1007 annual marketing

महाराष्ट्रातल्या अग्रगण्य ‘सक्सेस अबॅकस’चा ५००+ फ्रँचायझींचा टप्पा पार

‘सक्सेस अबॅकस’ नावातच यश दडलेलं आहे. २०१३ साली स्थापन झालेल्या या ब्रँडने अवघ्या तेरा वर्षांत महाराष्ट्रातील शिक्षण क्षेत्रात एक अग्रगण्य स्थान मिळवलं आहे. १०० फ्रँचायझींपासून सुरू झालेला हा प्रवास आज ५०० हून अधिक फ्रँचायझींपर्यंत पोहोचला आहे.

Kiran Patil Founder of Success Abacus
किरण पाटील

ही गोष्ट आहे सातार्‍यातील किरण पाटील यांची. ज्यांनी ग्रामीण आणि शहरी मुलांपर्यंत गणिताची गोडी निर्माण करणारं शिक्षण पोहोचवलं आणि असंख्य फ्रँचायझीधारकांना यशस्वी उद्योजक बनवलं.

‘सक्सेस अबॅकस’ची सुरुवात ही एका महत्त्वाकांक्षी विचारातून झाली. मुलांमधील गणिताची भीती दूर करून आत्मविश्वास निर्माण करायचा होता. म्हणूनच मग अबॅकस हे केवळ शहरी मुलांसाठीच नाही, तर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही परवडेल आणि त्यांना फायदा होईल, असं शिक्षण देण्याचं ध्येय या ब्रँडने डोळ्यासमोर ठेवलं.

यासाठी त्यांनी दहा स्तरांचा पारंपरिक अबॅकस अभ्यासक्रम चार स्तरांमध्ये शास्त्रशुद्ध पद्धतीने सुलभ केला. यामुळे ग्रामीण पालकांना हा खर्च परवडणारा झाला आणि मुलांना गणिताची गोडी लागली. या संवेदनशील दृष्टिकोनामुळे ‘सक्सेस अबॅकस’ने पालकांचा विश्वास जिंकला आणि एक विश्वासार्ह ब्रँड म्हणून स्वत:ची ओळख निर्माण केली.

‘सक्सेस अबॅकस’ने आपल्या व्यवसायविकासावर सातत्याने लक्ष केंद्रित केलं. गेल्या दोन वर्षांत शंभरवरून ५०५ फ्रँचायझींपर्यंतचा प्रवास हा त्यांच्या नियोजनशीलतेचा आणि चिकाटीचा पुरावा आहे. सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, नाशिक, ठाणे, पुणे आणि अगदी गुजरातपर्यंत त्यांचा विस्तार झाला. यात त्यांच्या प्रभावी मार्केटिंग धोरणांचा मोठा वाटा आहे.

WhatsApp Channel Banner

पारंपरिक प्रिंट आणि टिव्ही माध्यमांसोबतच सोशल मीडियाचा हुशारीने वापर करून त्यांनी आपला टारगेट प्रेक्षकवर्ग गाठला. डॉ. अमोल कोल्हे आणि स्वप्नील जोशी यांसारख्या लोकप्रिय व्यक्तींना ब्रँड अँबेसेडर बनवून त्यांनी विश्वासार्हतेची पायरी आणखी मजबूत केली.

कोरोना काळात जेव्हा सर्व काही ठप्प झालं, तेव्हा ‘सक्सेस अबॅकस’ने ऑनलाइन शिक्षणाचा पर्याय स्वीकारला. हा निर्णय त्यांच्यासाठी टर्निंग पॉइंट ठरला. ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतींनी फ्रँचायझी चालवण्याची लवचिकता त्यांनी विकसित केली. यामुळे विद्यार्थ्यांना सातत्याने शिक्षण मिळालं आणि फ्रँचायझीधारकांना व्यवसायात स्थिरता मिळाली.

