उद्योगवार्ता

पुण्यातील हा स्टार्टअप होतोय कोविड-१९ मध्ये शेतकरी व ग्राहकांमधील दुवा

स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मिळवा फक्त ₹४०० मध्ये. आजच वर्गणीदार व्हा! https://bit.ly/2YzFRct


सध्या कोरोनामुळे शेतकऱ्यांसमोर आपला शेतमाल कुठे आणि कसा विकायचा, हा प्रश्न उभा राहिला आहे. बऱ्याचशा कृषी उत्पन्न बाजार समित्याही बंद आहेत. त्यामुळे पुण्यातील ‘फ्रुटीजम’ ही स्टार्टअप कंपनी शेतकऱ्यांकडून शेतमाल घेऊन तो पुण्यात घरोघरी ग्राहकांच्या दारात पोहोचवणार आहे.

‘फ्रुटीजम’ ही फळ आणि फळांपासून बनलेले पदार्थ ऑनलाइन विकणारं पुण्यातील स्टार्टअप आहे. कोविडच्या या काळात शेतकरी आणि सामान्य ग्राहकांची गरज ओळखून त्यांनी आपल्या कामात हा बदल केला आहे. याचसोबत गृहउद्योग करणाऱ्या महिलांची उत्पादनेही ‘फ्रुटीजम’ विकणार आहे.

फक्त ₹२२२ मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिकाच्या डिजिटल आवृत्तीचे आजीवन वर्गणीदार व्हा आणि अगणित फायदे मिळवा!

अधिक माहितीसाठी : https://rzp.io/l/smartudyojak

माल ग्राहकापर्यंत पोहोचवताना आम्ही सोशल distancing व इतर सर्व बंधनांचे पालन करतो, अशी माहिती ‘फ्रुटीजम’चे संचालक दीप भोंग यांनी दिली. शेतकरी किंवा गृहोद्योग हे ‘फ्रुटीजम’शी जोडले जाण्यासाठी 7281911558 वर संपर्क साधू शकतात.

– टीम स्मार्ट उद्योजक


Free Newsletter on WhatsApp & Telegram

'स्मार्ट उद्योजक'चे उद्योजकता आणि व्यवसायविषयक लेख वाचण्यासाठी जोडले जा : WhatsApp ग्रुपवर आणि टेलिग्राम चॅनेलवर.

error: Content is protected !!