महिना १,५०० पगार ते १० कोटींची उलाढाल करणार्‍या प्रितमचा प्रवास


₹७५० मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मागवा आणि त्यावर ₹२०० किंमतीचे 'एकविसाव्या शतकातील उद्योगसंधी' हे पुस्तक मोफत मिळवा. आजच ऑर्डर करा https://bit.ly/2YzFRct


प्रितम नंदकुमार गंजेवार ह्या नावाला उपमा अथवा ओळख देण्याची गरज नाही. ते एक नामांकित व्यक्तिमत्व आहे. हो! आपण ‘प्रितम ग्रुप’च्या प्रितम नंदकुमार गंजेवार यांच्याच बद्दल बोलत आहोत. नांदेडच्या गंजेवार कुटुंबाचे हे थोरले चिरंजीव. आई मंगल ह्या गृहिणी, बाबा नंदकुमार किराणा व्यापारी व लहान बंधू गजानन असा त्यांचा परिवार.

प्रितम यांचे शालय शिक्षण अगदी बारावीपर्यंत त्यांच्या मूळ गावी म्हणजेच नांदेड येथे झाले. सर्व सामान्य मुलांप्रमाणे प्रितमला उच्चशिक्षित किंवा खूप शिक्षण घेऊन नौकरी करायचीच नव्हती. व्यवसाय रक्तात असल्याने त्यातच पारंगता आणायची होती. आपल्या छोटेखानी व्यवसाय कसा वाढवता येईल याचा विचार किशोर वयातील प्रितमला सतत सतावीत असे. अधिक भांडवल उभे करूनच आपला व्यवसाय वाढवता येईल हे प्रितमने हेरले. पण घराचा प्रपंच दुकानाच्या मिळकतीवर चालत आहे हे सत्यसुद्धा त्यांना माहीत होते.

आता आवश्यक अधिक भांडवल कसे उभारायचे याचा विचार प्रितमने सुरू केला. ह्या काळात त्यांच्या जवळच्या गृहस्थांकडून त्यांना पाटील कन्स्ट्रक्शन, पुणे येथील नोकरीबद्दल कळले. बारावीनंतर पुढे शिक्षण घेण्यात रस नसल्याने, प्रितमने हि नोकरी करण्याचे ठरवले. नोकरीमुळे चार पैसे जोडता येतील हाच काय तो एक प्रामाणिक उद्देश.

प्रितमने नोकरी करण्याची इच्छा त्या गृहस्थांकडे व आपल्या कुटुंबाकडे दर्शवली आणि सर्वांनी त्यांना साथ दिली. २००५ साली प्रितम, पाटील कन्स्ट्रक्शन, पुणे येथे संगणकचालक म्हणजेच कॉम्पुटर ऑपरेटर म्हणून रुजू झाले. होतकरू प्रितमच्या मनात खूप काम करून जास्त पैसे कमवायचे ध्येय होते. अधिक भांडवलाने आपला व्यवसाय वाढवण्याचे स्वप्न त्यांनी मनी बाळगले. दरमहा १५०० रुपये पगार त्यांना सुरुवातीला मिळत होता. प्रितम प्रत्येक काम लक्ष्य देऊन करीत असत.

नवनवीन गोष्टींशी ओळख करून घेणे, नवीन शिकणे आणि त्याचा सराव करणे असा त्यांचा दिनक्रम चाले. त्यामुळे खूप कमी काळात त्यांना भरपूर गोष्टी येत असत. ते कामात आता चांगले तरबेज झाले होते. त्यांच्या या शिकाऊ वृत्तीमुळे त्यांना बढती मिळत गेली आणि ते कामात बुडून गेले. साल २००५ ते साल २०१५ असे एक दशक त्यांनी पाटील कन्स्ट्रक्शनमध्ये कॉम्पुटर ऑपरेटर ते प्रकल्प व्यवस्थापक म्हणजेच प्रोजेक्ट मॅनेजर या पदांवर काम केले. प्रोजेक्ट मॅनेजर या पदावर त्यांना सर्व सन्मान व योग्य मोबदला मिळत होता. पण वेगळे काही करून दाखवण्याची जिद्द त्यांना स्वस्थ बसून देईना.

