कथा उद्योजकांच्या

महाराष्ट्राच्या ३६ जिल्ह्यांत स्कॉलरशिप आणि नवोदय परीक्षेसाठी विद्यार्थी घडवत असलेले संतोष बच्छाव सर

स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मिळवा फक्त ₹४०० मध्ये. आजच वर्गणीदार व्हा! https://bit.ly/2YzFRct


कोरोना काळातील घटना आहे. एक दुर्दैवी गृहिणी होती. तिला दोन मुले होती. कोरोनामुळे तिच्या पतीची नोकरी सुटली होती. ती गृहिणी छोटे-मोठे काम करून आपल्या कुटुंबाचे कसेबसे पालनपोषण करीत होती. नोकरी नसल्याने पती दिवसभर घरातच असत. बेकारीमुळे त्यांचा स्वभाव फार चिडचिडा, संतापी, शीघ्रकोपी बनला होता. ते लहानशा कारणांवरून मुलांना मारहाण करायचे. मग मुले रडायची. आरडाओरडा करायची.

ती गृहिणी संध्याकाळी घरी आल्यावर मुले वडिलांविषयी गाऱ्हाणी सांगायची. वडिलांनी केलेल्या मारहाणीचे वळ दाखवायची. नवरा काही समजावून सांगण्याच्या पलिकडे गेला होता. त्यांच्या घरातील वातावरण एकदम तणावपूर्ण, कोमेजलेले बनले होते. त्याच काळात त्या महिलेला केंद्र सरकारतर्फे घेतल्या जाणाऱ्या ‘जवाहर नवोदय स्कूल’ परीक्षेची माहिती समजली.

फक्त ₹२२२ मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिकाच्या डिजिटल आवृत्तीचे आजीवन वर्गणीदार व्हा आणि अगणित फायदे मिळवा!

अधिक माहितीसाठी : https://rzp.io/l/smartudyojak

या परीक्षेत पास होणाऱ्या मुलांचे सहावी ते बारावीपर्यंत चे सगळे शिक्षण त्याच जिल्ह्यातील जवाहर नवोदय विद्यालयात होते आणि त्याचा सर्व खर्च सरकार उचलते. त्या महिलेचा मुलगा तेव्हा पाचवीला होता. तिने विचार केला की जर तिचा मुलगा नवोदय परीक्षेत पास झाला तर त्याच्या शिक्षणाचा खर्च तिला करावा लागणार नाही आणि वसतीगृहात राहायला जावे लागल्याने तो घरातील कोंदटलेल्या वातावरणापासूनही दूर जाईल. त्याची घरातून सुटका होईल. अर्थात विचार जरी चांगला असला तरी तो अंमलात आणणे तितकेसे सोपे नव्हते.

दरवर्षी प्रत्येक जिल्ह्यातून १५ ते २० हजार विद्यार्थी नवोदय परीक्षा देतात, पण यातून ८० मुलेच या परीक्षा उत्तीर्ण होतात. तरी आपल्या मुलाने ही परीक्षा द्यावी असे त्या महिलेला वाटले. तिने या कामी महाराष्ट्रातले सुप्रसिद्ध जवाहर नवोदय एक्झाम कोच संतोष बच्छाव सर यांचे कोचिंग आपल्या मुलाला लावले.

आश्चर्याची गोष्ट म्हणजे संतोष बच्छाव यांच्या योग्य मार्गदर्शन आणि मोटीवेशनल टीचिंगमुळे त्या महिलेचा मुलगा नवोदय परीक्षा पास झाला. खरोखरच त्याच्या शिक्षणाचा प्रश्न सुटला आणि घरातील अप्रिय वातावरणातूनही मुलाची सुटका झाली.

केवळ हा मुलगाच नव्हे तर अशा अनेक विद्यार्थ्यांना संतोष बच्छाव सरांच्या मार्गदर्शनामुळे जवाहर नवोदय आणि स्कॉलरशिप परीक्षेत नेत्रदीपक यश मिळाले आहे. त्यांच्या पालकांची आपल्या मुलांच्या शिक्षणाच्या खर्चातून सुटका झाली आहे. त्यांच्या मुलांचे भविष्य सुरक्षित आणि उज्ज्वल झाले आहे.

संतोष बच्छाव सर हे नवोदय आणि स्कॉलरशिप परीक्षांच्या बाबतीत सध्या महाराष्ट्रातील नंबर वनचे कोच किंवा मार्गदर्शक समजले जातात. विशेषत: कोरोना कालखंडानंतर ऑनलाइन पद्धतीने शिकवण्याची सुविधा विकसित झाल्याने महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यातींल हजारो मुले सध्या त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ घेत आहेत. २०२० सालापासून त्यांच्या यशाचा आलेख सतत उंचावतच जात आहे.

