फिंगर प्रिंट अ‍ॅनालिस्ट साधना; एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व

आपलं जगणं समृद्ध करते शिक्षण. पंचवीस वर्षांपूर्वी स्वत:च्या शिक्षणाचा समाजासाठी उपयोग व्हावा, या विचारातून प्रवाहाच्या विरोधात जाऊन स्वतःच्या आत्मनिर्भरतेसाठी साधना जाधव यांनी ‘सेंट जॉर्ज एज्युकेशन ट्रस्ट’ नावाने संस्था स्थापन केली आणि सुरू झाला प्रवास एका उद्योजिकेचा.

अनेक स्थित्यंतरे पार करत; अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत ज्याला वयाचे बंधन नाही असे समाजोपयोगी नावीन्यपूर्ण अभ्यासक्रम साधनाताई राबवतात.

मुंबईत जन्मलेल्या साधनाताई एम.बी.ए. आहेत. शिक्षण पूर्ण झाल्यावर नोकरी सुरू केली; पण आपल्याला नवनवे काही शिकताना खूप बंधन येतात, हे त्यांना पदोपदी जाणवत होते. दुसर्‍यावर अवलंबून जगणे त्यांना कधीच मान्य नव्हते. अशा वेळी घरची व्यावसायिक पार्श्वभूमी नसताना पंचवीस वर्षांपूर्वी स्वत:च्या हिमतीवर नोकरी सोडून उद्योगात उतरायचे त्यांनी मनाशी पक्के केले.


'स्मार्ट उद्योजक' (डिजिटल आवृत्ती) वार्षिक वर्गणी : ₹१४३ ➡️ SUBSCRIBE
'स्मार्ट उद्योजक' (डिजिटल आवृत्ती) आजीवन वर्गणी : ₹१,०२५ ➡️ SUBSCRIBE

व्यवसायाच्या सुरुवातीला अनेक प्रकारच्या समस्या आल्या; पण शून्यातून सुरुवात करणार्‍याला अशा समस्या अजून ठाम बनवतात, नवनवीन गोष्टी शिकून, व्यवसायाच्या प्रत्येक जबाबदार्‍या एकहाती पेलून आपल्या व्यवसायाला नवे आयाम देण्याचं काम आज साधना जाधव करत आहेत.

आपली शिकण्याची आवड जोपासता यावी म्हणून त्यांनी नोकरी सोडली आणि उद्योगाचा श्रीगणेशा केला. पुढे विविध नॅशनल, इंटरनॅशनल सर्टिफाइड कोर्स केले. त्या रेकी, हिप्नॉथेरपिस्ट आणि एनएलपी ट्रेनर आहेत. याशिवाय इतरही अनेक कोर्स त्यांनी केले आहेत, परंतु फिंगर प्रिंट अ‍ॅनलिस्टसुद्धा ही त्यांची प्रमुख ओळख आहे.

पारंपरिक शिक्षण घेताना मुलांच्या अंगभूत गुणांना वेळीच ओळखणं सगळ्याच पालकांना जमत नसते. अशावेळी वैज्ञानिक आधार असणार्‍या साधनांचा वापर करून पाल्यांच्या अशा गुणांची ओळख संस्थेतून करून दिली जाते. साधनाताई स्वत: समुपदेशन करतात. यातून मुलांच्या जडणघडणीसाठी मदत होते. फिंगर प्रिंट अ‍ॅनालिसीसच्या माध्यमातून म्हणजे बोटांच्या ठशांच्या शास्त्रीयदृष्ट्या अभ्यासाने विद्यार्थ्यांच्या भविष्याचा वेध घेतला जातो.

याशिवाय छंद वर्ग, वैयक्तिक मार्गदर्शन, ब्रेन स्टॉर्मिंग अशा वेगवेगळ्या प्रकारे संस्था काम करते. सुरुवातीच्या काळात कळव्याला म्हणाव्या तशा सुविधा नव्हत्या, विशेषत: शैक्षणिक क्षेत्रात. अशावेळी छोट्या छोट्या गोष्टींसाठी, ठाणे, मुंबई आदी ठिकाणी अवलंबून राहावे लागे. हे अवलंबित्व कमी करून आपल्या विद्यार्थ्यांना इथेच सोयीसुविधा कशा देता येतील यासाठी त्या कार्यरत राहिल्या.

यातूनच अनेक प्रकारचे लहानमोठे अभ्यासक्रम, कार्यशाळा, समुपदेशन, चर्चा घडू लागल्या, त्याही अत्यल्प शुल्कात. आजपर्यंत ५ हजारहून अधिक लोकांनी याचा फायदा घेतला आहे. आज पुणे, आसाम, गुहाटी, ओडिशा आदी ठिकाणी काम चालू आहे. भविष्यात संपूर्ण देशभर हे जाळे पसरवायचे आहे.

