Fly ash bricks चा व्यवसाय करणारे संजय चव्हाण


₹७५० मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मागवा आणि त्यावर ₹२०० किंमतीचे 'एकविसाव्या शतकातील उद्योगसंधी' हे पुस्तक मोफत मिळवा. आजच ऑर्डर करा https://bit.ly/2YzFRct


माझे नाव संजय दिनकर चव्हाण. माझे गाव गैबीनगर तांडा, पो. राक्षसभुवन, ता. गेवराई, जि. बीड हे आहे. मी एम.कॉम.पर्यंत शिक्षण केले असून मला तेरा वर्षे खाजगी व सरकारी क्षेत्रात नोकरी चा अनुभव आहे. वाणिज्य शाखेत शिक्षण घेत असतानाच मला स्वत: काही तरी व्यवसाय करावा, ही इच्छा होती. त्यामुळे मी बी.कॉम.ला असतानाच एक एसटीडी बुथ भाडेततत्त्वावर चालवायला घेतला. यातून माझी व्यवसायाची ईच्छा अधिकच दृढ झाली.

सरकारी नोकरी करत असतानासुद्धा माझे मन मला व्यवसायाकडे खेचत होते. एक दिवस शांत बसून विचार करत असताना अचानक ‘स्मार्ट उद्योजक’मधील एका लेखाकडे नजर गेली आणि मला माझ्या अपेक्षेप्रमाणे व्यवसाय सापडला. तो म्हणजे fly ash bricks.

हा व्यवसाय निवडण्यामागचा मूळ उद्देश म्हणजे वीजनिर्मिती केंद्रामध्ये विजेच्या निर्मितीसाठी दगडी कोळश्याचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. तो दगडी कोळसा जाळल्यानंतर जी राख उरते त्या राखेपासून आसपासच्या परीसरामध्ये मोठ्या प्रमाणात जल व वायू प्रदूषण निर्माण होते. हे प्रदूषण कमी करण्यासाठी या राखेचा वापर आपण विटनिर्मितीसाठी केला पाहिजे, असा विचार करून या व्यवसायाकडे वळलो.

संजय दिनकर चव्हाण

कंपनीचे नाव : Vivek Fly Ash Bricks
आपला हुद्दा : Proprietor
व्यवसायातील अनुभव : 2
तुमची उत्पादने व सेवा : Fly Ash Bricks, Pevor Block, Cement Product

व्यवसायाचा पत्ता : Survey No. 12, opp. Gangadhar Auto, Beed-Jalna road, Georai, Tq. Georai, Dist. Beed – 431127.
Mob. 9860599194.
विद्यमान जिल्हा : बीड
ई-मेल : sanjay077755@gmail.com
मोबाइल : 9860599194

प्रॉडक्ट किंवा सेवेविषयी थोडक्यात माहिती : Fly Ash Bricks म्हणजे विद्युतनिर्मिती केंद्रामध्ये वीजनिर्मितीसाठी दगडी कोळसा वापरला जातो आणि तो कोळसा जाळल्याने जी राखनिर्माण होते त्या राखेपासून ही वीट बनवली जाते. ही वीट वजनाला हलकी व मजबूत आणि टिकाऊ असते. या विटेच्या बांधकामाला मातीच्या विटेच्या तुलनेत सिमेंट, वाळू व पाणी हे खूप कमी लागते.

Author

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ मध्ये 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?