महाराष्ट्राचा महाब्रँड २०२४’ आणि ‘नंबर वन इन्स्टिट्यूट ऑफ अबॅकस इन महाराष्ट्र’ यासारख्या पुरस्कारांनी त्यांचा हा प्रवास सन्मानित झाला आहे. ‘सक्सेस अबॅकस’च्या यशामागे त्यांच्या फ्रँचायझीधारकांचं योगदान महत्त्वाचं आहे. विशेषत: महिलांनी यात मोठी कामगिरी केली आहे.

पुण्यातील पूजा सलगर यांनी ऑनलाइन फ्रँचायझीच्या माध्यमातून सलग तीन वर्षे शंभरहून अधिक विद्यार्थ्यांचं प्रवेश नोंदवलं आणि ‘शतकवीर सन्मान’ पटकावला. त्यांनी या कमाईतून १५ लाखांचं डाऊनपेमेंट करून स्वप्नातलं घरखरेदी केलं. योगिता पाटील यांनी स्वत:ची कार घेतली, तर अश्विनी फडतरे यांनी कौटुंबिक जबाबदार्‍यांनंतर पुन्हा करिअरला सुरुवात करत दोनशेहून अधिक विद्यार्थ्यांना शिकवलं.

success abacus franchise owner success story

Sponsored Article

तुमचा व्यवसाय हजारो वाचकांपर्यंत पोहोचवा

'स्मार्ट उद्योजक' पोर्टलवर तुमच्या व्यवसायाबद्दल सविस्तर Sponsored Article प्रकाशित करा आणि नवीन ग्राहकांपर्यंत पोहोचा.

🚀 अधिक माहिती

गोव्यातील मंदा पाटील यांनी तिनशेहून अधिक प्रवेश नोंदवले. अशा अनेक प्रेरणादायी कथा ‘सक्सेस अबॅकस’च्या यशात भर घालतात. कंपनीच्या ट्रेनिंग प्रोग्राम्स आणि डिजिटल मार्केटिंग सपोर्टमुळे फ्रँचायझीधारकांना व्यवसाय वाढवणं सोपं झालं आहे.

‘सक्सेस अबॅकस’च्या फ्रँचायझी घेण्यासाठी एक लाख ते दीड लाख रुपये गुंतवणूक लागते, ही गुंतवणूक पहिल्याच वर्षात फ्रँचायझीधारक या व्यवसायातून कमावतो. शिकवण्याची आवड असणार्‍या व्यक्तींसाठी, विशेषत: महिलांसाठी ही संधी आहे. ऑनलाइन फ्रँचायझींसाठी कमी गुंतवणूक आणि हाय-स्पीड इंटरनेटसह लॅपटॉप किंवा मोबाइल फोनच्या साहाय्याने व्यवसाय सुरू करता येतो.

‘सक्सेस अबॅकस’ची फ्रँचायझी घेणार्‍यांसाठी ट्रेनिंग मराठी, हिंदी आणि इंग्रजी या तिन्ही भाषेत उपलब्ध आहे. तसेच तिन्ही भाषेत क्लासेसदेखील घेऊ शकतात. ‘सक्सेस अबॅकस’ नव्या फ्रँचायझीधारकांना अनेक फायदे देते. कंपनी डिजिटल मार्केटिंग सपोर्ट, तयार पोस्ट्स देते. शिवाय वेळोवेळी ट्रेनिंग प्रोग्राम्स घेते. याशिवाय ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतींनी व्यवसाय चालवण्याची लवचिकता, कमी गुंतवणूक आणि पहिल्याच वर्षी नफ्याची शक्यता यामुळे हा व्यवसाय आकर्षक आहे.

‘सक्सेस अबॅकस’चा अभ्यासक्रम इंग्रजी, मराठी आणि हिंदी भाषांमध्ये उपलब्ध आहे, ज्यामुळे स्थानिक पातळीवर विद्यार्थ्यांशी संवाद साधणं सोपं होतं. येत्या काळात पॅन इंडिया विस्ताराचं उद्दिष्ट ठेवणारा हा ब्रँड नव्या उद्योजकांसाठी एक मोठी संधी आहे.

