Advertisement
उद्योग कथा

प्रक्रिया उद्योगामुळे मराठवाड्यातील हळदीला मिळाली झळाळी !


दरमहा संपूर्ण ‘स्मार्ट उद्योजक’ मासिक मिळवा तुमच्या WhatsApp वर । वार्षिक वर्गणी फक्त रु. ८०

आजच वर्गणीदार व्हा : https://imjo.in/YSMSQK


शासनाच्या सेंद्रिय शेती योजनेसह कृषी विभागाचे तसेच कृषी विद्यापीठांच्या मार्गदर्शनाखाली शेतीत केलेले वेगवेगळे प्रयोग तसेच प्रगती ही उल्लेखनीय आहे. त्यांनी उभारलेला एस फोर फुड्स नावाचा प्रक्रिया उद्योग मराठवाड्यातील शेतकर्यांसाठी आशेचा किरण ठरत आहे.

सुशील शेळके यांनी बायोटेकमध्ये पदवी, तर कृषी व्यापार व्यवस्थापनातील पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले असून ते औरंगाबाद येथील एका नामांकित कंपनीत व्यवस्थापक पदावर कार्यरत होते; परंतु प्रयोगशील शेती करण्याची आवड असल्याने त्यांनी लठ्ठ पगाराची नोकरी सोडून हळद प्रक्रिया उद्योगाकडे वाटचाल सुरू केली. हळद हे एक मसाल्याच्या पिकांतील प्रमुख नगदी पीक म्हणून प्रचलित आहे. महाराष्ट्रात हळद लागवड प्रामुख्याने सातारा, सांगली, कोल्हापूर, चंद्रपूर, नागपूर आणि मराठवाड्यातील औरंगाबाद, हिंगोली, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, परभणी जिल्ह्यांत होते. काही वर्षांपासून महाराष्ट्रात हळद लागवडीच्या क्षेत्रात कमालीची वाढ झालेली आहे.

पारंपरिक शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळाली तर शेतीतही नंदनवन फुलते हे औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील छोटेसे गाव असलेले वांगी येथील तरुण शेतकरी सुशील शेळके यांनी हळदीवरील प्रक्रिया उद्योगातून प्रत्यक्षात आणून दाखविले आहे. त्यांची ही प्रेरक यशकथा…

2014 ला फुलंब्री तालुक्यातील औरंगाबाद-जळगाव महामार्गालगत बिल्डा मठपाटी येथील गट नं. 262 मध्ये अलाहाबाद राष्ट्रीयीकृत बँकेच्या अर्थसाहाय्यातून हळद व आले प्रक्रिया उद्योग सुरू केला. बाजारात व्यापार्यांेकडून कच्च्या हळदीला मिळणारा कवडीमोल भाव, त्यातून होणारी शेतकर्यां ची आर्थिक पिळवणूक थांबविण्यासाठी आपल्या व्यावसायिक शिक्षणाचा फायदा घेत त्यांनी हळद, आले खरेदी केंद्र सुरू केले. 2016-17 या वर्षी जिल्हाभरातील जवळपास 100 शेतकर्यां नी 80 टन हळद प्रक्रिया उद्योगासाठी थेट विक्री करून नफा मिळविला. 35 शेतकर्यां0नी हळदीवर प्रकिया करून कुरकुमीन औषध कंपन्यांना विक्री केली.

कच्च्या हळदीला मिळणार्यान नाममात्र भावामुळे कन्नड, फुलंब्री, सिल्लोड, सोयगाव तालुक्यांतील हजारो शेतकरी पड्या दराने हळदीची विक्री दलालामार्फत व्यापार्यांवना करतात. त्यामुळे या शेतकर्यांीना हवा तसा हमी भाव मिळत नाही परंतु शेळके यांनी सुरू केलेल्या प्रक्रिया उद्योगामुळे गेल्या वर्षी 900 ते 1 हजार रुपये प्रति क्विंटल दराने हळद विक्री केली. शेतकर्यांळसाठी हा प्रक्रिया उद्योग आता हक्काचे विक्री केंद्र बनलेय. गेल्या वर्षी दुष्काळ तसेच दलाल, व्यापारी यांच्या कचाट्यात सापडलेल्या शेकडो शेतकर्यांची 850 क्विंटल हळद खरेदी करून त्यांनी शेतकर्यांयना दिलासा दिला आहे. जिल्हाभरातील शेतकर्यां्नी व्यापारी, दलालाच्या मार्फत हळदीची विक्री न करता प्रक्रिया उद्योगासाठी हळद देऊन योग्य मोबदला मिळवावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

स्थानिक तरुणांना मिळाला रोजगार : बिल्डा, विटेकरवाडी, गणोरी परिसरातील जवळपास 10 तरुणांना या प्रक्रिया उद्योगामुळे रोजगार उपलब्ध झाला आहे. या तरुणांच्या हाताला गावातच काम मिळाल्याने त्यांची शहरात रोजगार शोधण्यासाठीची पायपीट थांबली आहे.

Smart Udyojak | e-Magazines | All Issues

सेंद्रिय शेतीला प्राधान्य : रासायनिक खतांचा होणारा वापर व फवारणीसह होणारा इतर खर्च टाळण्यासाठी सुशील शेळके यांनी आपल्या शेतीत सेंद्रिय शेतीचा यशस्वी प्रयोग राबविला आहे. सुशील ग्रो फार्मच्या माध्यमातून त्यांनी आपल्या सुमारे 20 एकर शेतात डाळिंब, आंबा, सीताफळ, चिंच, आवळा, चिकू आदी फळबागांची लागवड केली आहे.

कुरकुमीनच्या प्रमाणात वाढ : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाअंतर्गत विकसित केलेल्या तंत्राच्या साहाय्याने प्रक्रिया केल्यामुळे हळदीतील कुरकुमीनची टक्केवारी ही 4.80 टक्क्यांपर्यंत वाढलेली आढळून आली आहे. वाळलेल्या हळद पावडरपासून इथाईल अल्कोहोल हे द्रावक वापरून कुरकुमीन नावाचा घटक वेगळा काढतात. हळदीमध्ये कुरकुमीनचे प्रमाण जातीपरत्वे 2 ते 6 टक्के इतके असते. कुरकुमीनपासून अनेक आयुर्वेदिक औषधी तसेच सौंदर्य प्रसाधने तयार करतात. हळदीचा दर्जा तिच्यातील कुरकुमीनवर अवलंबून असतो. पारंपरिक पद्धतीने तयार केलेल्या हळदीमध्ये सर्वसाधारणपणे 2 टक्के कुरकुमीन आढळते. कच्ची हळद ही वाफेच्या साहाय्याने उकळून शेतातच वाळविल्या जात असल्याने वातावरणाचा हळदीवर परिणाम होतो. त्यामुळे तिच्या शुद्धतेवर परिणाम होऊन तिचा दर्जा कमी होतो. तथापि प्रक्रिया करून यंत्राच्या साहाय्याने तयार होणार्यार हळदीचे वर्गीकरण व प्रतवारी केल्यानंतर ती यंत्राद्वारे स्वच्छ केली जाते. त्यानंतर हळदीचे तुकडे करून रिअॅवक्टरमध्ये बाह्यवाफेद्वारे उकळल्या जात असल्याने नैसर्गिक गुणधर्म कायम राहतात. या प्रक्रियेत हळद तेलही काढण्यात येते. हळद ड्रायरच्या साहाय्याने वाळवून पावडर केली जाते. त्यामुळे हळदीचा दर्जा हा उत्तम राहतो. अधिक कुरकुमीन असलेल्या हळदीस बाजारात चांगला बाजारभाव मिळतो.

– सौजन्य : महान्यूज


Subscribe ‘Smart Udyojak’ Magazine


FREE NEWSLETTER ON WHATSAPP

व्यवसाय आणि उद्योजकतेविषयी माहिती व घडामोडी आपल्या WhatsApp वर मोफत मिळवण्यासाठी ९८३३३१२७६९ या क्रमांकावर आपले नाव सध्या राहत असलेला जिल्हा व तालुका WhatsApp करा.

Help-Desk
%d bloggers like this: