स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मिळवा फक्त ₹४०० मध्ये. आजच वर्गणीदार व्हा! https://bit.ly/2YzFRct
टाटा, बिर्ला, बजाज, किर्लोस्कर यांसारख्या मोठ्या कंपन्या त्यांच्या नावाने खपणारा सर्व माल स्वत:च बनवत नाहीत. अर्थशास्त्रात ऑप्टिमम फर्म नावाची एक संकल्पना आहे. थोडक्यात सांगायचे म्हणजे, कंपनीचे सर्व घटक अत्युच्च स्थितीला जेव्हा जातात तेव्हा ती कंपनी ऑप्टिमम फर्म या स्थितीला पोचली असं मानता येईल.
यानंतर समजा त्या कंपनीच्या मालाला पंचवीस टक्के अधिक मागणी आली, तर त्या कंपनीच्या नफ्याच्या टक्केवारीत वाढ होण्याऐवजी कमतरता निर्माण होते. अशा वेळी ती कंपनी दुसर्या उत्पादकाकडून माल तयार करून घेऊन तो आपल्या नावावर खपवते व बाजारातील मागणी पुरी करते.
फक्त ₹२२२ मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिकाच्या डिजिटल आवृत्तीचे आजीवन वर्गणीदार व्हा आणि अगणित फायदे मिळवा!
अधिक माहितीसाठी : https://rzp.io/l/smartudyojak
ह्याकरिता तुम्हाला त्या कंपनीला लागणारा माल, त्याच्या निर्मितीची किंमत, त्याचा दर्जा वगैरेंची चांगली माहिती पाहिजे. हे काम वाटतं तितकं सोपं नाही. तेव्हा सुरुवातीला तुम्ही अपना बाजार, बेडेकर, कुबल यांना मसाले, लोणची, पापड इत्यादी पुरवा. तुम्ही त्यांना कमी किमतीत दर्जेदार मालाचा नियमित पुरवठा केलात तर ते जरूर घेतील.
– हरीश परळकर
Free Newsletter on WhatsApp & Telegram
'स्मार्ट उद्योजक'चे उद्योजकता आणि व्यवसायविषयक लेख वाचण्यासाठी जोडले जा : WhatsApp ग्रुपवर आणि टेलिग्राम चॅनेलवर.