Advertisement
स्मार्ट उद्योजक सूची

सकारात्मक विचारातून साईनाथ यांनी केला उद्योगारंभ

'स्मार्ट उद्योजक' मासिकाच्या २० प्रिंट अंकाचा सेट (३ दिवाळी अंक समाविष्ट) फक्त ₹४०० मध्ये उपलब्ध. स्टॉक मर्यादित. बुक करण्यासाठी - https://rzp.io/l/2BfpgK4v

माझ पूर्ण नाव साईनाथ रावण वाडेकर. बालपण आणि पूर्ण शिक्षण हे मुंबईत मराठी शाळेमधेच झाल आहे आणि त्या नंतर IT फील्ड निवडली. आई अशिक्षित आणि वडील सातवी पास होते त्यामुळे मिळेल ते काम मजुरी करून किंवा कोणाच्या हाताखाली काम करत आणि घर प्रपंच चालवत असे. आम्ही चार भाऊ आणि एक बहीण असा आमचा परीवार आहे.


फक्त ₹१२३ मध्ये 'स्मार्ट उद्योजक' मासिकाचे आजीवन वर्गणीदार व्हा!

या वर्गणीत या आधीची ६५+ मासिके आणि पुढे दर महिन्याला व्हाट्सएप वर ताजे मासिक मिळवा. आजच नोंदणी करा : https://rzp.io/l/smartudyojak

कमी शिक्षण असल्यामुळे आई वडिलांना नेहमी खंत वाटत असे पण त्यांनी मनाशी एक जिद्द केली आम्हा सगळ्यांना खूप शिकवायचं ठरवलं. त्यासाठी ते वाटेल ते करायला तयार होते मुंबईत भाड्याच्या 10×10 च्या खोलीत आमचं कुटुंब राहत असे. आम्ही शिकून मोठया ऑफिसमध्ये साहेब म्हणून नोकरी करावी हे त्याच स्वप्न होत त्यासाठी आई वडिलांनी लोकांन कडून व्याजाने पैसे काढले ते ही कमी पडत असताना मंगळसूत्र सोडून जे काही होत ते सर्व विकून टाकलं आणि आम्हाला लहानाच मोठं केलं. आमच्या 4 भावांच्या माध्यमातून आज त्यांचे स्वप्न पूर्ण झाल आहे कारण आम्ही सगळे वेगवेगळ्या फिल्डमध्ये पदवीसंपादन करून चांगली नोकरी करत आहोत.

गेली 7 ते 8 वर्ष मी नामांकित आय टी कंपनीमध्ये सॉफ्टवेअर इंजिनीअर म्हणून नोकरी करत आहे. त्यामुळे Digital Market आणि Technology बद्दल चांगली माहिती आहे. तसेच सॉफ्टवेअर डेव्हलोप करण्याबद्दलचाही चांगला अनुभव आहे. माझं आय टी कंपनीतील Practical अनुभवाचा उपयोग करून स्वतःचं काही तरी चालू करून आपली Skill लोकांपर्यंत पोहचवून त्यांना यातून कसा फायदा होईल आणि लोकांना कमीत कमी फी मध्ये चांगल्या आणि त्यांना हव्या असणाऱ्या सेवा मग त्या व्यवसायवाढीच्या असो किंवा नोकरी मिळवण्यासाठी शिक्षणाबरोबर नोकरी मिळवण्यासाठी अजून काय कराव लागत याबद्दल सेवा देण्याच Program आमच्या तर्फे Design करण्यात आला आहे.

स्वतःचा व्यवसाय करायचं ठरवल पण त्यासाठी लागणारा पैसा, घरच्याचा पाठिंबा, आपण काय करणार आहोत आणि लोकांपर्यंत कस पोहचू शकतो ते लोकांना आवडेल का आणि व्यवसायच नाव, लोगो आणि कशा प्रकारे हा पूर्ण व्यवसाय करायचा याचा संपूर्ण आराखडा तयार करताना एक मनामध्ये कुठे तरी वाटायचं कि आपल्याकडे नोकरी करण्याचा अनुभव आहे व्यवसाय हा अगोदर कधी केला नाही आपल्याला हे जमेल का. कुटुंबाचा विचार आणि त्यात आर्थिक परिस्थिती तेवढ चांगली नाही त्यामुळे बाकीच जीवन सर्व विस्कळीत झाल तर, इतर लोक आणि समाज काय बोलतील याचाच जास्त डोक्यात विचार यायचा. शेवटी ठरवले काही झाल तरी आपण सुरुवातीला नोकरी करत व्यवसाय सुरु करायचा कारण व्यवसायाचा आराखडा तयार आहे आपल्याला कश्यात व्यवसाय करायचा आहे ते माहिती आहे जवळ Skill सोबत अनुभव आहे आणि तोच माझा positive पॉईंट होता.

व्यवसाय सुरु करायला आपला स्वतःचा स्वतः वर असलेला विश्वास आणि स्वतःची धडपड मग बाकीच्या इतर गोष्टी आणि जग काय म्हणेल याचा विचार सोडून देणे.

प्रॉडक्ट किंवा सेवेविषयी थोडक्यात माहिती :
आम्ही ऑनलाईन डिजिटल महाराष्ट्र तर्फे लोकांना विविध सेवा पुरवतो. Online Tranning च्या माध्यमातून, YouTube, Whats up आणि टेलिग्राम च्या माध्यमातून. नोकरीच्या संधीबद्दल आणि Personality Development बद्दल, Digital व्यवसाय वाढवण्याबद्दलची सेवा आम्ही पुरवतो.

साईनाथ रावण वाडेकर
कंपनीचे नाव : Online Digital Maharashtra
व्यवसायातील अनुभव : १ वर्ष
तुमची उत्पादने व सेवा : Services Provider
विद्यमान जिल्हा : मुंबई

व्यवसायाचा पत्ता : Jai Jagdamba Society, Hanuman Nagar, Akurli Road no. 2, Kandivali East, Mumbai 400101
ई-मेल : sainath.wadekar@gmail.com
मोबाइल : 9930446105


Free Newsletter on WhatsApp & Telegram

'स्मार्ट उद्योजक'चे उद्योजकता आणि व्यवसायविषयक लेख तसेच बातम्या मोफत मिळावा WhatsApp आणि टेलिग्रामवर. WhatsApp : https://bit.ly/2kAPLGD । टेलिग्राम : https://t.me/smartudyojakmedia

error: Content is protected !!