इंजिनिअरची नोकरी सोडून उद्योजक झालेला ऋषिकेश, कोरोनानंतर आता करतोय बायोकोल ब्रिकेट्सचे उत्पादन

मी एक इंजिनीअर असून मला दहा वर्षांचा औद्योगिक क्षेत्रातला अनुभव आहे. गावी वडिलांचा लग्न समारंभासाठी लागणाऱ्या हॉल व इतर सेवा उपलब्ध करून देण्याचा व्यवसाय सुरू होता. सुरुवातीपासून मला नोकरीसोबत व्यवसायात रुची होती. मी मुंबईतील मार्केटमधून लागणाऱ्या वस्तू, चांगल्या दर्जाचे सामान व वस्तूंचा पुरवठा करून वडिलांना मदत करत असे.

अशाप्रकारे आम्ही ग्राहक जोडत आलो. काही वर्षांपूर्वी मी मुंबईतील नोकरी सोडून गावी पुसदला (जिल्हा यवतमाळ) व्यवसाय वाढवण्यासाठी स्थायिक झालो. कोरोना काळात Hospitality Industry बंद झाली व त्याचा फटका सगळ्यांसोबत आमच्याही व्यवसायाला बसला. दिवाळीनंतर आता व्यवसाय परत सुरू झाला आहे व ग्राहकांच्या साथीने पुढे मार्गक्रमण करत राहूच.

शहर सोडून गावी परतल्यावर येथील ग्राहकांच्या गरजा, Service Quality टिकवून ठेवणे, कर्मचाऱ्यांना प्रोफेशनल वागण्याबद्दल सतत प्रयत्न करणे, आर्थिक व्यवस्थापन असे बरेच धडे शिकलो. कौटुंबिक व्यवसाय असल्याने अर्थातच कुटुंबाची मदत प्रत्येकवेळी होतेच.

ग्राहकांसोबत Long Term नाते निर्माण करणे, आपली सेवा व गुणवत्ता टिकवून नवीन ग्राहक जोडणे ही सेवा व्यवसायाची निरंतर प्रक्रिया आहे. ‘स्मार्ट उद्योजक’च्या माध्यमातून यासाठी वेळोवेळी मार्गदर्शन मिळते.


'स्मार्ट उद्योजक' (डिजिटल आवृत्ती) वार्षिक वर्गणी : ₹१४३ ➡️ SUBSCRIBE
'स्मार्ट उद्योजक' (डिजिटल आवृत्ती) आजीवन वर्गणी : ₹१,०२५ ➡️ SUBSCRIBE

दरम्यानच्या काळात बायोकोल ब्रिकेट्स (Biomass Briquettes) व्यवसायात काम करण्याची संधी मिळाली व नवीन व्यवसायाची सुरुवात केली. Sustainable Biobrikets Pvt. Ltd. या नावे कंपनी स्थापन करून हा व्यवसाय करतो आहे. मी पुसद येथून Briquettes चा पुरवठा करतो. आमची पुणे येथे समविचारी उद्योजकांची टीम आहे व पुण्यातून Industrial Clients सोबत ग्राहक हाताळणी केली जाते.

बायोकोल ब्रिकेट्स

बायोमास ऊर्जा क्षेत्रात खूप चांगल्या संधी उपलब्ध आहेत. बायोमास म्हणजे शेतातील पीक (सोयाबीनचा कुटार, कापसाची पराटी, गहू, तुरीची तुरटी) काढल्यानंतरचे अवशेष. या शेतातील अवशेषांना मशीनद्वारे वाळवून, त्यातील माती वेगळी करून शुद्ध अवशेष बाजूला केले जाते.

मुख्य मशीनद्वारे त्याची प्रक्रिया करून ब्रिकेट्स (ठोकळे) बनवले जातात. ह्या ब्रिकेट्स औद्योगिक बाष्पकांमध्ये (Industrial Boilers) जाळतात व पुढील प्रक्रियेसाठी बाष्प निर्माण केले जाते. आम्ही बनवत असलेल्या ब्रिकेट्सचा फोटो सोबत जोडला आहे.

हा व्यवसाय सुरू करण्यासाठी आपण ज्या भागात राहता किंवा उद्योग सुरू करू इच्छितात त्या भागात कोणते पीक घेतले जाते याचा शोध घ्यावा. ब्रिकेट्सची गुणवत्ता ही त्यांच्या ज्वलनशीलतेवर ठरवली जाते. त्यानुसार कोणत्या पिकांचे अवशेष प्रक्रिया करायचे हे ठरवावे.

गुणवत्ता वाढवण्यासाठी लाकडाचा भुसा (Sawdust) काही प्रमाणात टाकल्या जातो. गरजेप्रमाणे मशीनची पूर्तता करावी लागेल. या व्यतिरिक्त अजून काही माहिती हवी असल्यास आपण सोशल मीडियाद्वारे मेसेज करू शकता किंवा ईमेलद्वारे माहिती मिळवू शकता.

ऋषिकेश देशपांडे

जन्म दिनांक : १४ एप्रिल, १९८६
जन्म ठिकाण : पुसद
ई-मेल : marketing@sbpl-india.com
वेबसाईट : www.sbpl-india.com

विद्यमान जिल्हा : यवतमाळ
शिक्षण : बी. इ. इलेक्ट्रॉनिक्स व टेलीकम्युनिकेशन
फेसबुक अकाऊंटची लिंक : www.facebook.com/rishikesh.desh
कंपनीचे नाव : Sustainable Biobrikets Pvt. Ltd.
उत्पादने/सेवा : बायोकोलचा पुरवठा करणे, नवीन बायोकोल युनिट उभारणी करण्यासाठी मदत करणे.

Author

तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमचीही 'उद्योजक प्रोफाइल' तयार करायची असेल तर 9833312769 वर "उद्योजक प्रोफाइल" असा मेसेज whatsapp करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

'स्मार्ट उद्योजक' मासिकाच्या डिजिटल आवृत्तीचे वार्षिक वर्गणीदार होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?