पुण्यातील महिला उद्योजिकांनी एकत्र येवून सुरू केले ‘पुला’ अ‍ॅप

कोरोना या साथीच्या आजारादरम्यान पुण्यातील छोट्या उद्योजिका व घरगुती महिला उद्योजिकांना मदत करण्यासाठी सोनिया कोंजेती यांनी ‘पुला’च्या माध्यमातून त्यांच्या व्यवसायांना चालना देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यामुळे लॉकडाऊनच्या काळात ही या महिलांना त्यांचे उत्पादन वितरण करण्यास शक्य झाले.

पुण्यातील महिलांचा समूह असलेल्या ‘पुला’ या पुणे लेडीस फेसबुक ग्रुपने छोट्या उद्योजिका व घरगुती महिला उद्योजिकांसाठी आर्टीफिसिअल इंटेलिजन्स या अत्याधुनिक तंत्रज्ञांच्या मदतीने एक व्यासपीठ निर्माण केले आहे. या तंत्रज्ञानाच्या मदतीने छोट्या व घरगुती व्यवसायांमध्ये कशी वृद्धी होईल व हे व्यवसाय कसे सुलभरीत्या करता येतील याकडे लक्ष देण्यात आले आहे.

‘पुला’ हा सोनिया कोंजेटी यांनी सुरू केलेला पुण्यातील जवळपास अडीच लाख महिलांचा समूह आहे. या समूहात घरगुती व्यवसाय करणाऱ्या महिला व अनेक छोटे व्यवसाय करणाऱ्या महिलांचा समावेश आहे. पुलाच्या माध्यमातून अनेक महिलांनी आपला व्यवसाय सुरु करून तो मोठ्या प्रमाणात वाढवलादेखील आहे. अशाच उद्योजिका महिलांसाठी पुलाने ‘पुला बाजार प्लस’ नावाचे नवीन व्यासपीठ तयार केले आहे यात सर्व पुला विक्रेते आणि सेवा प्रदात्यांना आपल्या व्यवसायाचे व्यवस्थापन व आयोजन करण्यास याचा फायदा मिळणार आहे. हे ॲप उद्योजिकांना ग्राहकांकडून मिळालेल्या ऑर्डर व्यवस्थापन, पेमेंट, त्याची डिलिव्हरी, वेळापत्रक, सूची व यादी इ. अशा अनेक सेवा देण्यास उद्योजिकांना मदत करणार आहे.

लॉकडाऊनच्या काळात या व्यवसायांना चालना देण्यासाठी आवश्यक असलेल्या परवानग्या पुणे पोलिसांकडून घेण्यात आल्या. तसेच छोट्या व्यवसायांना सुरळीत चालू ठेवण्यास आणि त्यांची उत्पादने पुणे शहरातील ग्राहकांपर्यंत पोचवण्यास मदत करण्यात आले असल्याची माहिती ‘पुला’च्या संथापक सोनिया कोंजेती यांनी दिली.

यावर सोनिया कोंजेटी म्हणाल्या कि, “आम्हाला पुण्याच्या प्रत्येक महिलेला आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवायचे आहे. जेणेकरून प्रत्येक महिला आपल्या पायावर उभी राहील व आपला व्यवसाय जास्तीत जास्त प्रमाणात वाढवेल. आम्ही पुण्यातील महिलांचा एक मोठा व दिवसेंदिवस वाढत चाललेला समूह आहोत यातील उद्योजिकांना त्यांच्या व्यवसायवाढीसाठी सर्वोत्तम व्यासपीठ मिळवून देण्याचा आमचा हा प्रयत्न आहे. त्यापुढे म्हणाल्या की, “महिला उद्योजकांना मदत करणे आणि सक्षम बनवणे हे पुलाचे मुख्य उद्दीष्ट आहे आणि हे व्यासपीठ लघुउद्योग आणि गृहउद्योग आधारित महिला उद्योजकांसाठी आहे.”

‘पुला बाजार प्लस’मध्ये आर्टीफिसिअल इंटेलिजन्स व मशीन लर्निंगचा वापर करण्यात आला आहे. तसेच फेसबुक एपीआयची अधिकृत मंजूरदेखील घेण्यात आलेली आहे. या तंत्रज्ञानाचा सर्वात मोठा फायदा पुलाच्या फेसबुक ग्रुपवर आलेल्या लीड्स उद्योजिकांना त्यांच्या व्यवसायाप्रमाणे वर्गीकृत होतील व त्या ग्राहकांशी संपर्क साधने सोईचे होईल.

‘पुला बाजार प्लस’ कोणत्याही प्रकारच्या लघुउद्योग आणि गृहउद्योग चालवणाऱ्या महिलांसाठी आहे. यात विक्रेत्याला त्याच्या मालाची यादी, साठा व तसेच उत्पादनांचा आकार आणि रंग इत्यादीत फरक व्यवस्थापित करण्यास मदत करते. त्याचबरोबर ग्राहकांकडून आलेल्या ऑर्डरचे व्यवस्थापन, त्याची डिलिव्हरी करणे व ग्राहकाकडून पेमेंट घेणेयांसारख्या अनेक सुविधा यामध्ये विक्रेत्याला मिळतात.

हे व्यासपीठ महिला व्यावसायिकांना ग्राहकांपर्यंत पोहचवण्याचे आणि त्यांच्याशी संपर्क साधण्याचे काम सुलभ करते. मुख्य म्हणजे विक्रेत्यांना त्यांची विक्रीप्रक्रिया पुढे नेण्यास व वाढवण्यास मदत करते.

– विपुल दुलंगे
संपर्क – ८००७०१२५०१

Author

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ मध्ये 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?