समाजात नाव कमवायचे, आपल्या मराठवाड्याला लोकांना कामाची संधी आणि आई-वडिलांचे सर्व स्वप्न पूर्ण करण्याच्या हेतूने त्यांनी एक निर्णय घेतला, नोकरी बरोबरच स्वतंत्र व्यवसाय करण्याचा. ‘पाटील कन्स्ट्रक्शन’चे मालक पाटीलसाहेबांकडून परवानगी घेऊन त्यांनी ‘प्रितम कन्स्ट्रक्शन’ची स्थापना २६ मार्च २०१३ रोजी केली. एक दशक कन्स्ट्रक्शन क्षेत्रात काम केल्याने ह्याच क्षेत्रात पुढे जाण्याचा निर्धार प्रितमनी केला. कन्स्ट्रक्शन क्षेत्रातील सर्व माहिती त्यांना मिळाली होती.


‘स्मार्ट उद्योजक’ वेबपोर्टलवर तुमचीसुद्धा मुलाखत / कथा प्रसिद्ध करू इच्छित असाल, तर इथे क्लिक करा.


या विभागात असे काम होते, काय लागते किंवा या क्षेत्राच्या चाली रीती काय हे त्यांना सर्व नीट उमगले होते त्यामुळे त्यांची या क्षेत्राशी एक वेगळीच गट्टी जमली होती. आपल्या व्यवसायाचा श्री गणेशा प्रितमने एक जे.सी.बी मशीन घेऊन केला. हिच जे.सी.बी मशीन त्यांनी पाटील कन्स्ट्रक्शनला पाटील साहेबांची परवानगी घेऊन भाडे तत्त्वावर दिली. हे प्रितमच पहिलं स्वतंत्र काम होतं. कामात निपुणता यावी व काम वाढावं म्हणून प्रितमने पुढे शिकण्याचा निर्णय घेतला. डी.सी.ई म्हणजेच डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनीअरिंग ही पदवी मुंबईच्या अभिनव महाविद्यालयातून प्राप्त केली.

ह्या पदवीचा त्यांना खूप फायदा झाला. स्वतंत्र कामाचा सहा महिन्याचा अनुभव आल्यावर प्रितमने महानगरपालिकेमध्ये कॉन्ट्रॅक्टर म्हणून नोंदणी करून घेतली. ह्या नोंदणीमुळे ते सरकारी टेंडर आणि व इतर कामे भरण्यास पात्र झाले त्यामुळे सर्व कामात भाग घेऊ शकत होते. प्रितमने वेळ न दवडता या सर्व गोष्टीत स्वतःला झोकून दिले. त्याचा परिणामसुद्धा लगेच मिळाला. प्रितमला सरकारी व खाजगी कामे मोठ्याप्रमाणावर मिळू लागली.

कामात वर्चस्व मिळावं आणि खूप काम करता यावं म्हणून प्रितमने आपली मालमत्ता म्हणजेच मशिन्स वाढवण्याचे ठरविले. त्यासाठी त्यांनी पंजाब अँड सिंध बँक व इतर बँकांमधून कर्ज घेऊन नवनवीन मशिन्स टप्याटप्यानी खरेदी केल्या. लागेल तेव्हा ती मशीनरी स्वतःच्या कामासाठी वापरत असे आणि इतर वेळ या सर्व मशिन्स ते भाडेतत्वावर देत असत. महत्त्वकांशी स्वभामुळे प्रितम एकाच व्यवसायावर समाधानी नव्हते. त्यांनी त्याच वेळी त्यांनी टूर्स अँड ट्रॅव्हल्स, प्लॉटिंग व इतर अनेक व्यवसायातसुद्धा हात घातला.

अजून सिव्हिल कामे मिळविणे, नवीन पद्दती किंवा उपकरणे व साधने उपलब्ध करणे, भरपूर सरकारी व खाजगी कामे मिळविणे आणि कामात १०० टक्के वेळ देणे हे प्रितमचे प्रमुख लक्ष्य आहे. युवा वर्गाला आपला गाव, आपला देश आणि आपली माणसे सोडून जाऊ लागू नये म्हणून ते नेहमी प्रयत्नशील असतात. मराठवाड्यातील लोकांचे सुख आणि भविष्य नेहमी सुरक्षित असावे अशी त्यांची इच्छा आहे. आज ते १०० कुटुंबाचे पालनकरते आहेत. त्यांचे १०० कामगार हे त्यांचे एक विस्तारलेले कुटुंब आहे व त्यांच्यासाठी ते सतत झटत राहणार आहेत.

