व्हर्च्युअल रिॲलिटी म्हणजेच VR ही एक नव्या युगाची सुरुवात आहे. जगभरात या क्षेत्रामध्ये मोठी प्रगती होत आहे, संशोधन होत आहे. अमेरिका, चीन, युरोप व जगातील सर्वच प्रगत देशात ही इंडस्ट्री भरभराटीला आली आहे. व्हर्च्युअल रिॲलिटी ही अब्जावधींची बाजारपेठ बनली आहे.
तुम्ही प्रत्यक्ष जगात जे जगता आणि पाहता तेच आभासी जगात जगणे आणि पाहणे म्हणजे व्हर्च्युअल रिॲलिटी. इथे प्रत्यक्षात खरं काहीच नसतं, पण आभास असा असतो की तुम्ही जो अनुभव घेता तो प्रत्यक्ष जगण्यासारखाच असतो. उदाहरणार्थ समजा तुम्ही व्हीआर वर एखादा क्रिकेट सामना खेळताय, तर प्रत्यक्ष स्टेडियममध्ये उतरून तो सामना खेळत असल्याचा तुम्हाला अनुभव मिळू शकतो.
भारतात १९९० च्या दशकात ब्रिक गेम, टिव्ही गेमची ओळख झाली. तिथपासून आज इथेसुद्धा व्हर्च्युअल रिॲलिटी या इंडस्ट्रीने जम बसवला आहे. फक्त तरुणांमध्येच नाही तर सर्व वयातील लोकांमध्ये याचे आकर्षण वाढत आहे.
‘पवार लाईफस्टाईल’ ब्रँड्सचे संस्थापक हर्षल पवार ह्यांनी हीच संधी लक्षात घेऊन आपल्या शिवरायांच्या इतिहासाला व्हर्च्युअल रिॲलिटीमध्ये उतरवण्याचं धाडस दाखवत ‘रॉयल मराठा’ व्हीआर गेम बनवला आहे.
आजपर्यंत आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे कसे लढले हे चित्रपट आणि मालिकेत पाहिले आहे, पुस्तकात वाचलं आहे. आता तो अनुभव तुम्ही स्वतः मावळा होऊन घेऊ शकता. हर्षल पवार यांनी व्हर्च्युअल रिॲलिटी तंत्रज्ञानाच्या आधारे आपल्याला शिवकालीन युगाचा एक ऐतिहासिक अनुभव देण्याचा प्रयत्न केला आहे.
हा व्हर्च्युअल गेम तुम्ही मावळा होऊन खेळायचा आहे. मावळ्यांच्या “हर हर महादेव” गर्जनेनंतर तुमच्या लढाईला सुरुवात होइल. गड जिंकण्यासाठी तुम्हाला गडाच्या पायथ्यापासून लढत लढत ३ स्तर पार करत गडाच्या शेवटच्या टोकापर्यंत पोहोचायचे आहे.
शत्रू तुमच्यावर हल्ला करेल, अचानकपणे तुमच्याकडे वेगाने आगेचा गोळा आणि दगड येतील. तुमच्या हातामध्ये असलेले “controllers” हे ढाल आणि तलवार असतील. तुम्हाला स्वतःचे युद्धकौशल्य वापरून आणि २५ लाईफलाईनचा वापर करून शत्रूचा वार रोखायचा आहे आणि आगेचा गोळा, दगड अडवायचा आहे.
लढाईच्या शेवटच्या टप्प्यात शत्रूंचा सरदार तुमच्यावर हल्ला करेल. तुम्हाला सरदाराला हरवून गडाच्या शेवटच्या टोकावर झेंडा फडकवायचा आहे. गडावरून “जय भवानी, जय शिवाजी”च्या गर्जनेनंतर तुमची मोहीम फत्ते होईल.
लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येक व्यक्तीला या गेमचा अनुभव एकदा तरी घेता यावा म्हणून हर्षल पवार यांना हा गेम महाराष्ट्रातील प्रत्येक गावामध्ये, शहरामध्ये पोहोचवायचा आहे. त्यासाठी त्यांनी याचे फ्रँचायजी मॉडेल विकसित केले आहे. आपल्या गावात, शहरात ‘रॉयल मराठा व्हीआर गेम’ची फ्रँचायजी घेऊन तुम्हीही स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकता.
फ्रँचायजी घेण्यासाठी तुमच्याकडे किमान ४० चौरस फुट जागा आणि ६५,००० ते ७०,००० रुपये गुंतवणूक आवश्यक आहे. या गुंतवणुकीमध्ये तुम्ही दरमहा २४,००० ते ७२,००० रुपये कमवू शकता. अधिक माहितीसाठी आपले नाव, मोबाइल नंबर, ठिकाण आम्हाला व्हॉट्सॲप करा.
व्हॉट्सॲप : 9225321008
तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमचीही 'उद्योजक प्रोफाइल' तयार करायची असेल तर 9833312769 वर "उद्योजक प्रोफाइल" असा मेसेज whatsapp करा.