‘सक्सेस अबॅकस’ने केवळ व्यवसायातच यश मिळवलं नाही, तर विद्यार्थ्यांच्या प्रगतीतही महत्त्वाची भूमिका बजावली आहे. अनेक विद्यार्थ्यांनी गणिताची भीती दूर करून स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवलं. हर्षवर्धन देशमुख, अंश कुलकर्णी आणि शुभम जाधव यांनी वर्ल्ड रेकॉर्ड्स प्रस्थापित केले.

संस्थेच्या गेल्या वर्षी पुणे येथील बालेवाडी स्टेडियम येथे झालेल्या नॅशनल लेव्हल अबॅकस कॉम्पिटिशनमध्ये २,५०० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून एक विश्वविक्रम प्रस्थापित केला. याशिवाय अबॅकसमध्ये चौथ्या स्तरावर प्रथम येणार्‍या विद्यार्थ्याला एक लाखाची स्कॉलरशिप आणि विविध बक्षिसांद्वारे मुलांना प्रोत्साहन दिलं जातं.

मुलांसाठी वक्तृत्व, चित्रकला स्पर्धा घेतल्या जातात. तर सजग पालकत्वासाठी व्याख्यानं आयोजित करून ‘सक्सेस अबॅकस’ सामाजिक बांधिलकीही जोपासत आहे. ‘सक्सेस अबॅकस’चं स्वप्न आहे १ हजार फ्रँचायझींपर्यंत विस्तार करणं आणि संपूर्ण भारतात आपली छाप पाडणं. त्यांनी इंग्रजी, मराठी आणि हिंदी भाषांमध्ये कंटेंट विकसित केलं आहे. त्यांचं कस्टमर केअर युनिट, १४-१५ जणांची प्रशासकीय आणि मार्केटिंग टीम आणि ट्रेनिंग टीम यांच्या समन्वयाने हा ब्रँड सतत सुधारणा करत आहे.

‘सक्सेस अबॅकस’ ही केवळ एक कंपनी नाही, तर एक प्रेरणादायी प्रवास आहे. जिथे स्वप्नं साकार होतात, मुलांचं भविष्य घडतं आणि उद्योजकांना यशाची नवी दिशा मिळते. जर तुम्हीही तुमची स्वप्न साकारण्यासाठी एका संधीच्या शोधत असला तर ‘सक्सेस अबॅकस’च्या फ्रँचायझीचा पर्याय तुमच्यासाठी एक संधी आहे.

‘सक्सेस अबॅकस’ची फ्रँचायझीं घेण्यासाठी संपर्क : 8888560022

Table of Contents

Author

  • pratibha shailesh rajput

    यांनी पदव्युत्तर पत्रकारितेत पदविका केली आहे. प्रिंट माध्यमांत काही काळ काम केल्यानंतर त्यांनी स्मार्ट उद्योजक हे मासिक सुरू केले.

    View all posts

तुमची यशोगाथा हजारो वाचकांपर्यंत पोहोचवा

तुमचा व्यवसाय वेगळा आहे. तुमचा प्रवास प्रेरणादायी आहे. आता ही कथा अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची वेळ आली आहे.

'स्मार्ट उद्योजक' मासिकात तुमची उद्योजक कथा प्रकाशित करून मिळवा:

  • ✅ ब्रँड व्हिजिबिलिटी
  • ✅ व्यावसायिक प्रतिष्ठा
  • ✅ ग्राहकांचा वाढता विश्वास
  • ✅ सोशल मीडिया प्रमोशन

तुमची कथा पुढील अंकात प्रसिद्ध करण्यासाठी अर्ज करा.

🚀 येथे क्लिक करा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
Smart-Udyojak-5-years-subscription