रबरी शिक्के म्हणजेच रबर स्टॅम्प ही प्रत्येक व्यवसायात लागणारी आवश्यक बाब आहे. छोट्यामोठ्या दुकानांपासून ते कार्यालयां त्याचा वापर होतो. सरकारी कार्यालये, खासगी उद्योगसमूह, बँका, डाकघरे यांसारख्या अनेक ठिकाणी रबरी शिक्क्यांचा वापर केला जातो.
व्यवसाय-उद्योग वाढत जात आहेत, त्या प्रमाणात दिवसेंदिवस या रबरी शिक्क्यांना मागणीसुद्धा वाढत आहे. कागदपत्रे/दस्तऐवज कोणाचे आहे हे लगेच ओळखू यावे यासाठी रबर स्टॅम्प्सचा मुख्य:त्वे उपयोग होतो.
ग्रामीण भागात सरकारी खाती, लघुउद्योग, वकील, डॉक्टर्स, व्यक्तिगत उपयोग करणारे या सर्वांकडून रबरी शिक्क्यांना मागणी भरपूर प्रमाणात आहे. रबरी शिक्के बनविण्यासाठी छापखान्यात वापरतात त्या अक्षरांच्या खिळ्यांचा वापर करून प्लॅस्टर ऑफ पॅरिसमध्ये साचे बनवले जातात.
या साच्यावर रबराचे शीट ठेवून ते हॅण्ड प्लाय प्रेसखाली, खालच्या बाजूने उष्णता देऊन दाबले जाते. रबर वितळते आणि त्याला साच्याचा आकार येतो. हे रबर साच्यातून काढून, योग्य तर्हेने कापून लाकडाच्या ठोकळ्यावर पक्के बसवले जाते.
'स्मार्ट उद्योजक' (डिजिटल आवृत्ती) वार्षिक वर्गणी : ₹१४३ ➡️ SUBSCRIBE
'स्मार्ट उद्योजक' (डिजिटल आवृत्ती) आजीवन वर्गणी : ₹१,०२५ ➡️ SUBSCRIBE
शिक्का मारताना बरोबर बाजू कळावी म्हणून ठोकळ्यावर पितळेची रिंग बसवली जाते. साधारण एकटा माणूसही हे काम करू शकतो. या व्यवसायात एकूण खर्चाच्या साधारण दुप्पट नफा मिळतो.
तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमचीही 'उद्योजक प्रोफाइल' तयार करायची असेल तर 9833312769 वर "उद्योजक प्रोफाइल" असा मेसेज whatsapp करा.