Advertisement
उद्योगसंधी

दुसऱ्याचा माल विकून पैसा कमावणे

स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मिळवा फक्त ₹४०० मध्ये. आजच वर्गणीदार व्हा! https://bit.ly/2YzFRct


आजच्या परिस्थितीत स्वत: एखादे उत्पादन बनवणे किंवा एखादा सेवा व्यवसाय चालू करणे अनेक कारणांनी अडचणीचे असू शकते. लागणारे भांडवल, आपला अनुभव, तज्ज्ञ आणि इतर माणसांची गरज, आवश्यक कच्चा माल आणि नवीन व्यवसाय चांगला चालू होऊन उत्पन्न देण्याचा कालावधी, अशी अनेक कारणे असू शकतात.

शिवाय आपल्या उत्पादन व सेवा घेणाऱ्या ग्राहकांचा शोध घेऊन विक्री करणे आलेच. त्याहून लगेच उत्पन्नाचा पर्याय म्हणजे, ज्यांचे उत्पादन किंवा सेवा व्यवसाय सुरू आहेत, त्यांना कमीशन तत्त्वावर विक्री करण्यास मदत करणे. अशा तऱ्हेने विक्रीचे काम करण्यात तुमचा आणि त्यांचा, दोघांचाही फायदाच होतो.

फक्त ₹२२२ मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिकाच्या डिजिटल आवृत्तीचे आजीवन वर्गणीदार व्हा आणि अगणित फायदे मिळवा!

अधिक माहितीसाठी : https://rzp.io/l/smartudyojak

स्वतः उत्पादन करण्यातील अडचणी, आव्हाने, जबाबदाऱ्या टाळता येतात, ज्या पेलण्याची सध्या आपली क्षमता नाही. अशा पर्यायांचा विचार तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या उद्योजकांमध्ये शोधू शकता.

✅ अशा पर्यायांचा विचार खालील मुद्द्यांच्या आधारे करून आपण एक किंवा अधिक उद्योजकांच्या बरोबर काम करू शकता :

  • तुमची आवड, ज्ञान, माहिती, अनुभव
  • नवीन काही शिकण्यासाठी लागणारा वेळ
  • त्या वस्तू, सेवेसाठी तुमच्या आजूबाजूला असणारी अंदाजे मागणी
  • भांडवलाची आवश्यकता
  • मालाचा पुरवठा कसा होईल

• कमीशनचे प्रमाण
• तुमचा आता असणारा आणि वाढवू शकाल असा जनसंपर्क आणि त्याची साधने, माध्यमे
• तुम्हाला घरून, मित्रांकडून मिळणारी मदत

असे व्यवसाय दोन पद्धतीने करता येतात :

१. तुम्ही प्रत्यक्ष वस्तू आणून त्या दुसऱ्यांना विकणे.
२. ग्राहकाची ऑर्डर उत्पादकाला पोहोचवणे आणि त्याचे कमीशन मिळवणे.

वरील माहितीनुसार, तुम्हाला योग्य वाटेल त्या व्यावसायिक व्यक्तीशी बोलून, त्यांच्या आणि तुमच्या अटी, मुद्दे, बारकावे, प्रश्न, उत्पादन/सेवेची विस्तृत माहिती, कामाची पद्धती, नियम वगैरेचा अभ्यास करून निर्णय घ्यावा.

– सतीश रानडे


Free Newsletter on WhatsApp & Telegram

'स्मार्ट उद्योजक'चे उद्योजकता आणि व्यवसायविषयक लेख वाचण्यासाठी जोडले जा : WhatsApp ग्रुपवर आणि टेलिग्राम चॅनेलवर.

error: Content is protected !!