Smart Udyojak Billboard Ad

प्राकृत शेतीच्या प्रसारासाठी गांडूळखतांचा व्यवसाय करणारे रवींद्र वालावलकर

भारत हा जगात एक कृषीप्रधान देश म्हणून ओळखला जातो. संपन्नतेचे, ऐश्वर्याचे प्रतीक म्हणजे सोने. माती ही सोन्यापेक्षा मौल्यवान असा नैसर्गिक घटक आहे. भारतातील संपूर्ण शेती पद्धती वैदिक (नैसर्गिक) ज्ञानाचा वापर करून हवामानाच्या शक्यतांचा अभ्यास करून आणि देशी बियाणांचा वापर करीत पर्यावरण संतुलित राहील अशा पद्धतीने केली जात होती, पण हायब्रीड संकरित बियाणे जन्माला आले आणि सिंचनाच्या सोयी यामधून शेतीची क्रांती घडली, पण वेळेनुसार पर्यायी कीटकनाशकांची गरज आणि रासायनिक खतांची गरज जास्त पडू लागली.

शेतीमध्ये कीटकनाशकांचा भरमसाठ व अनिर्बंध वापरामुळे शेतकर्‍याच्या मित्र असलेल्या अनेक किटकांचा नाश झाला व शत्रू किड्यांमध्ये कीटकनाशकांना प्रतिकार करायची क्षमता वाढली, पण अजूनही वेळ ही प्रत्येक शेतकर्‍यांच्या मुठीत शाबूत आहे. वेळ ओळखून आज भारतीय कृषीव्यवस्थेला मजबूत करण्यासाठी सेंद्रिय शेती हाच खरा व शाश्वत पर्याय आहे. पण यासाठी शेतकऱ्यांनी स्वतःवर विश्वास आणि प्राकृतिक कृषीव्यवस्थेवर श्रद्धा ठेवली पाहिजे.

सेंद्रिय शेतीत उत्पादन घेणे अवघड आहे, पण अशक्य नाही. आज गांडूळखत, जिवामृत, मृत सूक्ष्मजीव सजीवांची शरीरे व अवयव यांना कुजवून त्यातून अलग होणारी सूक्ष्म अन्नद्रव्ये वनस्पतींना उपलब्ध करून देतात या शृंखलेला सेंद्रिय पद्धती म्हणतात. संयम, अभ्यास, चिकाटी व प्रयोगांद्वारे सेंद्रिय शेती व सेंद्रिय खत कीटकनाशके बनवण्यात यश हे सहज साध्य करता येते.

स्वातंत्र्यानंतरच्या ६० ते ७० वर्षांमध्ये शेतकऱ्याला कर्जबाजारी न ठेवता कर्जमुक्ती व्हावी या विषयावर चर्चा व वादंग न करता तो परावलंबी न होता स्वतःच्या पायावर उभा राहून स्वावलंबी कसा होईल याकडे सर्वांनीच दुर्लक्ष केले व त्यामुळे आजची ही स्थिती उद्भवली. या उद्वेगातून व नैराश्येतून सतत ३१ वर्ष भारतीय शेतकरी हा आत्महत्या करीत राहिला.

आपल्या कोकणात तशी काही परिस्थिती उद्भवलेली नाही व असे होऊ नये त्या करिता शेतकर्‍याने स्वत: समृद्ध व स्वावलंबी व्हायला हवे, ही काळाची गरज आहे.

Ravindra Walawalkarशेती ही विकसीत होऊन कोकणातील शेतकर्‍याला कर्जासाठी हाथ न पसरता कमी खर्चामध्ये जास्त उत्पन्न मिळू शकेल व कोकणातील शेतकर्‍याच्या मुलांना मुंबई-पुणे व अनेक शहरात जाऊन बौद्धिक व मानसिक ऐपतीपेक्षा खालची व शारीरिक क्षमतेपलीकडील नोकरी करून स्वतःच्या आत्मविश्वासाचे भावनीक खच्चीकरण करण्याची वेळ येणार नाही.

व्हा खर्‍या अर्थाने कोकणाचा सुजलाम् सुफलाम् होईल अन्यथा California ची वाट बघता बघता विदर्भ नाही झाला म्हणजे झाले. असेच एक स्वप्न व इच्छा मनी बाळगून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यात साकेडी गावातील रविंद्र दिगंबर वालावलकर यांनी ‘प्राकृत कृषी’ हे नाव ब्रँडिंग करण्यास ठरवले व वडिलोपार्जित जमीनीवर गांडूळखताचा प्रकल्प उभारला आहे.