पालकांना आपल्या मुलांना शिक्षण देतांना जाणवणारी समस्या म्हणजे ऑफलाईन क्लासची फी आणि हीच समस्या ओळखून तिचे समाधान सरांनी शोधले. शहरी भागात फारशा माहीत नसल्या तरी महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील लाखो विद्यार्थी स्कॉलरशिप व नवोदय या परीक्षांना बसतात. या परीक्षांचे प्रत्यक्ष रेसिडेंन्शिअल क्लासेसही अनेक जिल्ह्यांत घेतले जातात. मात्र त्यांची फीस वार्षिक ५० ते ६० हजार रुपये इतकी असते.


पालक प्रतिक्रिया

आदरणीय,
संतोष बच्छाव सर

मी रुद्राक्ष गांगुर्डेची आई. सर मला सर्वात आधी तुमचे मनापासून आभार मानायचे आहेत. तुम्ही रुद्राक्षला गणिताची आणि अभ्यासाची गोडी लावली. जो मुलगा पाच मिनिटेसुद्धा स्थिर बसत नव्हता, त्या मुलाने १० ते ११ तास एका ठिकाणी बसून अभ्यास केला आणि तोही खूप मनापासून. मी रुद्राक्षचं भाग्यच समजते की तुमच्यासारखे देवदूत त्याच्या आयुष्यात आले आणि त्याच आयुष्य तुम्ही बदलवून टाकल.

दोन दिवस मी त्याच निरीक्षण करते आहे तो अगदी बेचैन झाला आहे. आता तुमचे लेक्चर नाही, क्लास नाही, खूप चुकल्यासारख वाटत आहे. तुम्ही हसतखेळत घेतलेला अभ्यास खूप आठवतो. तो मनापासून तुमच्याबद्दल बोलत असतो. तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद.


संतोष बच्छाव सर यांनी मोबाईलद्वारे आणि ऑनलाइन पद्धतीची कोचिंग व्यवस्था विकसित करून या दोन्ही परिक्षांची कोर्स फी केवळ तीन हजार रुपये इतकी कमी केली आहे. याचाच दुसरा अर्थ त्यांनी ग्रामीण आणि साधारण परिस्थितीतील मुलांना या परीक्षेला बसणे, पास होणे परवडण्याजोगे केले आहे. जास्तीत जास्त मुलांना आता संतोष बच्छाव सरांच्या मार्गदर्शनाने या परीक्षा देणे शक्य झाले आहे.

ऑनलाइन पध्दतीने शिक्षण देऊन संतोष बच्छाव यांनी या परीक्षा आणि आपल्या मुलांचे उज्जवल भविष्य घडवणे सर्वसामान्य पालकांच्या आवाक्यात आणून ठेवले आहे. तसेच क्लासला जाण्याचा वेळ व प्रवासखर्चही वाचवला आहे.

नवोदय परीक्षेत निवड झालेल्या अमेय अहिरे, नाशिक या विद्यार्थ्यांच्या घरी भेट

एका सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या संतोष बच्छाव सर यांचा विद्यार्थीदशेपासूनच गणित या विषयाकडे कल होता. मॅथ्स् या विषयातच त्यांनी बी. एस्. सी. केले. त्यानंतर दीर्घ काळ फार्मा क्षेत्रात काम केल्यानंतर ते आपल्या आवडीच्या म्हणजे काउंन्सिलिंगच्या क्षेत्रात आले. त्याचबरोबर अबॅकस या गणिते सोप्या पद्धतीने सोडवण्याच्या तंत्रातील उच्च शिक्षण त्यांनी घेतले. पुढे कल्याण येथे त्यांनी ‘एंजल्स मॅथ्स अकॅडमी’ या नावाने कोचिंग क्लासेस सुरू केले. ते य़शस्वीपणे चालवले. त्यात ते वैदीक गणित व अबॅकसचे शिक्षण द्यायचे.

२०२० च्या कोरोना कालखंडामुळे सगळ्या जगाचीच घडी विस्कटली. सगळी समीकरणे बदलली. संपर्कावरील, प्रत्यक्ष भेटींवरील निर्बंधांमुळे ऑनलाइन पद्धतीने शिक्षण दिले-घेतले जाऊ लागले. याच कारणांमुळे संतोष बच्छाव सर यांच्या अध्यापन पद्धतीतही काही क्रांतीकारी बदल झाले. त्यांच्या कार्याचा विस्तार झाला. ‘नेटभेट आँनलाईन लर्निंग सेंटर’ या संस्थेशी टायअप करून त्यांनी आपले कार्यक्षेत्र वाढवले.


