Advertisement
उद्योगवार्ता

महिलांनी तयार केलेल्या गोधड्या व अन्य कलात्मक वस्तूंचे पुण्यात प्रदर्शन

'स्मार्ट उद्योजक' डिजिटल आवृत्तीचे वर्गणीदार व्हा फक्त १२५ मध्ये!

Book Here: https://imjo.in/YSMSQK

पुण्यामध्ये येत्या २९ व ३० सप्टेंबर रोजी महिला उद्योजिकांनी तयार केलेल्या पारंपारिक व आधुनिक गोधडीचे व इतर कलात्मक वस्तूंचे प्रदर्शन व विक्री भरवली जात आहे. ‘याद्रा क्विल्ट’च्या संस्थापिका चंद्रिका नवगण यांनी या प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. त्यांच्यासोबत ‘तंबू मार्केट’च्या गायत्री चवरेकर, ‘शुभदा बेकरी’च्या शुभदा, ‘पिनू दा कलेक्शन’च्या विन्नी महाजन, ‘अक्षरगणेश कॅलिग्राफी’चे योगेश फडके व ‘डार्क वॉल स्टुडिओ’चे प्रेम आवळे हे या प्रदर्शनात आपल्या कलेचे सादरीकरण करणार आहेत.

या प्रदर्शनाचे वैशिष्ट्य म्हणजे यातील सहभागी उद्योजकांनी आपल्या आवडीला-छंदालाच आपल्या व्यवसायात रूपांतरीत केले आहे. नवोदित उद्योजक, महाविद्यालयीन तरुण-तरुणी, गृहिणी व सर्व स्तरातील महिलांना या प्रदर्शनातून बरेच काही शिकायला मिळणार आहे. पुण्यातील लॉ कॉलेज रोडवरील दामले सभागृहात सकाळी ११ ते राती ८ या वेळेत हे प्रदर्शन असेल. यामध्ये गोधणी शिवायला शिकने तसेच स्वत:च्या हाताने गोधणी शिवण्याचा अनुभव घेता यावा यासाठी एका कार्यशाळेचेही आयोजन केले आहे. अतिशय शुल्लक शुल्कात या कार्यशाळेत भाग घेऊन गोधडी शिकण्याचे प्रशिक्षण घेता येऊ शकेल. अधिक माहितीसाठी चंद्रिका यांना ७०५७८४६६४५ या क्रमांकावर संपर्क साधू शकता.

 


FREE NEWSLETTER ON WHATSAPP

व्यवसाय आणि उद्योजकतेविषयी माहिती व घडामोडी आपल्या WhatsApp वर मोफत मिळवण्यासाठी ९८३३३१२७६९ या क्रमांकावर आपले नाव सध्या राहत असलेला जिल्हा व तालुका WhatsApp करा.

Help-Desk
%d bloggers like this: