स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मिळवा फक्त ₹५०० मध्ये. आजच वर्गणीदार व्हा! https://bit.ly/2YzFRct
व्यवसाय आणि संस्कार हे बदलत्या काळात खूप महत्त्वाचे आहेत. संस्कार ही अशी गोष्ट आहे, जी आपण पुढच्या पिढीकडे देतो. तीच गोष्ट त्या परिवारात पुढे दिली जाते.
व्यवसायाचा पाया हा जसा अनेक गोष्टींवर अवलंबून असतो तसेच तो संस्कारावरसुद्धा अवलंबून असतो. आपण आज मुलांना चांगले शिक्षण देतो; पण त्या शिक्षणाचा फायदा खरंच त्यांना होतो का? आज आपण समाजात पाहतो की, शिक्षणाचे खूप मोठ्या प्रमाणावर बाजारीकरण चालू आहे. मुलांच्या पालकांमध्ये आज स्पर्धा चालू आहे. इंग्रजी माध्यमांच्या शाळांचा तर पूर आला आहे. आणि यामध्ये नवीन पिढी वाहत चालली आहे. त्याचा फायदा मुलांना होतो का?
फक्त ₹२२२ मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिकाच्या डिजिटल आवृत्तीचे आजीवन वर्गणीदार व्हा.
या वर्गणीसोबत काय काय लाभ मिळतील हे पाहण्यासाठी येथे क्लिक करा : https://rzp.io/l/37lxSO3N9p
तर त्याचा फायदा मुलांना अजिबात होत नाही. काही अंशी होतही असेल; पण अशी शिक्षण प्रणाली व असा सामाजिक पगडा असलेले वातावरण काहीच कामाचे नाही.
मुलांना भविष्यात त्यांच्या गरजा भागवता येतील व ते संपन्न बनतील अशी एकच पद्धत आहे, ती म्हणजे मुलांना व्यवसायाभिमुख शिक्षण तुम्ही दिले पाहिजे. 90% व्यावसायिक मुले हे पुढे जाऊन व्यवसाय करतात ही गोष्ट विसरता कामा नये. त्याला तसे कारणपण आहे. व्यवसाय हा मारवाडी, गुजराती, सिंधी यांनीच करावा असे बोलले जाते, कारण त्यांना तसे व्यावसायिक संस्कार हे त्यांच्या घरातूनच मिळत असतात.
‘व्यवसाय हा रक्तात नसून तुमच्या संस्कारात आहे’ हे विसरता कामा नये. गुजराती, मारवाडी, सिंधी यांचे नोकरी करण्याचे प्रमाण फार कमी आहे. त्याला कारणही तसेच आहे, कारण त्यांच्या घरामध्ये असणारा व्यवसायाचा पगडा फार मोठा आहे.
मराठी मुलांना पुढे जायचे असेल तर नोकरी हा पर्याय नाही. भविष्यात जर कोणी तारू शकतो तर तो व्यवसाय आहे हे विसरू नये. आपण आपल्या मुलांना व्यवसायाभिमुख शिक्षण आणि संस्कार दिला पाहिजे. जिजाबाईंनी शिवाजी महाराजांवर व्यावसायिक संस्कार केले नसते तर तेही स्वराज्यनिर्मिती करू शकले नसते. आपण आपल्या मुलांवर काय संस्कार करतो त्यावर त्याचे पुढचे भवितव्य अवलंबून आहे. त्यामुळे व्यावसायिक शिक्षण आपण आपल्या मुलांना दिले पाहिजे.
– मनोजकुमार गुंजाळ
9270857048
(लेखक मार्केटिंग व्यवस्थापन क्षेत्रात कार्यरत आहेत.)
स्मार्ट उद्योजक® मासिकात तुमची कथा किंवा तुमची मुलाखत प्रसिद्ध करू इच्छित असाल, तर येथे क्लिक करा. : https://bit.ly/3bPrfMd
Free Newsletter on WhatsApp & Telegram
'स्मार्ट उद्योजक'चे उद्योजकता आणि व्यवसायविषयक लेख वाचण्यासाठी जोडले जा : WhatsApp ग्रुपवर आणि टेलिग्राम चॅनेलवर.