मुंबईतील एल. एस. रहेजा महाविद्यालयाच्या बी.एम.एम.मधील विद्यार्थ्यांनी यंदाचा आपला वार्षिकोत्सव ऑनलाइन यशस्वीरीत्या पार पाडून नवा आदर्श प्रस्थापित केला आहे. कोरोनाच्या या भीषण काळात आपल्याला गेले वर्षभर अनेक गोष्टी रद्द कराव्या लागल्यात किंवा व्हर्च्युअल साजऱ्या कराव्या लागल्या आहेत. मात्र चॅटिंग आणि गेमिंगपुरते मर्यादित असलेल्या तरुणांचा महाविद्यालयीन वार्षिकोत्सव ऑनलाइन कशाप्रकारे पार पाडला जाऊ शकतो, याचे उदाहरण या विद्यार्थ्यांनी घालून दिले आहे.
यंदा ‘रीटेक’ हा मुंबईतील प्रसिद्ध कॉलेज इव्हेंट पूर्णपणे व्हर्च्युअल साजरा करण्यात आला. मुख्य म्हणजे देशभरातील विद्यार्थी यात सहभागी होऊ शकले. यात ब्रॅण्ड प्रोमोशनवर ‘Rebuttal Panel’ आणि ‘Targeted Buzz’ हे दोन परिसंवाद झाले. ‘And Action’ या लघुचित्रपटाचे सादरीकरण करण्यात आले. ‘Raise Your Mic’मध्ये विद्यार्थ्यांना आपल्या कलागुण प्रदर्शित करता आले. अनेक छोटे छोटे कार्यक्रम आणि उपक्रमांनी भरलेल्या या तीन दिवसांच्या सोहळ्याने तरुणांना भारावून टाकले. व्हर्चुअल इव्हेंट असूनसुद्धा कुठेही आनंदाची कमतरता भासली नाही.
तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमचीही 'उद्योजक प्रोफाइल' तयार करायची असेल तर 9833312769 वर "उद्योजक प्रोफाइल" असा मेसेज whatsapp करा.