उद्योजकाने कोणती कामं करायची आणि कोणती नाही?


₹७५० मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मागवा आणि त्यावर ₹२०० किंमतीचे 'एकविसाव्या शतकातील उद्योगसंधी' हे पुस्तक मोफत मिळवा. आजच ऑर्डर करा https://bit.ly/2YzFRct


मी माझ्या ‘ट्रेनिंग आणि बिझनेस कोचिंग’ या प्रोफेशनमध्ये अनेक उद्योजकांना भेटतो आणि तुम्हाला हे सांगितलं, तर फारसं आश्‍चर्य वाटणार नाही, की त्यातले अनेक उद्योजक हे सर्वच कामं चक्क स्वतःच करत असतात; परंतु माझ्या दृष्टीने ही एक गंभीर गोष्ट आहे.

सर्वच कामं म्हणजे मालाची ऑर्डर तोच घेणार, मालही तोच पोचवणार, कलेक्शनही तोच करणार, बँकेत चेकही तोच भरणार, हिशोबही तोच लिहिणार इत्यादी. अशा अ‍ॅक्टिव्हिटींना त्याच्या गैरसमजुतींमुळे किंवा कुणाचं ऐकल्याने ते याला मल्टिटास्किंग असा गौरवास्पद चुकीचा समज करून घेतात.

वरून वीस वर्षांनीही अभिमानाने सांगतात, आमची कुठेही शाखा नाही. काही लोकांना तर ते सुपरमॅन असल्याचा भास होतो आणि होणारच. फरक एवढाच की, हा त्याच चौकटीत वीस वर्षे तेवढ्याच धंद्यात अडकलेला असतो. पुढे वाढ नाही, विस्तार नाही.

असं का? कारण एकच, सगळंच काम स्वतः करणं. नवीन धंद्याच्या सुरुवातीला काही दिवसांकरिता एखाद्या वेळेस ठीक आहे, परंतु फार काळ अपेक्षित नाही. ज्या कामासाठी माणसं मिळतात ती तुम्ही स्वतः करू नका. तुम्ही तेच करा, जे तुम्ही केलं पाहिजे. म्हणजे फक्त अति महत्त्वाची कामं.

त्यासाठी तुम्हाला पहिली गोष्ट ठरवावी लागेल आणि ती म्हणजे, आजपासून कोणती कामं तुम्ही करणार आणि कोणती नाही, जी कामं तुम्हाला करायची नाहीत आणि करणं आवश्यक आहे, त्यासाठी माणसं नेमा. तरच तुमच्या ठरलेल्या मोठ्या आणि भव्य ध्येयात यशस्वी होणं शक्य आहे.

हे होऊ शकतं!

  • तुमची करायची कामं ठरल्याने, सगळी कामं वाटली जातील. एकट्यावरच कामाचा ताण जाणवणार नाही.
  • अशाने प्रत्येकाला नवीन काही शिकण्याची संधी मिळेल.
  • तुम्हाला नवीन, कार्यक्षम टीम मिळेल.
  • नेमक्या कामावर तुमचा फोकस राहील.
  • तुम्ही जास्त ‘रिझल्ट-ओरिएंटेड’ असाल.
  • तुमची कार्यक्षमता कित्येक पटीने वाढू शकते.
  • सध्याच्या मानाने जास्त फ्री टाइम तुम्हाला मिळू शकतो, त्याचा उपयोग तुम्ही तुमच्यासाठी, तुमच्या कुटुंबासाठी करू शकता.
  • न करायच्या कामाच्या यादीमुळे बर्‍याच ‘टाइम किलर अ‍ॅक्टिव्हिटी’ बंद होतील. तुम्ही फार ‘फोकस्ड’ राहता.
  • अशाने कामाचे परिणाम जास्त दिसून येतात. कामाची नेमकी दिशा ठरल्याने, त्याचा वेग आणि अचूकता जास्त असते.
  • अशाने तुमची ध्येयं जगण्यासाठी तुम्हाला लागणारा वेळ आणि तुमची गुंतवणूक ही इतरांच्या मानाने कमी असू शकते.

हे करून तर बघा!

१. प्रथम तुम्ही करत असलेल्या व तुम्ही करणे आवश्यक, परंतु सध्या करत नसलेल्या कामांची यादी करा.
२. नंतर कामांची विभागणी करा.
३. तुम्ही करायची कामं ठरवा.
४. तुमची सध्या करत असलेली, परंतु न करण्याच्या यादीत असलेली कामं योग्य माणसाला सुपूर्द करा, जेणेकरून तुम्हाला त्याचा ताण येणार नाही.

५. महत्त्वाची कामं स्वतःकडेच ठेवा.
६. तशी माणसं सध्या तुमच्याकडे नसल्यास ती तयार करा किंवा नियुक्त करा.
७. तुम्ही करत असलेली कामं हळूहळू दुसर्‍यावर सोपवा आणि नवीन जबाबदार्‍या स्वीकारा.
८. तुम्हाला मिळालेला ‘एक्स्ट्रा फ्री टाइम’ तुम्ही तुमच्या प्रगतीसाठी गुंतवा.

– विश्वास वाडे

Author

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ मध्ये 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?