उद्योजक Profiles कथा उद्योजकांच्या

दहा बाय दहाच्या घरातून जन्माला आला हा उद्योजक, आज डिजिटल महाराष्ट्राला ऑनलाइन नेत आहे

स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मिळवा फक्त ₹४०० मध्ये. आजच वर्गणीदार व्हा! https://bit.ly/2YzFRct


माझ नाव साईनाथ रावण वाडेकर. बालपण आणि पूर्ण शिक्षण हे मुंबईत मराठी शाळेमधेच झाल आहे आणि त्यानंतर IT फील्ड निवडली. आई अशिक्षित आणि वडील सातवी पास होते त्यामुळे मिळेल ते काम मजुरी करून किंवा कोणाच्या हाताखाली काम करत आणि घरप्रपंच चालवत असे. आम्ही चार भाऊ आणि एक बहिण असा आमचा परीवार आहे.

कमी शिक्षण असल्यामुळे आईवडिलांना नेहमी खंत वाटत असे, पण त्यांनी मनाशी एक जिद्द केली आम्हा सगळ्यांना खूप शिकवायचं ठरवलं. त्यासाठी ते वाटेल ते करायला तयार होते. मुंबईत भाड्याच्या दहा बाय दहाच्या खोलीत आमचं कुटुंब राहत असे. आम्ही शिकून मोठया ऑफिसमध्ये साहेब म्हणून नोकरी करावी हे त्याच स्वप्न होत.

फक्त ₹२२२ मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिकाच्या डिजिटल आवृत्तीचे आजीवन वर्गणीदार व्हा आणि अगणित फायदे मिळवा!

अधिक माहितीसाठी : https://rzp.io/l/smartudyojak

त्यासाठी आईवडिलांनी लोकांकडून व्याजाने पैसे काढले तेही कमी पडत असताना मंगळसूत्र सोडून जे काही होत ते सर्व विकून टाकलं आणि आम्हाला लहानाचं मोठं केलं. आमच्या चार भावांच्या माध्यमातून आज त्यांचे स्वप्न पूर्ण झालं आहे. कारण आम्ही सगळे वेगवेगळ्या फिल्डमध्ये पदवीसंपादन करून चांगली नोकरी करत आहोत.

गेली सात-आठ वर्ष मी नामांकित आयटी कंपनीमध्ये सॉफ्टवेअर इंजिनीअर म्हणून नोकरी करत आहे. त्यामुळे डिजिटल मार्केटिंग आणि तंत्रज्ञानाबद्दल चांगली माहिती आहे. तसेच सॉफ्टवेअर डेव्हलप करण्याचाही चांगला अनुभव आहे.

माझ्या आयटी क्षेत्रातील अनुभवाचा उपयोग करून स्वतःचं काही तरी चालू करून आपलं कौशल्य लोकांपर्यंत पोहचवून त्यांना यातून कसा फायदा होईल आणि लोकांना कमीतकमी फीमध्ये चांगल्या आणि त्यांना हव्या असणाऱ्या सेवा मग त्या व्यवसायवाढीच्या असो किंवा नोकरी मिळवण्यासाठी शिक्षणाबरोबर नोकरी मिळवण्यासाठी अजून काय कराव लागतं, याबद्दल सेवा देण्यारा प्रोग्रॅम आम्ही तयार केला आहे.

स्वतःचा व्यवसाय करायचं ठरवलं, पण त्यासाठी लागणारा पैसा, घरच्याचा पाठिंबा, आपण काय करणार आहोत आणि लोकांपर्यंत कस पोहचू शकतो ते लोकांना आवडेल का आणि व्यवसायच नाव, लोगो आणि कशाप्रकारे हा पूर्ण व्यवसाय करायचा याचा संपूर्ण आराखडा तयार करताना मनामध्ये कुठे तरी वाटायचं की आपल्याकडे नोकरी करण्याचा अनुभव आहे, व्यवसाय हा आधी कधी केला नाही आपल्याला हे जमेल का.

कुटुंबाचा विचार आणि त्यात आर्थिक परिस्थिती तेवढ चांगली नाही त्यामुळे बाकीच जीवन सर्व विस्कळीत झालं तर, इतर लोक काय म्हणतील याचाच जास्त डोक्यात विचार यायचा. शेवटी ठरवले काही झाल तरी आपण सुरुवातीला नोकरी करत व्यवसाय सुरू करायचा, कारण व्यवसायाचा आराखडा तयार आहे आपल्याला कशात व्यवसाय करायचा आहे ते माहिती आहे. जवळ Skill सोबत अनुभव आहे आणि तोच माझा positive पॉईंट होता.

व्यवसाय सुरू करायला आपला स्वतःचा स्वतःवर असलेला विश्वास आणि स्वतःची धडपड, मग बाकीच्या इतर गोष्टी आणि जग काय म्हणेल याचा विचार सोडून देणे.

प्रॉडक्ट किंवा सेवेविषयी थोडक्यात माहिती :

आम्ही ‘ऑनलाईन डिजिटल महाराष्ट्र’तर्फे लोकांना विविध सेवा पुरवतो. Online Training च्या माध्यमातून, YouTube, Whatsup आणि टेलिग्रामच्या माध्यमातून. नोकरीच्या संधीबद्दल आणि Personality Development बद्दल, Digital व्यवसाय वाढवण्याबद्दलची सेवा आम्ही पुरवतो.

साईनाथ रावण वाडेकर

कंपनीचे नाव : Online Digital Maharashtra
व्यवसायातील अनुभव : १ वर्ष
तुमची उत्पादने व सेवा : Services Provider
विद्यमान जिल्हा : मुंबई

व्यवसायाचा पत्ता : Jai Jagdamba Society, Hanuman Nagar, Akurli Road no. 2, Kandivali East, Mumbai 400101
ई-मेल : sainath.wadekar@gmail.com
मोबाइल : 9930446105


Free Newsletter on WhatsApp & Telegram

'स्मार्ट उद्योजक'चे उद्योजकता आणि व्यवसायविषयक लेख वाचण्यासाठी जोडले जा : WhatsApp ग्रुपवर आणि टेलिग्राम चॅनेलवर.

error: Content is protected !!