स्टार्टअप

कच्चामाल सहाय्यक योजना

स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मिळवा फक्त ₹४०० मध्ये. आजच वर्गणीदार व्हा! https://bit.ly/2YzFRct


कच्च्या माल हा कोणत्याही उत्पादनाचा आत्मा असतो. त्याशिवाय पुढील सर्व गोष्टी शक्यच नसतात. या क्षेत्रातील उद्योगांचे ८०% बजेट हे कच्च्या मालासाठीच असते. यामुळे कच्च्या मालाचे उत्पादन क्षेत्रातील महत्त्व याचा अंदाज आपण बांधू शकतो.

देशात व्यवसायाला चालना देण्यासाठी आणि व्यावसायिकांना मदत होईल अशा अनेक योजना सरकार राबवत असते. आपण आज कच्चा माल सहाय्यक योजना म्हणजेच RMA (Raw Material Assistant) या योजनेची माहिती जाणून घेऊयात.

फक्त ₹२२२ मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिकाच्या डिजिटल आवृत्तीचे आजीवन वर्गणीदार व्हा आणि अगणित फायदे मिळवा!

अधिक माहितीसाठी : https://rzp.io/l/smartudyojak

सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाची कच्चा माल सहाय्यक योजना RMA (Raw Material Assistant) ही व्यावसायिकांसाठी असलेली एक योजना आहे. कच्च्या मालाच्या खरेदीसाठी वित्तपुरवठा मदत हे हिचे उद्दिष्ट आहे. यामुळे एमएसएमइ उद्योजक अधिक दर्जेदार उत्पादनांची निर्मिती करू शकतात.

या योजनेची काही वैशिष्ट्ये

१. एमएसएमइच्या व्यावसायिक गरजेनुसार कच्चा माल उपलब्ध करून दिला जातो.
२. वेळेवर मालाची डिलिव्हरी दिली जाते.
३. उत्पादनाच्या किंमतीवरच पुरवठा केला जातो.
४. यामुळे आपसूकच मध्यस्थ गाळला जातो.
५. अशा प्रकारे कमी किंमतीत वस्तूंची खरेदी केली जाते.
६. ९० दिवसांपर्यंत कच्च्या मालाच्या खरेदीसाठी आर्थिक सहाय्य (क्रेडिट) दिले जाते.

सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग महामंडळाने कच्च्या मालाच्या मोठया उत्पादकांसोबत करार केला आहे. त्यामुळे मालाच्या गुणवत्तेबाबत कोणताही प्रश्न उद्भवत नाही.

या योजनेचा फायदा कोण कोण घेऊ शकते तर उद्योग आधार मेमोरँडम असलेले कोणतेही उत्पादक एमएसएमई या योजनेंतर्गत मदतीसाठी अर्ज करू शकतात.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी नोंदणी कशी कराल?

१. एनएसआयसीमार्फत कच्चा माल आवश्यक असलेल्या उद्योजक आणि कोणत्याही एमएसएमई ला विहित अर्जामध्ये कच्च्या मालाच्या सहाय्यासाठी एनएसआयसी क्षेत्र कार्यालयात अर्ज करावा लागेल.
२. हा अर्ज (www.nsic.co.in) एनएसआयसीच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे. अथवा स्थानिक क्षेत्र कार्यालय विनामूल्य मिळू शकतो.
३. योग्यप्रकारे भरलेला अर्ज आवश्यक कागदपत्रांसह जवळच्या एनएसआयसीच्या शाखा कार्यालयात सादर केला जाऊ शकतो. एनएसआयसी कार्यालयांचे तपशील व आवश्यक कागदपत्रांची संपूर्ण माहिती येथे उपलब्ध आहेत : http://www.nsic.co.in/Schemes/Raw-Material-Against-BG.aspx
४. एनएसआयसी व व्यवसाय युनिटसोबत करार होतो.

– टीम स्मार्ट उद्योजक


Free Newsletter on WhatsApp & Telegram

'स्मार्ट उद्योजक'चे उद्योजकता आणि व्यवसायविषयक लेख वाचण्यासाठी जोडले जा : WhatsApp ग्रुपवर आणि टेलिग्राम चॅनेलवर.

error: Content is protected !!