1007 annual marketing

दोन कर्मचाऱ्यांपासून ते २०० कर्मचाऱ्यांपर्यंत झेप घेणारा ब्रँड ‘BTW Visa Services’

ब्रॅण्डचे नाव : BTW Visa Services India Pvt Ltd

ब्रॅण्डची स्थापना : २०११

बी टी डब्ल्यू व्हिसा सर्व्हिसेस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या ट्रॅव्हल आणि टुरिझम क्षेत्रातील “व्हिसा” हे प्रमुख उद्देश आणि काम करणारी कंपनी सुरू केली. डेक्कन भागातील गरवारे कॉलेजसमोर एका बंगल्याच्या आउटहाऊसमध्ये केवळ २ सहकाऱ्यांना घेऊन पार्ट टाइम सुरू झालेली प्रोप्रायटरी संस्था आज २०२५ मध्ये लवकरच १५ वर्षे ग्राहकांच्या सेवेत कटिबद्ध आहे.

दोन कर्मचाऱ्यांपासून ते २०० कर्मचार्यांपर्यंत, प्रोप्रायटरी संस्था ते प्रायव्हेट लिमिटेड कंपनी, एका आऊट हाऊसपासून ते पुण्यात मुख्यालय, मुंबईमध्ये दादर आणि ठाणे यासारख्या प्रमुख ठिकाणी शाखा हा बीटीडब्ल्यू’चा प्रवास नक्कीच विलक्षण आणि थक्क करणारा आहे.

२०१० – १२ मध्ये डिजिटल क्रांतीकडे जग वाटचाल करताना, प्रवासी ग्राहकांचा कल हळूहळू ट्रॅव्हल एजन्सीकडे कमी होत होता आणि लोकांना ट्रॅव्हल एजन्टपेक्षा गरज होती ती एका ट्रॅव्हल कंसल्टंटची. असा सल्लागार की जो प्रवाशांना प्रामुख्याने व्हिसा application साठी मदत करेल, योग्य तो आणि वेळ पडल्यास निव्वळ नफ्याचा विचार न करता परखड सल्ला देईल.

WhatsApp Channel Banner

ग्राहक प्रथम, पारदर्शी व्यवहार आणि दर्जेदार सेवा ही व्यवसायाची मूलभूत त्री-सूत्र घेऊन गेली १४ वर्षे व्हिसा प्रोसेसिंगमध्ये अविरत आणि अग्रगण्य असे काम बी टी डब्ल्यू व्हिसा सर्व्हिसेस करत आहे.

प्रवास BTW Visa Services चा

पहिल्या पिढीतील उद्योजक म्हणून दीप भोंग यांचा प्रवास उल्लेखनीय राहिला आहे. त्यांनी त्यांची उद्योजकता कौशल्य आणि नावीन्यपूर्ण मानसिकता ठेऊन , आपल्या व्यवसाची व्याप्ती भारतभर वाढवली. त्यांच्या नेतृत्वाखालील प्रत्येक व्यावसायिक संस्था हे त्यांचे कौशल्य, नवकल्पना आणि उत्कृष्टतेप्रती असलेल्या समर्पणाचा पुरावा आहे.

प्रवास आणि पर्यटन क्षेत्रातील दूरदर्शी दीप भोंग यांचा जन्म इंदापूर तालुक्यात, वरकुटे खुर्द येथे झाला. पर्यटन क्षेत्रातील त्यांचा शैक्षणिक प्रवास पुण्यात सुरू झाला, जिथे त्यांनी प्रवास आणि पर्यटनाचे शिक्षण घेतले. या मूलभूत अनुभवाने त्याच्या भविष्यातील उद्योजकतेच्या प्रयत्नांसाठी पायाभरणी केली.

२०१० मध्ये दीप भोंग यांनी बी. टी. डब्ल्यू. व्हिसा सर्व्हिसेसची स्थापना करून व्हिसा स्पेशलायझेन म्हणून काम करणारी ट्रॅव्हल कंपनी सुरू करून प्रवास आणि पर्यटन उद्योजकता विश्वात आपली ओळख निर्माण करण्यास सुरुवात केली. ही कंपनी थोड्याच कालावधीत पुण्यातील प्रवासी कंपन्यांमध्ये, व्हिसा प्रोसेसिंगचे काम करण्यात अग्रगण्य आणि अग्रेसर म्हणून उदयास आली.

