक्त ₹२२२ मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिकाच्या डिजिटल आवृत्तीचे आजीवन वर्गणीदार व्हा.

या वर्गणीसोबत काय काय लाभ मिळतील हे पाहण्यासाठी येथे क्लिक करा : https://rzp.io/l/37lxSO3N9p

आकर्षक व्यक्तिमत्त्वामध्ये सेल्समॅनच्या वागणुकीतील प्रोफेशनलिझमसुद्धा येते. पाच मिनिटांच्या भेटीनेही ग्राहक तुम्हाला लक्षात ठेवील अशाप्रकारची तुमची छाप त्याच्यावर पडली पाहिजे आणि त्यासाठी तुम्ही तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा तितका विकास केला पाहिजेत.

आत्मविश्वास : चांगला विक्रेता होण्यासाठी आत्मविश्वास असणं खूप गरजेचं असतं. स्वत:वर आणि आपण जे उत्पादन अथवा सेवा विकतो आहोत त्यावर विश्वास ठेवून तुम्ही ग्राहकांसमोर जाता तेव्हा तुम्ही निम्मी लढाई जिंकलेले असता.

प्रसंगावधानता : चांगल्या विक्रेत्यामध्ये चपळता आणि हजरजबाबीपणा असला पाहिजे. कोणत्याही परिस्थितीला त्याला सांभाळून घेता आलं पाहिजे. तुम्ही एखाद्या ग्राहकाला जे प्रेझेंटेशन देता त्याने तो समाधानी होईलच असे नसते.

अशा वेळी तो तुम्हाला निरनिराळे प्रश्न विचारू शकतो. तेव्हा तुम्हाला प्रसंगावधानता दाखवून शांतपणे तो समाधानी होईपर्यंत त्याला उत्तर द्यावीच लागतात. कोणताही असमाधानी ग्राहक हा तुमच्याकडून माल खरेदी करत नाही.

स्मार्ट उद्योजक® मासिकात तुमची कथा किंवा तुमची मुलाखत प्रसिद्ध करू इच्छित असाल, तर येथे क्लिक करा. : https://bit.ly/3bPrfMd


Free Newsletter on WhatsApp & Telegram

'स्मार्ट उद्योजक'चे उद्योजकता आणि व्यवसायविषयक लेख वाचण्यासाठी जोडले जा : WhatsApp ग्रुपवर आणि टेलिग्राम चॅनेलवर.