‘ग्रेस एज्युकेशन’द्वारे पहिली ते दहावीच्या मुलांचे सरकारमान्य विविध क्लासेस घेतले जातात. विविध भाषा विषयाचे अभ्यासक्रम, महिलांसाठी नर्सरी अभ्यासक्रम, विविध स्पर्धा परीक्षांसाठी अभ्यासक्रम राबवले जातात. ‘अमेझिंग क्रिएशन’द्वारे विविध छंद वर्ग चालवले जातात.

यातून ज्यांना या नवनवीन गोष्टी शिकण्याची आवड असते ते शिकवून त्यातून त्यांना अर्थार्जन कसे करता येईल हे शिकवले जाते आणि त्यासाठी शक्यतो सर्व मदत केली जाते. शिवाय गिफ्टिंग, विशेषत: कॉर्पोरेट गिफ्टिंगसुद्धा आम्ही उपलब्ध करून देतो, असे त्या म्हणतात.

ब्रेन स्टॉर्मिंगद्वारे करिअरविषयक समुपदेशन केले जाते. एकूणच यातून लहानमोठे उद्योजक घडवण्याचे काम त्या करतायत. प्रत्येक व्यावसायिकाला किंवा व्यवसाय करू इच्छिणार्‍या व्यक्तीला याचा फायदा आहे. यातून आपण आपली बलस्थाने शोधू शकतो तसेच प्रतिस्पर्धी किंवा व्यवसायातील भागीदारांच्या गुणांची पारख करू शकतो.

लॉकडाऊनच्या काळात एक गोष्ट अधोरेखित झाली की, शिक्षण अत्यावश्यक सेवेत मोडत नाही. संपूर्ण व्यवस्था कोलमडली. याचा परिणाम शिक्षण क्षेत्रावर झाला; पण मी मात्र या काळाला उद्योगाच्या संधी म्हणून बघते. या काळात खूप नवीन शिकताही आले. पारंपरिक पद्धतीने काम करताना डिजिटल प्लॅटफॉर्म स्वत:च्या उद्योगासाठी तयार करण्याची संधी या वेळी घेता आली. लवकरच स्वतःचे अ‍ॅप आम्ही घेऊन येतोय, असे साधनाताई सांगतात.

साधनाताईंना जशी नवनवीन गोष्टी शिकण्याची आवड आहे तसेच वाचनाचीही प्रचंड आवड आहे. विविध विषयांतील तीनशेहून अधिक पुस्तकं त्यांच्या संग्रही आहेत. विद्यार्थ्यांना त्या मोफत ही सगळी पुस्तकं उपलब्ध करून देतात. भविष्यात स्वत:चे वाचनालय त्यांना सुरू करायचंय. चित्रकला, बागकाम, फोटोग्राफी असे छंद त्या जोपासतात. सामाजिक कार्याची आवड असल्याने अनेक संस्थांशी त्या जोडल्या गेल्या आहेत.

हा सारा प्रवास करताना कुटुंबीय, मित्रपरिवार आणि व्यावसायिक स्नेही यांची मोलाची साथ लाभली याचा त्या आवर्जून उल्लेख करतात. त्यांच्या या कामासाठी अनेक ठिकाणी त्यांना गौरवण्यात आलंय. विविध शैक्षणिक, सामाजिक, कला क्रीडा क्षेत्रात गौरवण्यात आले आहे. ठाणे महानगरपालिका, नवी मुंबई महानगरपालिका, ठाणे आयुक्तांनी केलेला सन्मान ही साधनाताईंच्या कामाची पोचपावतीच म्हणावी लागेल.

स्वत:सारख्या १ हजार महिलांना त्यांच्या हक्काचे प्लॅटफॉर्म तयार करून द्यायचे स्वप्न साधनाताईंचे आहे. त्यासाठी काम चालू आहे. याशिवाय नव्याने व्यवसायात येऊ इच्छिणार्‍या प्रत्येकाला शक्य ती मदत करायला त्या तयार आहेत. आपल्याला जो संघर्ष करावा लागला तो नवख्या व्यक्तीला करावा लागू नये, असे त्यांना वाटते.

संपर्क : साधना जाधव – ९८२११९२५८०

Author

  • यांनी पदव्युत्तर पत्रकारितेत पदविका केली आहे. प्रिंट माध्यमांत काही काळ काम केल्यानंतर त्यांनी स्मार्ट उद्योजक हे मासिक सुरू केले.

    View all posts

तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमचीही 'उद्योजक प्रोफाइल' तयार करायची असेल तर 9833312769 वर "उद्योजक प्रोफाइल" असा मेसेज whatsapp करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

'स्मार्ट उद्योजक' मासिकाच्या डिजिटल आवृत्तीचे वार्षिक वर्गणीदार होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?