Advertisement
उद्योगवार्ता

पुण्यात १६ फेब्रुवारी रोजी दहा स्टार्टअप फाउंडर करणार मार्गदर्शन

फक्त रु. ५०० मध्ये 'स्मार्ट उद्योजक' प्रिंट मासिक घरपोच मिळवा.

Book Now: https://imjo.in/Xx7Uq6

Print this Page

पुण्यात १६ फेब्रुवारी रोजी ‘पुणे स्टार्टअप २०१९’ या कार्यक्रमाचे OpEx या संस्थेतर्फे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये पुणे परिसरातील दहा स्टार्टअप फाउंडर्स उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत. यामध्ये ‘रोबोलॅब’चे अमोल गुलाने, ‘ब्लु-टाय ग्लोबल’चे कल्याण गरुड, ‘एव्हरटो-केयर’चे विशाल दड्डीकर, ‘फ्रुटीसम’चे दीप भोंग, ‘लेट्सअप’चे सुहास रायकर, ‘मेक-मी-हायर’च्या अंजोरी परंडेकर, ‘अवणी’च्या प्रिया बांदे व ‘हेल्थ सिबील’चे अमोल पाटील यांचा सहभाग आहे.

पुणे विद्यापीठाच्या Incubation सेंटरच्या संचालिका डॉ. अपूर्वा पालकर या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत. बालेवाडी येथील मिटकॉनमध्ये सकाळी ९.३० ते ४.३० या वेळेत हा कार्यक्रम असेल. कार्यक्रमात स्टार्टअपसाठी भांडवल उभारणी, मार्केटमध्ये उतरण्यासाठीची तयारी, त्यातील चांगले-अनुभव, स्टार्टअपसाठीच्या सरकारी योजना याविषयी प्रामुख्याने मार्गदर्शन केले जाणार आहे.

विद्यार्थ्यांसाठी येथे एक स्पर्धाही आयोजित केली आहे. ज्यामध्ये विद्यार्थ्यांना आपले संशोधन मांडता येणार आहे. अधिक माहितीसाठी ९५५२१०८८९९ या क्रमांकावर संपर्क करू शकता.

FREE NEWSLETTER ON WHATSAPP

व्यवसाय आणि उद्योजकतेविषयी माहिती व घडामोडी आपल्या WhatsApp वर मोफत मिळवण्यासाठी ९८३३३१२७६९ या क्रमांकावर आपले नाव सध्या राहत असलेला जिल्हा व तालुका WhatsApp करा.


Paytm वापरकर्त्यांसाठी बंपर ऑफर

'स्मार्ट उद्योजक' मासिकाची वार्षिक डिजिटल वर्गणी

Paytm वर मिळवा आता फक्त ₹५० मध्ये.


Help-Desk
%d bloggers like this: