ब्रँडचे नाव : समर्थ फोर्टीफाइड चक्की फ्रेश आटा
‘समर्थ इंडस्ट्रीज’ची स्थापना मार्च २०१९ मध्ये कै. भास्कर उद्धवराव मोरे यांनी केली. भाऊ मोरे यांनी नाशिक महानगरपालिकेत उपअभियंता तसेच मिळकत व्यवस्थापक आणि विधी विभाग प्रमुख या पदांवरून २०१७ रोजी ३३ वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर स्वेच्छानिवृत्ती घेतली. भा.उ. मोरे यांनी सेवेत असताना अभियांत्रीकी क्षेत्रात कार्यरत असून कायदा, मॅनेजमेंट, प्रशासन, पत्रकारिता अशा विविध विषयांत पदव्युत्तर डिग्री संपादन केल्या.
भा.उ. मोरे यांचे वडील उद्धव पांडुरंग मोरे यांनी गटविकास अधिकारी आणि मुख्य शेतकी अधिकारी कादवा सहकारी साखर कारखाना या पदांवर सेवा बजावत असताना दिंडोरी तालुक्यात सेवेत असताना आणि सेवानिवृत्तीनंतर समाजकार्यातुन स्वतःची एक वेगळी प्रतिमा तयार करून समाजमान्यता मिळवली होती.
'स्मार्ट उद्योजक' (डिजिटल आवृत्ती) वार्षिक वर्गणी : ₹१४३ ➡️ SUBSCRIBE
(वर्षभर महिन्यातून एकदा डिजिटल मासिक तुमच्या व्हॉट्सअपवर येईल.)'स्मार्ट उद्योजक' (डिजिटल आवृत्ती) आजीवन वर्गणी : फक्त ₹२२२ ➡️ SUBSCRIBE
(यापूर्वी प्रसिद्ध झालेले १००+ अंक ई-मेलवर येतील व दर महिन्यातून एकदा ताजा अंक तुमच्या व्हॉट्सअपवर येईल.)घरात शासकीय सेवेचा प्रदीर्घ वारसा असताना नवीन वाटेने जाण्याचा निर्णय भा.उ. मोरे यांनी घेतला व मुलगा प्रणव याला सोबत घेऊन ‘ओरायझा इंडस्ट्रीज राइस मिल’ व ‘समर्थ इंडस्ट्रीज चना डाळ बेसन आटा मिल’ हे व्यवसाय सुरू केले. भा.उ. मोरे यांच्या निधनानंतर त्यांचे दुसरे चिरंजीव ऋतिक हे आपले शिक्षण पूर्ण झाल्यावर प्रणव याच्यासोबत व्यवसायवाढीसाठी कार्यरत झाले आहेत.
हे अन्नप्रक्रिया उद्योग करताना स्वच्छता, उच्च दर्जा आणि प्रामाणिकपणा या मुल्यांसोबत कुधीही तडजोड होणार नाही याची कायम काळजी घेतली जाते. आज सन २०१८ पासून ओरायझा इंडस्ट्रीज आदिवासी विकास विभागाचे धान भरडाईच काम करत आहे तसेच स्वतःच्या नावाने उच्च प्रतीचा कोणतीही भेसळ नसलेला तांदुळ पुरवण्यात अग्रेसर आहे.
समर्थ फोर्टीफाइड चक्की फ्रेश आटाची वैशिष्ट्ये
- उज्जैन, इंदौर, देवास, डोंडाइचा, शहादा येथून खरेदी केलेल्या शुद्ध गव्हाचा वापर करून दगडी चक्कीवर दळलेला आटा.
- चांगल्या दर्जाचा गहू वापरून पीठ तयार केलेले असल्याने मऊ पोळी तयार होते.
- दगडी चक्कीचा वापर करत असल्याने यात गव्हात असलेले सर्व घटक तसेच राहतात, जे की रोलर मिलमध्ये रवा, मैदा वेगळे करून पीठ तयार केले जाते.
समर्थ चक्की फेश आटा अन्नसुरक्षा मानकांची पुर्णपणे काळजी घेऊन फोर्टीफाईड केला जातो म्हणजेच यात व्हिटॅमीन बी-१२, फॉलिक अॅसिड आणि आर्यन यांचा यात समावेश केला जातो.
- फोर्टीफिकेशन करत असल्याने आम्ही दररोज आट्याची गुणवत्ता चाचणी करून उत्पादन करतो.
- दररोज उत्पादन आणि विक्री याचा समतोल राखून नवीव उत्पादन करत असल्याने दुकानात अगदी २ किंवा ३ दिवस आधी तयार केलेला आटा विक्रीसाठी उपलब्ध करून दिला जातो; जेणेकरून दुकानात विक्रीसाठी जास्त वेळ मिळतो आणि ग्राहकाला ताजा माल मिळतो.
- सन २०२० पासून आम्ही या व्यवसायात असून आमचा रिपीट कस्टमर रेट चांगला असून पीठ खराब असल्याची तकार येऊन माल परत येणे, गोणीमध्ये आटा बॅग फुटलेल्या असणे असल्या तकारी आमच्या मालाच्या बाबतीत घडलेल्या नाहीत व यापुढेही येणार नाही यासाठी आमची टीम कठोर परिश्रम घेत राहते.
- स्वच्छता, टापटिपपणा, अन्नसुरक्षेच्या सर्व नियमांचे पालन करून भेसळ व अन्य गैरमार्गाचा वापर न करता आटा तयार करत असल्याने आमचा प्लॉट कामकाज सुरू असताना कधीही येऊन बघुन खात्री करून घेऊ शकतात.
तुमचे ब्रँड पेज रजिस्टर करायचे असल्यास येथे क्लिक करा
आमची प्रॉडक्ट्स :
- समर्थ फोर्टीफाइड चक्की आटा
- समर्थ चना बेसन
- समर्थ डाळ
- विविध प्रकारचे तांदुळ
कंपनीचे नाव : समर्थ इंडस्ट्रीज
कंपनीचे मालक / पार्टनर / डायरेक्टर्सची नावे :
- Pranav Bhaskar More (BE Civil)
- Hritik Bhaskar More (MTech Bio Engineering, MBA)
संपर्क : Pranav – 7855195343, Hritik – 8329233141, Company – 8484960799
पत्ता : G. No. 169, Old Kadwa Mhalungi Road, Valkhed, At Post Tal – Dindori, Dist. Nashik. 422202
Instagram:
https://www.instagram.com/samarth_in?igsh=MWFndWp6YWgzOHV4NQ==
Facebook:
https://www.facebook.com/profile.php?id=61563705511845&mibextid=ZbWKwL
तुमचे ब्रँड पेज रजिस्टर करायचे असल्यास येथे क्लिक करा
तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमचीही 'उद्योजक प्रोफाइल' तयार करायची असेल तर 9833312769 वर "उद्योजक प्रोफाइल" असा मेसेज whatsapp करा.