विद्यार्थी प्रतिक्रिया

Respected,
Santosh Bachhav Sir

I am Swarali from Satara. सर मला नवोदय परीक्षा पेपर खूप easy गेला आणि maths चे two to three questions जरा difficult होते, पण तुम्ही ते ३ शस्त्र दिल्या होत्या, त्याच्यानुसार मी ते दोन्हीही Question solve केले आणि सर तुम्ही इतक्या छान छान motivational story सांगितलेलं होत्या ते मला खूप आवडले तुम्ही शिकवलेलं सगळं मला कळत होतं.

जर एखादा question hard आला तर तो कसा solve करायचा आणि सर तुम्ही सांगितल्याप्रमाणे आज मी exam center वर गेल्यानंतर एकदम गर्दीतून लांब बसलेले होते आणि एकदम Silent बसले होते. त्यामुळे मी एक्झाम हॉलमध्ये गेल्यानंतर माझी जास्त एनर्जी वेस्ट नाही झाली. माझ्यामध्ये ऊर्जा निर्माण झाली होती आणि तुम्ही lecture मध्ये घेताना maths Gym, mission 80/80, yes it’s possible आता हा भगवा मातीत नाही त्या गनिमाच्या छातीत रोवायचायं.. हे सगळं मला खूप आवडलं आणि तुम्ही सगळा अभ्यास घेतल्यामुळे मला challenging questions कसा solve करायचा हे लगेच कळलं.

 

कोरोनाच्या काळात शैक्षणिक सामग्रीत गुंतवणूक करणे धोकादायक असतानाही त्यांनी आवश्यक ती सामग्री खरेदी केली. स्वत:ही ऑनलाइन कोचिंगबद्दलचे कोर्सेस केले. आपले ज्ञान अपडेट केले. एका कल्याण शहरापुरते मर्यादित असलेले त्यांचे अध्यापन कौशल्य संपूर्ण महाराष्ट्राभर पसरू लागले.

संतोष बच्छाव सर यांच्या असे लक्षात आले की महाराष्ट्र शासनाद्वारे इयत्ता पाचवी व आठवीच्या वर्षी शिष्यवृत्ती किंवा स्कॉलरशिप परीक्षा घेतली जाते. तसेच जवाहर नवोदय एक्झाम ही केंद्र सरकारतर्फे इयत्ता पाचवीत घेतली जाते. प्रत्येक जिल्ह्यात एक नवोदय विद्यालय व वसतीगृह असते. नवोदय परीक्षा पास होणाऱ्या विद्यार्थ्याला पुढे नवोदय विद्यालयातर्फेच शिक्षण मोफत दिले जाते. या दोन्ही परीक्षांबद्दल ग्रामीण महाराष्ट्रातील मुलांमधे प्रचंड क्रेझ आहे. आकर्षण आहे.


‘स्मार्ट उद्योजक’ वेबपोर्टलवर तुमचीसुद्धा मुलाखत / कथा प्रसिद्ध करू इच्छित असाल, तर इथे क्लिक करा.


दरवर्षी एकूण १२ ते १४ लाख विद्यार्थी परीक्षांना बसतात. मात्र त्यातील साधारणपणे १ ते २ टक्के विद्यार्थीच या परीक्षेत उत्तीर्ण होतात. या परीक्षांबाबत विद्यार्थ्यांमध्ये आकर्षण फार आहे, पण त्यांच्यासंबंधीचे नेमके मार्गदर्शन उपलब्ध नाही. तेव्हा त्यांनी या परीक्षांच्या अभ्यासक्रमाचा अभ्यास करून या परीक्षांच्या मार्गदर्शनाचे आपले असे एक मॉड्युल तयार केले. याच त्याच मॉड्युलद्वारे ते राज्यभरातील विद्यार्थ्यांना आपल्या कुशल मार्गदर्शनाची सेवा देत आहेत.

नवोदय परीक्षांमध्ये २०२१ साली त्यांचे बारा तर २०२२ साली सोळा विद्यार्थी पास झाले. या २८ विद्यार्थ्यांच्या पालकांच्या शिक्षणाचे ८ ते १० लाख रुपये वाचले. महाराष्ट्र राज्य स्कॉलरशिप परीक्षांमध्ये २०१८ साली पाच, २०१९ साली पाच, २०२० साली तेरा, २०२१ साली ३० आणि २०२२ साली ४० विद्यार्थी जिल्हा गुणवत्ता यादीत झळकले आहेत.

