प्रायोजित

छोट्या व्यापार्‍यांना ऑनलाइनच्या स्पर्धेत टिकण्यासाठी या दोन उद्योजकांनी तयार केले RetailBunny

स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मिळवा फक्त ₹४०० मध्ये. आजच वर्गणीदार व्हा! https://bit.ly/2YzFRct


व्यवसाय म्हणजे ग्राहक. ग्राहक नाही तर व्यवसाय नाही. मग क्षेत्र कोणतेही असो. व्यवसायात ग्राहक हा राजा असतो. त्यामुळे त्याला खुश ठेवण्यासाठी प्रत्येकजण अपार शक्कल लढवत असतो. ग्राहक खुश तर व्यावसायिक खुश. आज रिटेल क्षेत्रात खूप मोठ्या प्रमाणात ई-कॉमर्सचा बोलबाला आहे.

मोठमोठ्या कंपन्या ई-कॉमर्सच्या माध्यमातून ग्राहकांना घरबसल्या एका क्लिकसरशी आपली उत्पादने विकतात आणि मोठा नफा कमावतात. परंतु स्थानिक पातळीवरील छोटे व्यापारी, रिटेलर यांच्यासमोर आपला व्यवसाय वाढवताना खूप समस्यांना सामोरे जावे लागतंय. ग्राहक तुटतो, व्यवसाय लहान असल्याने मोठी गुंतवणूक करणे शक्य नसते, मार्जिनच्या बाबतीत तडजोड करावी लागते, ईच्छा असूनही काही करता येत नाही कारण या विषयीची भीती… असे अनेक प्रश्न.

फक्त ₹२२२ मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिकाच्या डिजिटल आवृत्तीचे आजीवन वर्गणीदार व्हा आणि अगणित फायदे मिळवा!

अधिक माहितीसाठी : https://rzp.io/l/smartudyojak

बाजारात ई-कॉमर्स वेबसाइट बनवण्यासाठी, ऍप तयार करण्यासाठी लाखो रुपये मोजावे लागतात. या सेवा एकाच छताखाली मिळतील याचीही खात्री नसते. सौरभ भोसले आणि भरत देशमुख या दोन उद्योजकांनी छोट्या व्यापार्‍यांच्या या प्रश्नांचा अभ्यास करून त्यांच्या प्रश्नांवर उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला आहे. या दोघांनी छोट्या व्यापार्‍यांसाठी RetailBunny या नावाने एक विशेष सेवा सुरू केली आहे. या माध्यमातून या दोघांनी छोट्या व्यापार्‍यांच्या प्रश्नांवर सोल्युशन दिले आहे. या प्रजासत्ताक दिनीच त्यांनी ही सेवा लोकांसमोर आणली आहे.

ज्याप्रकारे मोठमोठ्या ई-कॉमर्स कंपन्या वस्तू खरेदी करण्यापासून ते payment पर्यंतची सोय ऑनलाइन करून देतात, त्याप्रमाणे छोटे व्यापारी या RetailBunny च्या माध्यमातून सेवा आपल्या ग्राहकांना देऊ शकतात. शिवाय स्थानिक पातळीवर ते या सेवा उपलब्ध करून देत असल्यामुळे ग्राहक दूरदूरच्या कंपन्यांकडून त्यांच्याकडूनच खरेदी करण्याची शक्यता वाढते. अशाप्रकारे छोटे व्यापारी हे स्थानिक पातळीवर मोठ्या ई-कॉमर्स कंपन्यांशी स्पर्धा करू शकतात.

सौरभ आणि भरत यांनी याच्यासाठी येणाऱ्या खर्चाचा विचार करतानाही छोट्या व्यापाऱ्यांचा विचार करूनच याची किंमत ठरवली आहे. याचा खर्च वार्षिक ₹१४,९९९ असेल. यामध्ये २४×७ छोटे व्यापारी आपलं ऑनलाइन दुकान चालवू शकतात. त्यांचा ग्राहक त्यांना कधीही ऑर्डर करून पैसे भरू शकतो. पुढे त्यांना फक्त माल पोहोचवायचा आहे.