आपल्या कुटुंबाची संख्या १,००० कधी होईल ह्याची ते आतुरतेने वाट पाहत आहेत व त्या मार्गावर प्रगतिशील आहेत. आयुष्यात अपयश न पाहिलेला माणूस पृथ्वीवर सापडणार नाही. हि गोष्ट प्रितमला पण अपवाद नाही. कठीण काळात त्यांचे कुटुंब त्यांच्या पाठीशी ठाम उभे राहिले. विशेषतः त्यांचे धाकटे भाऊ गजानन आणि पत्नी शिल्पा त्यांना व्यवसायात पूर्ण मद्दत करतात. त्यासोबत त्यांचे मित्र शिवयोगी स्वामी (संतोष) यांचे मोठे मार्गदर्शन व मदत त्यांना झाली आहे. व बरेच नातेवाईक व मित्र मंडळीची साथ त्यांना मिळालेली आहे.

ह्या सर्व गोष्टींमुळे प्रितम कधीही खचले नाही उलट नव्या जोमाने आणि नवीन उमीदीने कामाला लागले. त्यांनी आपले संपूर्ण लक्ष्य पायाभूत सुविधा म्हणजेच इन्फ्रास्ट्रक्चर या क्षेत्राकडे वळवले आहे. कुठलेही काम किंवा कोणताही व्यवसाय सुरू करण्यासाठी त्यास पायाभूत सुविधा (इन्फ्रास्ट्रक्चर) अति महत्त्वाचे आहे. या इन्फ्रास्ट्रक्चरशिवाय तुम्ही हतबल आहात असे प्रितम निक्षून सांगतात. त्यामुळे त्यांनी इन्फ्रास्ट्रक्चर हे क्षेत्र निवडल आहे.

१५०० रूपाने कमवणारे प्रितम आज १० कोटींची उलाढाल सहज करतात. ते आपल्या जिद्द, चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर. कामाच्या प्रगती आणि यशामुळे हुरहुरून न जाता प्रितमने आपल्या सामाजिक कर्तव्यकडे लक्ष देण्यास सुरवात केली व ‘प्रितम फाउंडेशन’च्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपली जाते. आरोग्य क्षेत्राला मद्दत, कर्करोगग्रस्त लोकांना, विवाह इच्छुक जोडप्याना व इतर गरजू लोकांना आर्थिक व जे जमेल ती मदत आणि काही जवळच्या लोकांना तिरुपती देव दर्शन सर्व सुविधा विमान तिकीटासह अशी विविध उपक्रमे राबवली जातात. ह्या सर्व कामातून त्यांना समाधान आणि आनंद प्राप्त होते.

महिन्यातील काही रविवार ते आपल्या कुटुंबासाठी राखीव ठेवतात. आपल्या व्यतिक आयुषला सुद्धा पूर्ण न्याय देण्याचा प्रयत्न प्रितमचा असतो. व्यवसाय आणि त्याची वृद्धी, समाज व सामाजिक बांधिलकी, कुटुंब आणि पारिवारिक सुख अश्या प्रमुख गोष्टींना प्रितमने स्वतःला समर्पित केले आहे. त्यामुळे ह्यांच्या शिवाय आणि यांचा व्यतिरिक त्यांना काहीही सुचत नाही. प्रितम हे एक बहुरूपी आणि कर्तृत्ववाण व्यक्तीचे उत्तम उद्धरण आहे. नोकरी सांभाळून आपली रुची जपली. शून्यातून एक सर्व संपन्न विश्व उभे केले आणि स्वत: बरोबर समाजाला पण प्रगतीच्या दिशेवर अग्रेसर केले.

मुलाखत : सुजाता नाईकुडे
संपर्क : प्रितम गंजेवार – ९७६५०००००३


‘स्मार्ट उद्योजक’ वेबपोर्टलवर तुमचीसुद्धा मुलाखत / कथा प्रसिद्ध करू इच्छित असाल, तर इथे क्लिक करा.


Author

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ मध्ये 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?