संतोष बच्छाव सर जरी ऑनलाइन शिकत असले, तरी ते प्रसंगी आपल्या विद्यार्थ्यांच्या घरी प्रत्यक्ष भेट देतात. त्यांनी आजवर १३५+ विद्यार्थ्यांच्या घरी भेट देऊन त्यांची वास्तविक शैक्षणिक परिस्थिती जाणून घेतली आहे त्यांची उमेद वाढवली आहे. ज्याला मनापासून शिकण्याची भूक आहे. मनापासून ओढ आहे, तळमळ आहे असा एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये अशी संतोष बच्छाव सर यांची आंतरिक प्रेरणा आहे. त्या प्रेरणेपोटीच त्यांची सारी धडपड चालली आहे.

जवाहर नवोदय परीक्षेत निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा आणि त्यांच्या शिक्षकांचा महाराष्ट्र शिक्षक संघटनेकडून सत्कार करण्यात आलेला क्षण

स्कॉलरशिप व नवोदय या दोन्ही परीक्षा विद्यार्थ्यांच्या आयुष्याचा नकाशा बदलवून टाकणाऱ्या परीक्षा आहेत. या परीक्षा पास झाल्यावर विद्यार्थ्यांच्याच नव्हे तर त्यांच्या घरच्या शैक्षणिक वातावरणातही आमूलाग्र बदल घडू शकतो.

स्कॉलरशिप आणि नवोदय या दोन्ही एक्झाम्सच्या टिचिंगपूर्वी ते आधी या परीक्षांची माहिती देणारी मोफत इंट्रोडक्टरी लेक्चर्स, वेबिनार्स घेतात. आजवर आठ देशातील, दहा राज्यातील, महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यातील २५ हजारांपेक्षा जास्त मुलांनी या फ्री लेक्चर्सचा लाभ घेतला आहे.

संतोष बच्छाव सर हे सर्टीफाईड स्टुडंट काउंन्सिलर आहेत. तसेच सर्टीफाईड करिअर काउंन्सिलरही आहेत. त्यानां राज्यस्तरीय ‘महाराष्ट्र उद्योग गौरव’ आणि ठाणे जिल्हास्तरीय ‘उद्योग वैभव’ या पुरस्कारांनी गौरवीत केले आहे.

संतोष सरांच्या मते सध्या पालकवर्ग सीबीएससी, आयसीएससी माध्यमांच्या मागे लागून गोंधळलेला आहे. लाखो रुपये शिक्षणावर खर्च करून असमाधानी आहेत. खरे शिक्षण हरवले आहे. स्कॉलरशिप व नवोदय एक्झाम्समधे सिलॅबस बाहेरील प्रश्न विचारले जातात. त्यांची उत्तरे देतांना विद्यार्थ्यांच्या बुद्धीचा खरा कस लागतो. त्यांच्या मेंदुची तर्कशक्ती विकसित होते. ही तर्कशक्तीच पुढे माणसाची प्रगती करीत असते.

मनुष्यप्राण्याने आजवर केलेली सारी वैज्ञानिक प्रगती या तर्कशक्तीच्या आधारेच साध्य केलेली आहे. स्कॉलरशिप व नवोदय एक्झाम कोच संतोष बच्छाव सर विद्यार्थ्यांमध्ये तर्कशक्ती विकसित करत आहेत. विद्यार्थ्यांना चांगल्या शिक्षणाबरोबर चांगल्या आयुष्यासाठी प्रेरणा देण्याचे काम आपल्या मोटीवेशनल टीचिंगमार्फत तळमळीने करीत आहेत.

नवोदय प्रवेश परीक्षा आणि स्कॉलरशिप परीक्षा ऑनलाइन कोर्ससाठी संपर्क करू शकता. पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी एक वर्षाचा ऑनलाईन कोर्स आहे. चौथी व सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी दोन वर्षांचा ऑनलाईन कोर्स आहे.

संपर्क : संतोष बच्छाव
93211 77114
bachhavsantosh86@gmail.com


‘स्मार्ट उद्योजक’ वेबपोर्टलवर तुमचीसुद्धा मुलाखत / कथा प्रसिद्ध करू इच्छित असाल, तर इथे क्लिक करा.



Free Newsletter on WhatsApp & Telegram

'स्मार्ट उद्योजक'चे उद्योजकता आणि व्यवसायविषयक लेख वाचण्यासाठी जोडले जा : WhatsApp ग्रुपवर आणि टेलिग्राम चॅनेलवर.

error: Content is protected !!