RetailBunny हे स्थानिक पातळीवर व्यवसाय करणाऱ्या छोट्या व्यापाऱ्यांसाठी असलेले one point solution आहे. RetailBunny नक्की काय करते आपण हे समजून घेऊ :

  • RetailBunny एकाच छताखाली तुमच्या सगळ्या गरजा पूर्ण करते. तुमच्या व्यवसायासाठी डिजिटल प्लॅटफॉर्म तयार करतेच, सोबत तुमच्या दुकानाच्या अंतर्गत गोष्टी manage करण्याची सोयसुद्धा उपलब्ध करून देते. आपण एक उदाहरण घेऊन समजून घेऊ. आपले एक सुपरमार्केट आहे. RetailBunny काय करते तर तुम्हाला हवी त्या प्रकारची तुमची स्वतःची ई-कॉमर्स वेबसाइट design आणि develop करून देते. त्याचसोबत तुमचे स्वतःचे ई-कॉमर्स app सुद्धा तयार करून देते.
  • सोशल मीडिया, तसेच डिजिटल मीडिया वापरण्यासाठी लागणार संपूर्ण back-end सपोर्टसुद्धा यात दिला जातो. याशिवाय यासाठी आवश्यक प्रशिक्षणसुद्धा दिले जाते.
  • सौरभ आणि भरत यांनी RetailBunny ही एक अशी सिस्टिम तयार केलीय की तो व्यापारी त्याचा सप्लायर manage करू शकतो, कस्टमर re-marketing साठी त्यांचा डेटा, रिपोर्ट एकाच जागी स्टोर करू शकतो. बिल, स्टॉक, खरेदी, विक्री यांच्या नोंदी, माल संपण्यापूर्वी अलर्ट, ग्राहकांचा संपर्क क्रमांक, त्यांचे वाढदिवस वगैरे माहिती अशा अनेक गोष्टी एकाच जागी स्टोर केल्या जातात.
  • ग्राहक अनेक वेळा त्यांच्या सामानाची यादी देतो म्हणजे त्याला घरपोच माल हवा असतो. अशा नोंदणीसाठीसुद्धा सोय दिली जाते. जेणे करून ग्राहक स्वतःच्या सोयीनुसार आपली यादी कुठूनही दुकानदाराकडे क्षणार्धात पाठवू शकेल. यात दोघांचाही वेळ वाचेल आणि कामही सोपे होईल. अशा अनेक गोष्टी RetailBunny मध्ये सर्वांना परवडेल अशा किमतीत उपलब्ध केल्या आहेत.

एका सुपरमार्केटचे उदाहरण आपण पाहिले, त्याचप्रमाणे सर्व प्रकारचे व्यापारी याचा होते. या सारख्या अनेक रिटेलरना RetailBunny चा फायदा घेऊ शकतात. Ready-made कपडे, रेस्टॉरंट, किराणा स्टोअर्स, फळविक्रेते, भाजी विक्रेते, बेकरी, स्वीट मार्ट, केक शॉप, गिफ्ट शॉप, ज्वेलरी शॉप, बुटीक, मेडिकल स्टोर, कॅफे, इलेक्ट्रॉनिक्स स्टोअर, चप्पल दुकान अशा एक ना अनेक रिटेलरना याचा फायदा घेता येऊ शकतो. ही यादी फक्त वानगीदाखल आहे. प्रत्येक क्षेत्रातील व्यापाऱ्याला RetailBunny चा लाभ होऊ शकतो.

सौरभ भोसले आणि भरत देशमुख हे Technocial Pvt. Ltd. या नावाने कंपनी चालवतात आणि त्याद्वारे ते ग्राहकांना ई-कॉमर्स वेबसाइट, ई-कॉमर्स app, डेस्कटॉप सॉफ्टवेअरसुद्धा मागणीनुसार तयार करून दिले जाते.

पाच वर्षांहून अधिक व्यवसायाचा अनुभव असलेल्या सौरभ आणि भरत यांचा छोट्या व्यापाऱ्यांसाठीचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. पुणे येथे RetailBunny चे कार्यालय असून मागील एक वर्ष या प्रकल्पावर एक टीम सतत काम करते आहे. २६ जानेवारी रोजी म्हणजेच प्रजासत्ताक दिनापासून याचे प्रत्यक्ष ग्राहकांसाठी काम सुरू झाले आहे आणि अल्पावधीतच तीसहून अधिक व्यापाऱ्यांनी याचा लाभ घेतला आहे. प्रत्येक व्यापारी याचा लाभ घेऊ शकतो.

RetailBunny सोबत स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचीही संधी

पुण्यात सुरू झालेल्या RetailBunny ला संपूर्ण महाराष्ट्रात विस्तार करण्यासाठी उत्साही आणि मेहनती चॅनेल पार्टनर्सची गरज आहे. यासाठी आवश्यक असलेले प्रशिक्षण व सहकार्य RetailBunny कडून देण्यात येईल. महाराष्ट्रभरतील तरुण यासाठीसुद्धा RetailBunny ला संपर्क करू शकतात.

संपर्क : 9588601167
Technocial Pvt. Ltd.
Website: www.retailbunny.in


Free Newsletter on WhatsApp & Telegram

'स्मार्ट उद्योजक'चे उद्योजकता आणि व्यवसायविषयक लेख वाचण्यासाठी जोडले जा : WhatsApp ग्रुपवर आणि टेलिग्राम चॅनेलवर.

error: Content is protected !!