भोंग यांच्या नेतृत्वाखाली कंपनीने व्हिसा सुविधेच्या क्षेत्रात आपले कौशल्य आणि कार्यक्षमतेसाठी प्रतिष्ठा मिळवली आणि आजतागायत लाखो व्हिसा application यशस्वीरीत्या प्रोसेस केले आणि हजारो ग्राहक जोडले.

Sponsored Article

तुमचा व्यवसाय हजारो वाचकांपर्यंत पोहोचवा

'स्मार्ट उद्योजक' पोर्टलवर तुमच्या व्यवसायाबद्दल सविस्तर Sponsored Article प्रकाशित करा आणि नवीन ग्राहकांपर्यंत पोहोचा.

🚀 अधिक माहिती

प्रवास आणि पर्यटन उद्योगाचे परस्परांशी जोडलेले स्वरूप ओळखून दीप भोंग यांनी बी. टी. डब्ल्यू. ग्रुप ऑफ कंपनीजची स्थापना करून आपल्या व्यवसायाचा विस्तार केला. हा विस्तार धोरणात्मकदृष्ट्या उद्योगाच्या बदलत्या गरजा आणि मागण्यांशी सुसंगत होता आणि जो बी. टी. डब्ल्यू. व्हिसा सर्व्हिसेसद्वारे दिल्या जाणाऱ्या सेवांना पूरक होता. सर्वसमावेशक सेवा देण्याच्या त्यांच्या प्रयत्नात दीप भोंग यांनी कालांतराने भाषांतर, अटेस्टेशन, अपोस्टाईल सेवांच्या क्षेत्रातही प्रवेश केला.

बी. टी. डब्ल्यू. ग्रुप ऑफ कंपनीजचा विस्तार इथंच थांबला नाही. दीप भोंग यांनी पर्यटन विषयातील कोर्सेस, ई-वाणिज्य, खाद्यव्यवसाय, वित्तीय सेवा आणि आंतरराष्ट्रीय चलनाशी निगडती फॉरेक्स सेवा अशा एकमेकांना पूरक क्षेत्रांमध्ये विविधता आणणे सुरू ठेवले. या प्रत्येक उपक्रमाने उदयोन्मुख कल आणि संधी ओळखण्याची आणि त्यांचा फायदा घेण्याची त्यांची क्षमता दर्शवली.

दीप भोंग हे एका उत्कट आणि कुशल व्यवसाय संस्थापकाचे प्रमुख उदाहरण आहे. पुण्यातील एका विद्यार्थ्यापासून प्रवास आणि पर्यटन उद्योगातील अग्रगण्य व्यक्तीपर्यंतचा त्यांचा प्रवास ही महत्त्वाकांक्षा, दूरदृष्टी आणि यशाच्या अथक प्रयत्नांची प्रेरणादायी कथा आहे. त्यांच्या योगदानामुळे केवळ त्यांच्या कंपन्यांची प्रगती झाली नाही तर भारतातील प्रवास आणि पर्यटन क्षेत्रावरही लक्षणीय परिणाम झाला आहे.

या ब्रॅण्ड अंतर्गत कोणकोणती प्रॉडक्ट्स किंवा सेवा येतात?

Visa Processing, Travel Insurance & Air Ticketing

We are a visa processing company. We process 03 categories visas. Abbreviations of BTW is B- Business visas, T – Tourist visas & W for Work visas.

deep bhong
दीप भोंग

कंपनीचे डायरेक्टर्स : दीप भोंग व नीलम भोंग

Contact: 020-49027000 | 022-69814000 | 022-69745000

Office Locations:

  1. Thane: https://g.co/kgs/mqkLsH
  2. Dadar: https://g.co/kgs/xuAUW9
  3. Pune: https://g.co/kgs/AAZtJU

Website: https://btwvisas.com/

Social Media Links:

Author

तुमची यशोगाथा हजारो वाचकांपर्यंत पोहोचवा

तुमचा व्यवसाय वेगळा आहे. तुमचा प्रवास प्रेरणादायी आहे. आता ही कथा अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची वेळ आली आहे.

'स्मार्ट उद्योजक' मासिकात तुमची उद्योजक कथा प्रकाशित करून मिळवा:

  • ✅ ब्रँड व्हिजिबिलिटी
  • ✅ व्यावसायिक प्रतिष्ठा
  • ✅ ग्राहकांचा वाढता विश्वास
  • ✅ सोशल मीडिया प्रमोशन

तुमची कथा पुढील अंकात प्रसिद्ध करण्यासाठी अर्ज करा.

🚀 येथे क्लिक करा
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
Smart-Udyojak-5-years-subscription