ध्या १२ x ४ मापाचे १२ वर्मीबेड्स उभारले आहेत व पुढील १० बेड्स उभारण्याचे नियोजन सुरू आहे, ज्यातून साधरणत: ३ ते ४ महिन्यात १५ ते १८ टन खत मिळण्याचे अंदाज आहे. या प्रकल्प उभारणीसाठी त्यांना सहकार्य मिळाले ते त्यांच्या थोरल्या बंधू मधुकर वालावलकर व विजय वालावलकर यांचे. वेळोवेळी त्यांचा भाचा मंगेश सामंत हादेखील बरोबरीला होता. त्यांचे काका माधव पांडुरंग वालावलकर ८० हून अधिक वयाचे असूनही पाठीशी उभे आहेत.

शेती नुसते श्रमाचे प्रतीक न ठेवता देशाचा अन्नदाता हा कचऱ्याचे व सुकलेल्या पतेर्‍याचे जाळून नैसर्गिक प्रदूषण न करता त्याचे वर्गीकरण करून गांडूळ खतामध्ये रुपांतर होऊ शकतो हे दर्शविले आहे. हा प्रकल्प गावास दिशादर्शक ठरू पाहत आहे.

गांडूळखत साधारणपणे २ ते ३ महिन्यात तयार होत असून इतर शेती पिकांच्या तुलनात्मक कमीतकमी खर्चात सुरू केला जाऊ शकतो. गांडूळखत वाफे (Vermibeds) हे पक्के अथवा प्लास्टिक ताडपत्रीचे असून शेण, काडीकचरा व मेहनतीने कधीही रजा न घेणारे कामगार म्हणजे गांडूळ हे या शेतीचे मुख्य घटक आहेत.

गांडूळ हा नाजूक गुळगुळीत, लवचीक शरीर असलेला भूचर असून तो २ इंचापासून दोन फुटापर्यंत लांब असून त्याचे वजन ०.५ ग्रॅम पासून १० ग्रॅमपर्यंत असून शकते. हा रंगाने तांबूस, तपकिरी, लालसर किंवा पांढरट असतो. त्याला हवे ते वातावरण मिळाले की, तो अविश्रांत कार्य करीत असतो. शेण हे गांडूळांचे आवडते खाद्य असून शेणाबरोबर शेतातील काडीकचरा अथवा पालापाचोळा थोडी प्रक्रिया करून दिला तर ते गांडूळांचे उत्तम खाद्य ठरते.

आज रासायनिक खतापेक्षा सेंद्रिय खताची मागणी व त्यातील माती व वृक्ष मित्रघटकांची म्हणजे NPK मात्रा ही जास्त आहे. गांडुळखतामध्ये नत्र ०.६९%, स्फूरद ०.३१%, पालाश ०.११% प्रति १५० ग्राम तसेच मँगनीज, झींक, कॉपर, मंगल, लोह, बोरॉन ही सूक्ष्म अन्नद्रव्ये जास्त प्रमाणात असतात.

या प्रकल्पामुळे गावातील ग्रामस्थांना रोजगाराची संधी ही प्राप्त झाली आहे. अल्प शेतकऱ्यांना बाजारातील गांडूळखत विकत घेउन गाडी भाड्यासकट परवडत नसल्याकारणाने रासायनिक खते वापरुन जमीन नापीक करण्यापासून रोखू शकतो ही मनी संकल्पना आहे.

सध्या काळी मिरी लागवड प्रचारासाठी मिरी बाग तयार करण्यात आलेली आहे व जिल्ह्यात प्रथमच PVC पाईप वर मिरी लागवड करून मिरी लागवड जागा व्यवस्थापन कसे करता येईल याचे प्रयोग सुरू आहे. भविष्यात शेवगा, गव्हांकूर व औषधी शेती करण्याचा मनी ध्यास आहे.

भ्रमणध्वनी : ९८६७२९४२७२ / ९१६७७१०८०२ / ९२२४१९१८११

Author

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

तुम्ही उद्योजक / व्यापारी / व्यावसायिक आहात आणि तुमचीही बिझनेस प्रोफाइल या पोर्टलवर प्रसिद्ध करायची आहे? तर 9833312769 वर "उद्योजक प्रोफाइल" असा मेसेज व्हॉट्सअप करा.

error: Content is protected !!
Scroll to Top