स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मिळवा फक्त ₹४०० मध्ये. आजच वर्गणीदार व्हा! https://bit.ly/2YzFRct
शेअर बाजारात पैसे कमवणे हे आपल्याकडे अत्यंत कठीण काम मानले जाते. परंतु अश्या एका व्यक्तीची ही कथा आहे ज्यांनी केवळ ५,००० रुपये गुंतवून आता त्यांनी १० हजार कोटींचे साम्राज्य उभे केले आहे! ही व्यक्ती म्हणजे ‘भारतीय वॉरेन बफेट’ नावानी ओळखले जाणारे राकेश झुनझुनवाला. ह्यांनी १९८५ साली संपूर्णपणे शेअर बाजारात लक्ष देणे सुरू केले. त्यावेळी सेंसेक्स मध्ये फक्त १५० कंपन्या होत्या.
गेल्या एक वर्षात राकेश झुनझुनवाला दर आठवड्याला ५९ करोड रुपये कमावतात. म्हणजेच त्यांच्या मनात असते तर त्यांना दर तासाला एक मर्सिडीज बेंझ किंवा बी. एम. डब्ल्यू. घेणे सहज शक्य आहे!
फक्त ₹२२२ मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिकाच्या डिजिटल आवृत्तीचे आजीवन वर्गणीदार व्हा आणि अगणित फायदे मिळवा!
अधिक माहितीसाठी : https://rzp.io/l/smartudyojak
राकेश झुनझुनवाला हे ‘बाय राइट एंड होल्ड टाइट’ या सिद्धांतानुसार काम करतात. ते म्हणतात, “जिंकण्यात सर्वांचा फायदा आणि हरण्यात सर्वांचे नुकसान, असे होणे शक्य नाही. त्यामुळे मी जगातील सर्वांत श्रीमंतांच्या यादीत येतो की नाही हे मला माहित नाही परंतु सर्वात महत्त्वाचे म्हणजे मला माझ्या कामातून आनंद मिळतो; आणि त्याचा परिणाम म्हणून मला पैसे मिळतात. माझा उद्योजकतेचा मंत्र अगदी सोपा आहे : ‘बाय राइट एंड होल्ड टाइट’ म्हणजेच योग्य वेळी योग्य तो शेअर विकत घ्या आणि मग त्याला घट्ट धरून ठेवा.
उद्योगात गुंतवणूक करा, कोणत्या कंपनीत नको
झुनझुनवाला नेहमी म्हणतात ही कंपनीत नको तर तिच्या कामांत गुंतवणूक केली पाहिजे. एखादी मोठी कंपनी असेल तर ती आणखी मोठी होणारही नाही परंतु एखादा उत्तम उद्योग असेल तर तो जरूर मोठा होईल. तसेच एखादा उद्योग कोणत्या प्रकारच्या कामांत गुंतलेला आहे ह्याचासुद्धा नीट विचार करायला हवा.
यावरूनच त्या उद्योगाचे योग्य भविष्य म्हणजेच हा उद्योग पुढे किती नफा मिळवून देऊ शकतो हे समजते आणि एका गुंतवणूकदाराला नफा सोडून आणखी काय महत्त्वाचे असेल!
झुनझुनवाला ह्यांना नेहमीच फायदा होतो असे नाही तर नुकसानही होते. तेव्हा ते म्हणतात की ‘फायदा झाला तर आनंद माना पण नुकसान झाले तर दुःख करत बसू नका, पुढच्या फायद्याची तयारी सुरू करा’.
– टीम स्मार्ट उद्योजक
Free Newsletter on WhatsApp & Telegram
'स्मार्ट उद्योजक'चे उद्योजकता आणि व्यवसायविषयक लेख वाचण्यासाठी जोडले जा : WhatsApp ग्रुपवर आणि टेलिग्राम चॅनेलवर.