फक्त उदरनिर्वाह चालवायचा नाही, तर काही मोठेही करायचे या उद्देशाने सुरू केला व्यवसाय
उद्योजक Profiles

फक्त उदरनिर्वाह चालवायचा नाही, तर काही मोठेही करायचे या उद्देशाने सुरू केला व्यवसाय

स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मिळवा फक्त ₹४०० मध्ये. आजच वर्गणीदार व्हा! https://bit.ly/2YzFRct


संजय बनसोडे यांनी वयाच्या चौतिसाव्या वर्षी २०१९ ला ‘बनसोडे सप्लायर’ या त्यांनी स्थापन केलेल्या कंपनीच्या माध्यमातून उद्योगजगतात पदार्पण केले. व्यवसाय कसा करायचा, याचा जराही अनुभव नसतानासुद्धा स्वतःवर विश्वास ठेवून त्याने पाऊल उचलले.

पंधरा वर्ष जॉब करूनही कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्याव्यतिरिक्त आपण खास काही करू शकलो नाही, हा विचार त्यांना झोप लागू देत नव्हता.

फक्त ₹२२२ मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिकाच्या डिजिटल आवृत्तीचे आजीवन वर्गणीदार व्हा आणि अगणित फायदे मिळवा!

अधिक माहितीसाठी : https://rzp.io/l/smartudyojak

काहीतरी करायचे, पण काय? आणि कसे करायचे? हे त्यांना कळत नव्हते; पण व्यवसाय करायचा दृढ निश्चय त्यांच्या मनात होता. व्यवसाय करण्यासाठी लागणारा पैसा कुठून आणायचा? नेमका कोणता व्यवसाय करायचा? सुरुवातीला व्यवसाय चालला नाही तर, कुटुंबाला लागणारा पैसा कसा मॅनेज करायचा?

खरे तर या विचारांमुळेच मराठी माणुस आपल्या कम्फर्ट झोनमधून बाहेर येऊन नवीन व्यवसाय करायला घाबरतो, पण संजय बनसोडे यांनी एक असा पर्याय निवडला की सुरुवातीला जॉबसोबत असा व्यवसाय निवडायचा की तो व्यवसाय जॉबसोबत करणे पॉसिबल होईल. जेणेकरून जॉब सोडल्यावर येणारे संकट उभे राहणार नाही.

व्यवसायज्ञानासाठी संजय बनसोडे यांनी सरकारने उद्योग करण्यासाठी उत्सुक असणाऱ्या नवतरुणांसाठी सुरू केलेला ‘स्टार्टअप’ ऑनलाईन कोर्स बघितला आणि व्यवसायज्ञान घेतले आणि कारखान्यांना लागणारे सुरक्षा उपकरणांचा पुरवठा करण्याचे निश्चित् केले.

कोणताही व्यवसाय करायचा तर दोन-दोन गोष्टी महत्त्वाच्या असतात. एक म्हणजे कमी किंमतीत थेट उत्पादकाकडून माल विकत घ्ययचा आणि दुसरी तो विकायचा. माल थेट खरेदी केला तर त्यासाठी गोदाम आवश्यक आहे. सुरुवातीला त्याचे भाडे न परवडणारे होते. त्यामुळे त्यांनी आपल्या बेडरूमलाच गोदाम बनवाचे ठरवले. त्यानंतर त्याने कोटेशन बनवून प्रत्येक कंपनीमधे भेट देऊन दिले.

अशाप्रकारे संजय बनसोडे यांनी आपल्या व्यवसायाची सुरुवात केली. ‘बनसोडे सप्लायर’ची पहिल्याच वर्षात २०१९-२० मधे वार्षिक उलाढाल ही पाच लाखांच्या जवळपास होती. आता ‘बनसोडे सप्लायर’चे २०२१-२२ वर्षाचे ध्येय हे व्यवसायात पूर्णपणे उतरून २५ लाखांचा आहे. नक्कीच त्यांना यात यश येईल.

उद्योजकाचे नाव : संजय लिंबाजी बनसोडे
जन्म दिनांक : १५ मार्च, १९८६
जन्म ठिकाण : हिंगोली
विद्यमान जिल्हा : मुंबई शहर
शिक्षण : B. Com.

ई-मेल : sbansode40@gmail.com
भ्रमणध्वनी : ९८१९४४४०२८
फेसबुक अकाऊंटची लिंक : fb.com/sanjay.bansode31542
कंपनीचे नाव : Bansode Supplier
उत्पादने / सेवा: Industrial Safety Item & Stationery


Free Newsletter on WhatsApp & Telegram

'स्मार्ट उद्योजक'चे उद्योजकता आणि व्यवसायविषयक लेख वाचण्यासाठी जोडले जा : WhatsApp ग्रुपवर आणि टेलिग्राम चॅनेलवर.

error: Content is protected !!